स्वतः चे घर असावे असे प्रत्येकाचेच स्वप्न असते. पण घर घ्यायचे म्हणजे बजेट चा विचार सर्वात आधी करावा लागतो.
प्रत्येकाच्या मनात घर घेण्याचा विचार करतांना सर्वात आधी विचार येतो तो बँकेकडून लिलाव केल्या जाणाऱ्या प्रॉपर्टीचा.
पण हि लीलाव केली जाणारी प्रॉपर्टी सहसा लोकांना समजत नाही म्हणून त्यात सहभागी होऊन ती खरेदी करणे शक्य होत नाही.
पण आता जर तुम्ही घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर, तुमच्यासाठी बाजारभावा पेक्षा कमी किमतीत घर किंवा कुठलीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी एक चांगली संधी चालून आलेली आहे.
पंजाब नॅशनल बँकेने सध्या यासाठी एक चांगली ऑफर आणली आहे.
Mark your calendars!
Participate in PNB’s Mega e- Auction to get reasonable prices for residential and commercial property. To know more, visit e-Bikray Portal: https://t.co/N1l10s1hyq
e-Auction date: 24th June, 2021 pic.twitter.com/CEykdhwNqd
— Punjab National Bank (@pnbindia) June 22, 2021
पंजाब नॅशनल बँकेकडून मेगा इ-ऑक्शन चे आयोजन केले जाणार आहे.
बोली लावण्यासाठी काय करावे?
1) बिडरला इ ऑक्शन मध्ये रजिस्टर करण्यासाठी इ- मेल ID आणि मोबाईल नंबर द्यावा लागेल.
2) त्यानंतर KYC documents अपलोड करावे लागतील.
3) त्यांनतर इ ऑक्शन प्लॅटफॉर्म वरील चालान भरून अमाउंट ट्रान्सफर करावी लागेल.
इ-ऑक्शन बद्दल अधिक माहितीसाठी https://ibapi.in या लिंक वर जाऊन माहिती घेता येईल. पंजाब नॅशनल बँकेच्या ट्विट मध्ये सुद्धा हि लिंक दिलेली आहे. या संधीचा लाभ घेऊन आपले मनपसंद घर घेण्याचा नक्की प्रयत्न करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.