व्हायरल असत्य : टोल रिसीटमुळे हायवेवर प्रवास करताना अनेक फायदे मिळतात

सध्या भारतात टोलबुथवर मिळणाऱ्या रिसीटसंदर्भात एक मेसेज व्हायरल होतोय.

त्यात असं म्हटलंय की ज्या लोकांकडे टोलबुथवर मिळालेली ही रीसिट असेल त्यांना हायवेवर विविध सुविधा सहज उपलब्ध होणार आहेत.

त्यात वेगवेगळ्या आरोग्य विषयक सुविधा, पेट्रोल, डिझेल यांचाही समावेश आहे. पण वाचकांनो सावधान…

कोणत्याही खात्रीशिवाय या गोष्टीवर विश्वास ठेवू नका.

नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाने हा मेसेज खोटा असल्याचा दावा केला आहे.

वास्तविक हा मेसेज नेमका कुठे सुरु झाला याचा अजून तपास लागला नाहीये. पण बऱ्याच नावाजलेल्या मराठी पोर्टल ने सुद्धा याबाबतची माहिती दिली.

त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरल्याने नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर याची शहानिशा करण्याचा आम्ही प्रयत्न केला.

तर टोल भरल्यावर मिळणाऱ्या रिसीटमुळे अनेक फायदे सहज मिळतात, या गोष्टीत तथ्य नसल्याचे पुढे आले.

खरतर ती रिसिट केवळ टोल भरल्याचा पुरावा आहे. पण ती रिसिट मिळाल्यावर तुम्हाला इमर्जन्सी केससाठी तात्काळ मदत मिळते, हा मेसेज खोटा आहे असं नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाचं म्हणणं आहे.

तुम्हीही अशा मेसेजमुळे गोंधळात पडला असाल तर नेमकं तथ्य काय आहे ते जाणून घेऊ…

१. तुम्हाला एखादी मेडिकल इमर्जन्सी असल्यास तुमच्याकडे जर टोलबुथवरची रिसिट असेल तर त्यामागे दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. हायवेवर सुद्धा काही मिनीटात तुम्हाला मदत मिळते.

२. तुमची गाडी पंक्चर झाली असेल किंवा गाडीला काही इजा झाली असेल तर रिसिटमागे असलेल्या नंबरवर संपर्क केल्यास १० मिनीटात तुम्हाला हवी ती मदत मिळते.

३. तुमच्या गाडीतलं पेट्रोल, डिझेल संपल असेल तर रिसिटमागे दिलेल्या नंबरवर संपर्क केल्यास काही मिनीटात तुम्हाला पेट्रोल, डिझेल मिळेल. त्याचे पैसे तुम्हाला द्यावे लागतील.

४. विशेष म्हणजे हा सगळा खर्च तुम्ही भरलेल्या टोलच्या रकमेतून भागवला जातो. त्यासाठी तुम्हाला वेगळा खर्च करावा लागत नाही.

कृपया अशा कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. यापैकी कोणत्याही गोष्टीत तथ्य नाही.

या केवळ अफवा असून लबाडीचा प्रकार आहे. आपल्यापैकी ज्यांना असा मेसेज मिळाला असेल त्यांना यामागील तथ्य समजून सांगा.

इंटरनेटवरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्याआधी त्याची योग्य प्रकारे खात्री करून घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।