त्वचेच्या वेगवेगळ्या विकारांवर कोथिंबीरीच्या रसाचे फायदे कोणते आणि या रसाचा वापर कसा करायचा ते जाणून घ्या या लेखात.
आपल्या त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी लाभदायक घटक अनेक वेळेला आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातच मिळतात.
या पैकी अनेक घटकांचा आपण नियमितपणे वापर देखील करत असतो.
पण आपल्याला नवीन नवीन माहिती मिळवून त्या गोष्टी करून बघायला आवडतात.
आपल्या त्वचेच्या आरोग्याबद्दल आपण नेहमीच जागरूक असतो.
बाजारात मिळणारी क्रीम्स असतातच, पण आपल्या त्वचेच्या बाबतीत आपल्याला बरेच वेळा घरगुती उपायच बरे वाटतात.
हे उपाय करायला वेळ जास्त लागत असला तरी त्याचे फायदे लगेच दिसून येतात, त्वचेच्या इतर तक्रारी दूर होतात आणि मुख्य म्हणजे या उपायांचा काहीच विपरीत परिणाम होण्याची शक्यता नसते.
आपल्या स्वयंपाकघरातला असाच एक घटक, कोथिंबीर याबद्दल आज आपण बोलणार आहोत.
कोथिंबीरीचा रस आपल्या त्वचेसाठी लाभदायक असतो.
हा रस नेमका कसा वापरायचा आणि त्याचे फायदे कोणते हेच आज या लेखात सांगितले आहे.
कोथिंबीर ही भरपूर व्हिटामिन आणि मिनरल्सने परिपूर्ण असते.
यामध्ये antioxidants सुद्धा जास्त प्रमाणात असतात.
आपल्या पेशींवर फ्री रॅडीकल्सचा परिणाम होऊन त्यांच्यावर ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस येत असतो.
हे अर्थातच आपल्या शरीरातील पेशींसाठी हनीकरण असते.
Antioxidants हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून आपल्या पेशींचे रक्षण करतात.
यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि त्वचेवर वयोमाना परत्वे पडणाऱ्या सुरकुत्यांचे प्रमाण कमी होते.
याशिवाय कोथिंबीरीत आयर्न हे खनिज जास्त प्रमाणात आढळते.
त्यामुळे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते.
आपल्या एकूण आरोग्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होत असतो.
आपण निरोगी असू तर आपली त्वचा सुद्धा टवटवीत दिसते.
आपल्या रक्तात जर हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर चेहरा पांढरा दिसायला लागतो.
पण रक्तात जर हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात असेल तर त्याचा परिणाम आपल्या त्वचेच्या आरोग्यावर होतो. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो.
रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी ताजी कोथिंबीर रोज सकाळी उपाशी पोटी चावून खाल्ल्याने फायदा होतो.
ओठांचा काळपटपणा सुद्धा कमी करण्यासाठी कोथिंबीर उपयुक्त आहे.
कोथिंबीरीचा असाच एक महत्वाचा फायदा म्हणजे त्यामुळे आपले पित्ताचे त्रास कमी होतात.
पोट साफ नसेल, पित्त असेल तर त्यामुळे आपल्या त्वचेवर लाल पुरळ येणे, काहीवेळा फोड येणे यासारखे त्रास होऊ शकतात.
कोथिंबीरीत anti bacterial गुणधर्म सुद्धा असतात. यामुळे त्वचेवर फोड, पिंपल्स, एक्ने येणे यासाठी पण कोथिंबीर गुणकारी आहे.
अशा या कोथिंबीरीचे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत ते त्यामध्ये असणाऱ्या पोषणद्रव्यांमुळे.
आपण कच्ची कोथिंबीर खाल्याने आपल्या त्वचेवर त्याचा कसा परिणाम होतो हे थोडक्यात बघितले पण कोथिंबीरीचा रस काढून तो त्वचेवर लावल्याने त्वचेचा पोत कसा सुधारतो आणि हा रस नेमका कोणत्या पद्धतीने लावायचा हे आता आपण बघणार आहोत.
१. कोथिंबीर आणि कोरफड : सुरकुत्या कमी करण्यासाठी
आपले वय वाढते तसे आपल्या त्वचेवर सुरकुत्या, फाईन लाईन्स पडायला लागतात.
यासाठी कोथिंबीरीचा उपयोग केला जाऊ शकतो.
कोथिंबीरीची पाने वाटून घेऊन ती कोरफडीच्या गरात मिक्स करायची.
हे मिश्रण चेहऱ्यावर, हातावर लाऊन ठेवायचे.
साधारण १५ मिनिटांनी सुकल्यावर चेहरा, हात स्वच्छ धुवून घ्यायचे.
यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होईल आणि वाढत्या वयात त्वचा टवटवीत दिसेल.
२. कोथिंबीर आणि लिंबाचा रस : पिंपल्स कमी करण्यासाठी
पिंपल्स, एक्ने याच्या जर तक्रारी असतील तर त्यावर कोथिंबीर आणि लिंबू हा एक हमखास, खात्रीशीर उपाय आहे.
वर म्हटल्या प्रमाणे कोथिंबीर ही जंतुनाशक असते. त्यामुळे पिंपलचे प्रमाण कमी करण्यासाठी फायदेशीर असते.
कोथिंबीर ही आपल्या त्वचेवरच्या डेड स्कीन सेल्सला काढून टाकते त्यामुळे त्वचा सतेज होण्यासाठी मदत होते.
लिंबात जास्त प्रमाणात असणाऱ्या व्हिटामिन ‘सी’ मुळे त्वचेवरचे डाग फिकट होण्यासाठी मदत होते.
यासाठी ताज्या कोथिंबीरीची पाने वाटून त्यात मावेल इतका लिंबाचा रस घालून पेस्ट करून घ्यायची आणि चेहऱ्यावर जिथे जिथे फोड, डाग आहेत तिथे लाऊन ठेवायची.
१० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा.
३. कोथिंबीर, दुध, मध, लिंबू – उजळ त्वचेसाठी
कोथिंबीर वाटून घेऊन त्यात दुध, मध, लिंबू घालून, व्यवस्थित मिक्स करून पेस्ट करून घ्यायची.
हा घरगुती फेसपॅक पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लाऊन ठेवायचा.
सुकल्यावर चेहरा स्वच्छ धुवू, कोरडा करायचा.
यामुळे चेहऱ्यावरचा टॅन कमी होऊन चेहरा उजळण्यासाठी उपयोग होईल.
४. कोथिंबीर, तांदूळ आणि दही – टवटवीत त्वचा करण्यासाठी
कोथिंबीर आणि तांदूळ वाटून घेऊन ते दह्यात कलवून त्याचा फेसपॅक तयार करून घ्यायचा.
हा पॅक चेहऱ्याला सगळीकडे नीट लाऊन घ्यायचा आणि सुकल्यावर चेहरा धुवून घ्यायचा.
वाटलेल्या तांदळाचे आणि दह्याचे मिश्रण चेहऱ्याच्या स्न्यायुंना रीलॅक्स करते आणि कोथिंबीरीमुळे थंडावा येतो.
वाटलेल्या तांदळामुळे आपल्या त्वचेवरच्या डेड स्कीन सेल्स सुद्धा निघून जातात.
यामुळे आपली त्वचा ताजी, टवटवीत होते. खूप थकवा आलेला असला की आपली त्वचा निस्तेज दिसते.
अशावेळेस आपल्या घरी उपलब्ध असणाऱ्या या गोष्टी वापरून घरच्याघरी फेसपॅक तयार करू लावल्यास आपल्याला फ्रेश वाटते आणि यामुळे आपली त्वचा सुद्धा टवटवीत दिसते.
https://manachetalks.com/13130/how-to-reduce-oiliness-of-skin-marathi/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.