स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?

एखादा विषय शिकत असताना तो आपल्याला कितपत समजलाय हे कसं कळतं?

प्रश्न हे एक प्रभावी माध्यम आहे. कुतुहल जागृत असण्याचे ते लक्षण आहे.

तसेच एखाद्या समस्येचे मूळ शोधून काढण्यासाठी प्रश्नांची मदत घ्यावी लागते. पण यासाठी योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणे गरजेचे आहे.

हे 5 प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारायचे आणि सर्व बाजूंनी विचार करून त्यांची उत्तरे शोधून काढायची.

१. जेव्हा तुमच्या आयुष्यात एखादी अनपेक्षित घटना घडते तेव्हा स्वतःला विचारा की यातून मला काय शिकायचे आहे?

२. कोणतीही रिस्क घेताना स्वतःला विचारा, यामुळे वाईटात वाईट काय घडू शकते?

३. जेव्हा तुम्हाला हरवून गेल्यासारखे वाटते, तेव्हा स्वतःच्या मनाला विचारा की तुम्हाला आयुष्यात नक्की काय मिळवायचे आहे?

४. तुम्ही अगदी थकून गेला असाल तर याक्षणी माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे? हा प्रश्न स्वतःला विचारा.

५. जेव्हा तुमचे समाधान हरवल्यासारखे वाटते तेव्हा स्वतःला विचारा की माझ्या आयुष्यातील उत्तम गोष्टी कोणत्या आहेत?