Majhi ladki bahin yojana maharashtra:

महाराष्ट्र लाडकी बहीण योजना २०२४

महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली.

या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना सरकार दरमहा १ हजार ५०० रुपये देणार आहे.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र?

- २१ ते ६० वयोगटातील महिला. - वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलेल्या महिला. - या योजनेचा लाभ घेण्याकरता कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावी. - इन्कम टॅक्स भरणारी महिला या योजनेस पात्र नसेल. - सरकारी योजनेतून मानधन घेणाऱ्या महिलांनाही ही योजना लागू नाही. - सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

आवश्यक कागदपत्रे :

१) आधार कार्ड २) जात प्रमाणपत्र ३) मूळ निवासी प्रमाणपत्र ४) रेशन कार्ड ५) उत्पन्नाचा दाखला ६) बँकेचे पासबूक ८) मोबाईल क्रमांक ९) पासपोर्ट साईज फोटो १०) माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज फॉर्म

१ जुलैपासून या योजनेसाठी अर्ज सुरू झाले आहेत. दरम्यान, मात्र, अनेकांना फॉर्म कुठे भरायचा? या योजनेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आपल्या व्हाट्सअप कॅम्युनिटी मध्ये सामील व्हा

आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा

आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा

आपल्या युट्युब चॅनल ला SUSCRIBE करा