जात

जन्माआधी जन्म जिचा होतो
मरणानंतरही माग तिचा उरतो
चिकटते कायम भिनते रक्तात
पुरून उरते सकला ही ‘जात’…
जातीसाठी खावी माती म्हणून
मातीत मिसळले किती जगात
राखही निसटते उरलीसुरली
निसटत नाही कधीच ही ‘जात’…
वेड जातीचे बरे परी तेढ कशाला
उजेडाचे स्वप्न पाहा अंधार उशाला
भेद सोडून देऊया साथ एकमेकाला
‘प्रेमाची जात’ रुजवूया जिंकन्या जगाला
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.