हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…

पाडगावकरांच्या काही ओळी आहेत, “चिऊताई, पहाटेच्या रंगांत तुझे घरटे न्हाले, तुला सांगायला फुलपाखरू धावत आले. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं..” १००% च्या नादात आपलं तसंच तर होत नाही ना? असं होत असेल तर बदलायला हवं…… प्रवासाला निघाल्यानंतर इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंतचा प्रवास आपण सुखावह करण्याचा प्रयत्न करतो. प्रवासाचा आनंद घेतो. तसंच हे आहे. शेवटी, आपण सगळेच मुसाफिर आहोत. एका ध्येयापासून दुसऱ्या ध्येयापर्यंतचा प्रवास अविरत करणार आहोत. तो आनंददायक करायलाच हवा.