पेनकिलर घेणे बंद करा, वारंवार होणारी अंगदुखी कमी करणारे सोपे उपाय

तुम्हाला वारंवार अंगदुखीचा त्रास होतो का? अंग सतत दुखते अशी तुमची तक्रार असते का?

दिवसा किंवा रात्री नेहेमीच अंग दुखत असते असे तुम्हाला वाटते का? तुमचे स्नायू अथवा सांधे नेहेमी दुखतात का?

तसे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. ह्या लेखात आम्ही तुम्हाला अंगदुखीवरचे अगदी सोपे, घरगुती उपाय सांगणार आहोत.

आयुष्यात प्रत्येकानेच कधी ना कधीतरी अंगदुखीचा सामना केलेला असतोच.

शरीराचे निरनिराळे अवयव जसे की पाठ, हात, पाय, कंबर, गुडघे दुखणे ही एक कॉमन समस्या आहे.

वयाच्या निरनिराळ्या टप्प्यावर जवळजवळ प्रत्येकाला ह्या समस्येचा अनुभव येतो.

अंगदुखीची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतात. काही इजा झाली असताना किंवा आजारपण आले असताना होणारी अंगदुखी तात्पुरत्या स्वरूपाची असते.

योग्य औषधोपचार घेऊन आजारपण बरे झाले की अशी तात्पुरत्या स्वरूपाची अंगदुखी बरी होते.

परंतु काही लोकांना मात्र नेहेमीच अंगदुखीचा त्रास होतो. त्यांना इतर काही आजार नसला किंवा शारीरिक इजा झालेली नसली तरीही अंग दुखण्याचा त्रास होतो.

अशा प्रकारच्या अंगदुखीचे प्रमुख कारण असते ते म्हणजे स्ट्रेस. स्ट्रेसमुळे शरीराची एकूण प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे वारंवार अंगदुखीचा सामना करावा लागतो.

सारख्या उद्भवणाऱ्या अंगदुखीचे दुसरे महत्वाचे कारण असते ते म्हणजे डीहायड्रेशन.

शरीरातील पाण्याची कमतरता. आपण जर दररोज पुरेसे पाणी प्यायले नाही तर, शरीरातील पाण्याची पातळी कमी होत जाते आणि त्याचा परिणाम अंगदुखी होण्यात होतो.

अंगदुखी दोन प्रकारची असू शकते. सांधेदुखी आणि स्नायूदुखी.

पहिल्या प्रकारात शरीरातील सगळे सांधे दुखतात तर दुसऱ्या प्रकारात निरनिराळे स्नायू म्हणजेच मसल्स दुखतात.

अशा प्रकारच्या अंगदुखीवर खालील घरगुती उपाय अगदी उत्तम प्रकारे उपयोगी पडतात.

१. पोषक आणि संतुलित आहार घ्या.

प्रोटिन्स,  कार्बोहायड्रेटस, विटामिन्स आणि मिनरल्स तसेच योग्य प्रमाणात फॅट्स यांचे मिश्रण असणारा आहार हा संतुलित आहार मानला जातो.  अशा पद्धतीचा संतुलित आहार घेणे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते.

अंगदुखी दूर ठेवण्यासाठी या प्रकारचा संतुलित आणि पोषक आहार घेण्याबरोबरच आपल्या आहारात विटामिन ‘डी’ चे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते, कारण त्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि फॉस्फरस योग्य प्रमाणात शोषले जाते आणि त्याचे प्रमाण व्यवस्थित राखले जाते.

शरीरातील कॅल्शियम योग्य प्रमाणात असणे शरीरातील हाडांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच सांधेदुखी होऊ नये यासाठी अतिशय आवश्यक असते.

२.  भरपूर पाणी प्या. 

डीहायड्रेशन हे अंगदुखीचे एक प्रमुख कारण आहे.  दिवसभरात भरपूर पाणी पिऊन ही समस्या अगदी सहज दूर ठेवता येऊ शकते.

आपल्या वजनाच्या प्रमाणात दर 25 किलोला एक लिटर अशा प्रमाणात पाणी पिणे, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी आवश्यक असते.

उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे वजन जर 75 किलो असेल तर त्या व्यक्तीने दिवसभरात किमान तीन लिटर पाणी पिणे आवश्यक असते.

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे  मसल्स अथवा स्नायू दुखण्याचे प्रमाण खूप कमी होते.

त्याच प्रमाणे भरपूर पाणी पिण्यामुळे शरीरातील टॉक्सिक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. शरीरात पाण्याचे योग्य प्रमाण राखल्यामुळे सांध्यांची लवचिकता टिकण्यास देखील मदत होते.

३. आहारात नैसर्गिक मसाल्यांचा समावेश करा. 

जर तुम्हाला वारंवार उद्भवणार्‍या अंगदुखीचा सामना करावा लागत असेल  तर, संतुलित आहार घेण्याबरोबरच आहारात नैसर्गिक मसाल्यांचा समावेश करण्यास विसरू नका.

आले, लसूण, हळद,  दालचिनी  यासारख्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये नैसर्गिक रित्या दुखणे कमी करणारी तत्वे असतात. (anti-inflammatory प्रोपर्टीज)  त्यामुळे अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्यास दुखणारे सांधे अथवा स्नायू  बरे होण्यास मदत होते.

शरीराची एकूण प्रतिकारशक्ती नैसर्गिक मसाल्यांच्या सेवनाने वाढते असे आढळून आले आहे.

तर हे आहेत अगदी सोपे आणि सहज करता येण्याजोगे तीन घरगुती उपाय, ज्यांच्या मदतीने आपण नेहमी उद्भवणार्‍या अंगदुखीवर सहजपणे मात करू शकतो.

मित्र-मैत्रिणींनो, तुम्हीदेखील या घरगुती उपायांचा अवश्य वापर करा. या उपायांचा झालेला लाभ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.

तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या साठी हा लेख शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “पेनकिलर घेणे बंद करा, वारंवार होणारी अंगदुखी कमी करणारे सोपे उपाय”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।