डाव

कसा रे हा खेळ
नियतीचा मांडलेला…
तुझ्या मनात असून
हा डाव तु हरलेला…

फासे श्वासांचे
हळूच पडले…
गूंतुन हातांचे
ठसे तुच पुसले…

कसा रे हा खेळ
नियतीचा मांडलेला…

सोंगट्या प्रेमाच्या
चाल हि खेळलास…
जिंकतांना ह्रदयाच्या
पंखांनाच का छाटलेस…

कसा रे हा खेळ
नियतीचा मांडलेला…

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment