हे बंध रेशमाचे…

rakhi

जेव्हा लहान हाेताे तेव्हा जवळ हाेताे. तेव्हा राग, भांडणं ही हाेती पण प्रेमाची. काही तुटल तर त्याही पेक्षा अधिक जाेडल ही गेलय आपल्यात. पण जे काही होतं ते जवळ होतं आपल्या, प्रेम पण आणि आपले नखरेपण. किती माेठा आनंदाचा ठेवा हाेता ताे राखीपाेर्णिमेचा सण !

काय काय गिफ्ट मिळणार याचा आनंद, मेहंदी ची तयारी, नवीन ड्रेसची खरेदी, विशेष बनवलं गेलेल जेवण, आत्या, काका, मामा, आम्ही सर्व भाऊ बहिण सर्वांच एकञ जमणं, काेण काय काय देणार यावरून सगळ्यांनी एकमेकाला चिडवणं, घर भरवून टाकणारे हास्याचे कारंजे आणि बरंच काही….. श्रावणाचे सगळे रंग या एकाच दिवसात दिसायचे !!!

भाऊ जवळ हाेते तेव्हा खूप नखरे दाखवता येत हाेते. भावांनी मनवल की बरं वाटायचं आणि मनातून नेहमी दुवाच निघायच्या. आता परत येतेय राखीपाेर्णिमा…. सगळं आहे सगळ्यांकडे फक्त दूर आहेत एकमेकांपासून सगळे. आता ते सर्वांनी एका लाईनीत बसणं, मी च पहिले राखी बांधणार, माझी च राखी सर्वांचा हातावर एक नंबरवर असणार हे कुठेतरी हरवल आहे. बाबा काकांची जुगलबंदी, आत्यांच्या चेहरावरचा आनंद हे मीस हाेतय. असं वाटतं बास ना आता… पुन्हा एकदा तेच दिवस जगता येऊ देत की…. आमच्या मुलांना ही दाखवता येऊ दे की आमचं समृद्ध बालपण! खूप वर्ष झाली आता….

पण एक नक्की आम्ही सर्व जगाच्या पाठीवर कुठेही असलाे तरी आमच्या मधला हा रेशीमबंध इतका पक्का आहे की आम्ही सर्व मनाने नेहमीच एकमेकांशी घट्ट जाेडलेले राहू यात तिळमाञ शंका नाही!!! आमच्यातला हा स्नेह असाच वाढत राहो हिच ईच्छा !!!

माझ्या सर्व भावांना आणि आम्ही भाऊ बहिण एकमेकांशी जाेडलेले राहू याची काळजी घेणाऱ्या वहिन्यांना राखीपाेर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !!!

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!