प्रत्येकाला जीवनात शांतता आणि आनंद हवा असतो. पण धावपळीच्या जीवनात हे कसं मिळवायचं? आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत अशा २० सोप्या आणि प्रभावी गोष्टी ज्या तुम्हाला आंतरिक शांती मिळवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी नक्कीच मदत करतील. मनाचेTalks च्या या खास पोस्टमध्ये, आम्ही तुम्हाला हे सोपे बदल कसे करायचे ते सांगणार आहोत.
प्रत्येक नवीन सवय लागायला थोडा वेळ लागतो – साधारणपणे ६६ दिवस. पुढील काही आठवडे या टिप्सचा वापर करा आणि तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला!
तुमच्या आंतरिक शांती आणि आनंदासाठी २० महत्त्वाच्या गोष्टी:
१. साध्या सवयींनी मनाला शांत करा.
जेव्हा आपलं जीवन एखाद्या वादळासारखं धावपळीचं किंवा मनात अनेक विचारांचं काहूर माजलेलं असतं, तेव्हा स्वतःला स्थिर करण्यासाठी अगदी साध्या-सोप्या गोष्टी करून बघा. सकाळी उठल्यावर आपलं अंथरूण व्यवस्थित करणं, झाडांना पाणी घालणं किंवा जेवण झाल्यावर स्वतःचीच प्लेट धुवून ठेवणं… यांसारख्या छोट्या-छोट्या सवयींमुळे मन शांत होतं आणि एक प्रकारची स्थिरता येते.
२. अनावश्यक गोष्टी आणि आवाजांना बाजूला सारायला शिका.
आपल्या आयुष्यात कोणती गोष्ट महत्त्वाची आहे किंवा कोणाचे विचार आपण ऐकायला हवेत, हे ठरवणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक मोठ्या आवाजाकडे किंवा गर्दीकडे लक्ष देण्याऐवजी, जे खरं आणि प्रामाणिक आहे, ते ऐकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टींची किंवा लोकांची आपल्याला गरज नाही, त्यांच्यापासून दूर राहिल्याने आपलं मन शांत राहतं आणि अनावश्यक गोंधळ टळतो.
३. तुमच्या चांगल्यासाठी वेगळे पर्याय निवडा.
तुमच्या जीवनातील अनेक गोष्टी तुम्ही दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांचा परिणाम आहेत. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल हवा असेल, तर आजपासून चांगले निर्णय घेण्यास सुरुवात करा.
४. व्यस्त असण्यापेक्षा अधिक उत्पादक व्हा.
फक्त व्यस्त असणे म्हणजे काम करणे नव्हे. तुम्ही करत असलेल्या कामातून खरोखरच प्रगती होतेय का हे तपासा. एकाच ठिकाणी गोल फिरत राहण्यापेक्षा, पुढे जाणारे छोटे पाऊल उचला.
५. दररोज छोट्या, अर्थपूर्ण कामांसाठी वेळ द्या.
तुमच्याकडे फक्त १५ मिनिटे असली तरी हरकत नाही. ती १५ मिनिटे अर्थपूर्ण बनवा. योग्य दिशेने एक छोटे पाऊल टाका. काहीही न करण्याच्या थकव्यापेक्षा, छोटे पण अर्थपूर्ण काम करून थकलेले असणे नेहमीच चांगले असते.
६. नकारात्मक गोष्टींपासून दूर न जाता, सकारात्मक गोष्टींकडे वाटचाल करा.
नकारात्मक परिस्थितीतून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सकारात्मक गोष्टींकडे लक्ष केंद्रित करणे आणि त्या दिशेने वाटचाल करणे.
७. योग्य ते करा, जरी ते सोपे नसले तरी.
फक्त सोपे आहे म्हणून काहीतरी करणे योग्य नाही. योग्य ते करा, भलेही ते कठीण असो. दीर्घकाळात यामुळे तुम्हाला कमी ताण येईल आणि अधिक समाधान मिळेल.
८. स्वतःची तुलना फक्त स्वतःशी करा (इतरांशी नाही).
इतरांकडे काय आहे किंवा ते कुठे आहेत याचा विचार करू नका. तुम्ही त्यांच्या जागी नाही. तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर आणि उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा. तुलना करणे सोडल्यास, तुमच्या ध्येयांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.
९. वेगळे विचार करणाऱ्या लोकांबाबत अधिक सहिष्णू व्हा.
वेगवेगळे विचार असलेल्या लोकांशी संवाद साधा. प्रश्न विचारा, लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा की आपण आपल्या मतभेदांच्या बाबतीत लोकांबरोबर कसे वागतो, हेच प्रेम, आदर आणि दयाळूपणाबद्दल आपल्याला किती समजले आहे, हे दाखवते.
१०. माफ करायला शिका आणि गोष्टी सोडून द्या.
आपण अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद घालतो, फक्त आपला अहंकार जिंकावा म्हणून. कधीकधी लोकांवर प्रेम करण्यापेक्षा वाद जिंकणे जास्त महत्त्वाचे वाटायला लागते. अशा वेळी, आपण आपल्या विचारांचा आणि नात्यांना दिलेल्या महत्त्वाचा पुन्हा एकदा विचार करायला हवा. क्षमा केल्याने मन शांत होते.
११. काहीही अपेक्षा न ठेवता द्या.
जर तुम्ही लोकांना मदत केली किंवा काही दिले आणि त्यांनीही तुमच्यासाठी तसेच करावे अशी अपेक्षा ठेवली, तर तुम्हाला बहुतेकदा निराशाच मिळेल. कारण प्रत्येकाचे विचार, त्यांच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आणि त्यांच्या आयुष्यातील प्राधान्ये वेगळी असतात. त्यामुळे, काहीही परत मिळण्याची अपेक्षा न ठेवता, आपले चांगले काम करत राहा. तुम्ही दिलेले प्रत्येक चांगले काम शेवटी सुंदरच फळ देते.
१२. जगात तुम्हाला जो बदल हवा आहे, त्याची सुरुवात स्वतःपासून करा.
तुम्ही दुसऱ्यांसाठी जे काही चांगले करता, ते खऱ्या अर्थाने तुमच्यासाठीच असते. जेव्हा तुम्ही इतरांशी प्रेमाने वागता, तेव्हा तुम्हालाही स्वतःवर प्रेम करायला शिकायला मिळते. त्यामुळे, लोकांमध्ये लोकप्रिय होण्याचा विचार न करता, प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे वागत राहा. यामुळे तुम्हाला आंतरिक समाधान मिळेल.
१३. आत्ताच्या क्षणात जगायला शिका.
आजकाल डिजिटल वस्तू खूप चांगल्या आहेत, पण त्यांना आपल्यावर जास्त राज्य करू देऊ नका. जेव्हा तुम्ही लोकांसोबत असता, तेव्हा तुमचा फोन बाजूला ठेवा. त्यांच्या डोळ्यात पाहून बोला, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या गोष्टी ऐका. यामुळे तुम्ही त्या क्षणाचा पूर्ण आनंद घेऊ शकता.
१४. शब्दांपेक्षा तुमच्या कृतींना बोलू द्या.
आपल्या जवळच्या माणसांसोबतचे नाते हे आपल्या मनाच्या शांतीसाठी आणि आनंदासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यांना ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे बोलून दाखवणे नक्कीच महत्त्वाचे आहे, पण त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे आहे की तुमच्या कृतीतून तुम्ही ते दाखवावे. कारण, नुसत्या शब्दांपेक्षा, तुमच्या कृतीतून व्यक्त होणारे प्रेम अधिक खोलवर पोहोचते आणि नाते अधिक घट्ट करते.
१५. कृतज्ञता शोधा, ती तुमच्या आसपासच आहे.
कृतज्ञ असणं हे काही मोठं रहस्य नाही, तर तो आपल्या मनाचा एक सोपा निर्णय आहे. कधीकधी आपण कृतज्ञ राहायला विसरतो, पण अशा वेळी पुन्हा आठवण करून स्वतःला कृतज्ञतेकडे वळवा. रोज सकाळी उठल्यावर, तुमच्या आयुष्यात असलेल्या चांगल्या गोष्टींसाठी मनापासून आभार मानल्याने, तुमच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो आणि मन हलके होते.
१६. तक्रार करणे थांबवा, संधी शोधायला शिका.
जीवनात तक्रार करणे खूप सोपे असते, नाही का? पण जेव्हा कधी तुम्हाला तक्रार करायची इच्छा होईल, तेव्हा एक छोटासा बदल करून बघा: ‘मला हे काम करावं लागतंय’ असं म्हणण्याऐवजी, ‘मला हे काम करण्याची संधी मिळाली आहे’ असं म्हणण्याचा सराव करा. कारण ज्या गोष्टींची आपण तक्रार करतो, त्यापैकी अनेक गोष्टी इतरांसाठी एक मोठी संधी असू शकतात. हा छोटासा बदल तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकू शकतो.
१७. नव्या वाटा शोधा, नव्या अनुभवांना सामोरे जा.
भविष्यात काय घडेल हे आपल्याला माहीत नसते, म्हणून नवीन काहीतरी सुरू करायला कशाला घाबरायचे? कधीकधी हीच अनिश्चितता आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जाते, जिथे आयुष्याची खरी जादू दडलेली असते. रोजच्या चौकटीतून बाहेर पडा, काहीतरी नवीन करून बघा. तुम्ही स्वतःहून नवीन गोष्टींचा स्वीकार कराल, तेव्हा तुमच्या आयुष्यात नवनवीन शक्यतांचे दरवाजे उघडतील आणि आयुष्य अधिक सुंदर वाटेल.
१८. छोट्यामोठ्या अडचणींना फार महत्त्व देऊ नका, त्यांना सोडून द्या.
दिवसभरात घडणाऱ्या लहानसहान गोष्टींमुळे स्वतःला निराश करून घेऊ नका. लक्षात ठेवा, खरा आनंद नेहमी आपल्या आतूनच येतो. त्यामुळे, ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने महत्त्वाच्या आहेत, त्यांच्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा आणि अनावश्यक गोष्टींना मनातून काढून टाका. आलेल्या अडचणींकडे त्रासाच्या दृष्टीने न पाहता, त्यातून काहीतरी शिकण्याची किंवा पुढे जाण्याची प्रेरणा म्हणून बघा. यामुळे मन हलके होईल आणि तुम्ही आनंदाने जगू शकाल.
१९. जीवनातून मिळणारे धडे स्वीकारा, प्रत्येक अनुभव तुम्हाला घडवतो.
तुम्ही एक पूर्णत्वाला पोहोचलेला व्यक्ती नसून, सतत प्रगती करत असलेला एक ‘प्रवास’ करत आहात. याचा अर्थ असा की तुम्ही एका झटक्यात नाही, तर हळूहळू पुढे जात असता. जीवनातील प्रत्येक गोष्टीतून तुम्ही काहीतरी शिकत असता. अनेकदा कठीण अनुभव आपल्याला असे महत्त्वाचे धडे शिकवतात, जे आपल्याला इतर कोणत्याही प्रकारे शिकायला मिळत नाहीत. त्यामुळे, जीवनात समस्या येणे ही वाईट गोष्ट नाही; उलट, याचा अर्थ असा की तुम्ही काहीतरी प्रयत्न करत आहात, पावले टाकत आहात आणि पुढे जात आहात. समस्या नसलेला माणूस म्हणजे काहीही न करणारा माणूस!
२०. ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत, त्यावरच लक्ष केंद्रित करा.
प्रत्येक गोष्टीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमचा सर्वोत्तम प्रयत्न करा आणि त्यानंतर त्या गोष्टींना त्यांच्या मार्गावर सोडून द्या. जे व्हायचं असेल ते आपोआप होईल. ज्या गोष्टींवर तुमचे नियंत्रण नाही, त्याबद्दल चिंता करत स्वतःला बांधून ठेवू नका. आयुष्यातील एक चूक किंवा एखादे वाईट प्रकरण म्हणजे तुमच्या आयुष्याची संपूर्ण कथा नसते. म्हणून, जुनी पाने उलटून, पुढे जाण्यासाठी नवीन पावले टाकत राहा.
![]()
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.