नवरा-बायको मधल्या छोट्या छोट्या कुरबुरी मिटविण्याचे काही उपाय वाचा या लेखात

नवरा-बायको मधल्या छोट्या छोट्या कुरबुरी

सर, मी सरकारी नौकरीत आहे, माझी बायको ही सरकारी नौकरीत आहे, दोन मुले आहेत, आई वडील गावी असतात. आम्ही नवरा-बायको दोघे आणि मुले नौकरीच्या गावी असतो, अलिकडे क्षुल्लक कारणावरुन आमच्यात भांडण व्हायला लागलीयेत.

आठ आठ दिवस अबोला राहतो.

ती वैवाहिक सुख द्यायला सुद्धा नकार देते.

मी नियमित नाही पण क्वचित कधीतरी मद्यपान करतो, तिला तेही सहन होत नाही, आवडत नाही.

छोट्या छोट्या कारणावरुन चिडचिड करत असते बायको!

घरातील स्वास्थ्य, जीवनातला आनंद सगळं काही संपुन गेल्यासारखं वाटत आहे.

कसं वागावं म्हणजे हे प्रश्न संपतील?

साहेब अभिनंदन!

विचारायला जितका कॉमन, उत्तर द्यायला तितकाच अवघड प्रश्न विचारलात!

घरोघरी मातीच्या चुली म्हणा, किंवा फ्लॅटोफ्लॅटी गॅस सिलेंडर म्हणा, पळसाला पाने तीनच!

“माझ्या जीवनातलं वैवाहीक सौख्य का आणि कुठे हरवतेय?”

“हल्ली आम्ही एकमेकांवर पुर्वीसारखं रसरसलेलं, ओथंबुन जाणारं, जीवाला वेड लावणारं, प्रेम का करत नाही?”

“कुठे गायब झालाय, तो भावनिक जिव्हाळा, ती ओढ, ते एकमेकांत गुंतलेलं असणं?”

काही वर्षात नवराबायकोचं हे नातं अचानक असं नीरस कसं काय होतं?

चला उत्तर शोधुया!

उत्तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या शेवटच्या वाक्यात दडलेलं आहे.

तुम्ही म्हणालात की, “कसं वागावं म्हणजे प्रश्न सुटतील?” म्हणजे मला स्वतःमध्ये काय काय सुधारणा कराव्या लागतील!

तुम्ही स्वतःमध्ये बदल करायला तयार झालात आणि अर्धी लढाई इथेच फत्ते झाली.

गाडी बिघडली की आपण काय करतो, तिला नीट करतो.

अगदी तसंचं नाती बिघडली, की त्यालाही नीट करायला टाकावं.

थोडी काळजी घ्यावी, थोडी सर्व्हिसिंग करावी, थोडं काळजीपुर्वक हाताळावं, झालेल्या चुका टाळाव्यात.

गाडी असो वा बायको, यांच्यात काही साम्यस्थळे आहेत.

गाडी रस्त्यावरचा प्रवास सुखकर बनवते, आणि बायको आयुष्याचा प्रवास आरामदायक आणि आनंददायी बनवते.

दोघींनाही धसमुसळेपणा जमत नाही.

जीवापेक्षा जास्त दमछाक झाली की दोघीही थकतात.

दोघीही थकल्या की कुरकुर करतात.

दोघींपैकी एकीनेही आपली साथ सोडली की, आपला खोळंबा निश्चित असतो.

म्हणुन थोड्या थोड्या कालावधीनंतर दोघीनांही सर्व्हिसिंगची आवश्यकता असते.

मला माहित आहे, तुम्ही तुमच्या पत्नीवर मनातुन खुप खुप खुप प्रेम करता.

तुमचं प्रेम तुमच्या लाडक्या पत्नी पर्यंत पोहचत नाहीये, आणि जेवढं करता, ते प्रेम तिच्यासाठी पुरेसं होत नाहीये.

प्रेम म्हणजे देणं, देणं, आणि देणं!….

प्रेम म्हणजे स्वतःला समर्पित करणं!…..

प्रेम म्हणजे परतफेडीची अपेक्षा न ठेवता सेवा करणं!……..

प्रेम म्हणजे स्वतःला दुसऱ्यासाठी झोकुन देणं!……….

प्रेम म्हणजे ओरबाडणं नाही.

प्रेम म्हणजे भरभरुन देणं!……..

मग गेल्या काही वर्षात तुम्ही तुमच्या मॅडम ना काय काय दिलं?

स्वतःला काही प्रश्न विचारा….

मागच्या कित्येक वर्षात, एखाद्या दिवशी बायकोच्या आधी उठुन त्यांना चहा करुन सरप्राईज दिलेत का?

कामावर गेल्यावर ऑफीसमधुन तुम्ही सहज बोलावसं वाटलं, म्हणुन कधी फोन केलात का?

मॅडमचं डोकं दुखत असताना तुम्ही त्यांना कधी झंडु बाम लावुन दिलात का?

एखादा जोक सांगुन, कधी वेडावाकडा डान्स करवुन दाखवुन, कधी एक्टींग करुन, तुम्ही त्यांना खळखळुन हसवले, अशा गोष्टींना किती दिवस झाले?

रात्री घरी जाताना एखादा गुलाब, नाहीतर धुंद करुन टाकणारा मोगऱ्याचा शुभ्र गजरा, नेऊन किती वर्ष झाली?

त्यांच्या बर्थडेला केक कापला होता का?

त्यांच्यासाठी एखादी साडी, एखादा ड्रेस, एखादी नाईटी देऊन आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता का?

तुम्ही लास्ट टाईम त्यांची पर्स उचलल्याचं तुम्हाला आठवतयं का?

सिग्नल क्रॉस करताना त्यांचा हात कधी धरला होता?

त्यांना घरी यायला उशीर झाला तेव्हा काळजीने तुम्ही व्याकुळ झाला होता का?

रात्री झोपण्याआधी तुम्ही त्यांच्या डोक्याला तेल लावुन मस्त मॉलीश केल्याचं तुम्हाला आठवतयं काय?

कधी त्यांच्या भेगा पडलेल्या टाचांकडे पाहुन तुम्ही गरम पाण्याची बकेट घेऊन त्यात त्यांना जबरदस्तीने पाय बुडवुन बसवले होते? नको नको म्हणत असताना, त्या भेगांवर आपल्या हातानी फुटक्रीम लावली होती?

हातात हात घेऊन, आणि डोळ्यात डोळे घालुन, अंतःकरण पुर्वक ‘आय लव्ह यु’ म्हणुन किती वर्ष झाले?

अशात कधी, हातात हात घेऊन, किंवा डोकं त्यांच्या मांडीवर ठेवुन, दोन दोन तास, गप्पा मारल्याचं तुम्हाला आठवतयं का?

अशात कधी त्या नको नको म्हणत असताना कधी बागेत भेळ खायला गेला होतात का?

कधी वॉकिंगला, कधी गार्डनमध्ये, कधी मंदीरात, कधी पिक्चरला, कधी खरेदीला!

लास्ट टाईम स्वयंपाकात त्यांना कधी मदत केली होतीत?

एखाद्या दिवशी पाहुणे आल्यावर, त्या दमुन थकुन गेल्या होत्या तेव्हा उगी मज्जा म्हणुन, कधी भांडे विसळण्यात मदत केलीत का?

उगीच सहज म्हणुन, त्यांना आवडणारं आईस्क्रिम, चॉकलेट किंवा बदाम शेक पार्सल नेऊन किती दिवस झाले, साहेब?

‘तुझ्याशिवाय मी जगु शकत नाही!’

‘तु खुप छान आहेस’

‘मी खुप नशीबवान आहे’, मला तुझ्यासारखी बायको मिळालीय’

असं म्हणुन किती दिवस झाले, साहेब!

आणि हे सगळं जर नसेल तर माझं तिच्यावर खुप खुप प्रेम आहे, हे कसं म्हणु शकता?

प्रेम म्हणजे स्वतःची स्वतःवरची मालकी सोडणं.

आणि लग्न म्हणजे ‘मी तुझा, तु माझी’.

लग्न म्हणजे फॉर्मॅलिटी नाही, ते आत्म्याचं आत्म्याशी मिलन आहे.

लग्न म्हणजे दोन जीवांनी एकमेकांशी आयुष्यभरासाठी एकरुप होणं.

ज्या नवरा बायकोमध्ये प्रेम नसतं, त्यांचं घर ‘घर’ राहत नाही, तो जनावरांचा गोठा बनतो.

आणि गोठ्याचा कोंडवाडा बनायला जास्त वेळ लागत नाही.

कोंडवाड्यामध्ये जीव घुसमटायला आणि गुदमरायला लागतो.

तेव्हा वेळीच तुम्ही सावध झालात हे खुप बरे झाले.

बायको असो वा नवरा…

माझं माझ्या लाईफ पार्टनरशी जमत नाही, अशा प्रकारच्या प्रश्नावर माझ्याकडे एकच उत्तर आहे.

“प्रेम करा, अजुन प्रेम करा, अजुन खुप खुप खुप प्रेम करा,” इतकं प्रेम करा की….

केलेलं प्रेम हजार पटीने चक्रवाढ होवुन आपल्या कडे वापस येईल. मनं मोकळी होतील.

नातं टवटवीत होईल, जीवन रसरशीत होईल, प्रेम करा, बस्स!……………

माझा दावा आहे, सगळे सगळे प्रश्न आपोआप सुटतील.

हा लेख वाचणार्‍या प्रत्येक नवरा-बायको चा गृहस्थाश्रम सुखाचा होवो, अशा मनःपुर्वक शुभेच्छांसह, खुप खुप आभार!….

धन्यवाद!….

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

3 Responses

  1. Dr Tulsidas says:

    If we want to talk on phone, please share your no. It’s related to someone’s personal life.

  2. P d says:

    So valuable notes

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!