माहित आहे का? चीनमध्ये फटाक्यांची सुरुवात बांबू जाळून केली गेली!!

फटाके आपल्या सण समारंभाचा अभिन्न हिस्सा असतात. आता प्रदूषणाच्या वाढत चाललेल्या दुष्परिणामांमुळे जरी सुप्रीम कोर्टाने फटाके फोडण्यावर निर्बंध आणले असले तरी. फटाक्यांचं प्रमाण थोडं कमी होण्यापलीकडे जास्त काही फरक पडलेला दिसत नाही. आता या फटाक्यांचा उपयोग आपण रोषणाई, उत्साह, आनंद दाखवण्यासाठी करतो पण इसवीसन पूर्व काळात चीनमध्ये या फटाक्यांचा जन्म का झाला माहित आहे? तर चक्क वाईट आत्म्यांना घालवण्यासाठी चीनमध्ये सर्वात आधी फटाके बनवायला सुरुवात झाली. तर अश्या या फटाक्यांचा रोचक इतिहास आपण या लेखात समजून घेऊ.

फटाक्यांचा इतिहास

फटाके

फटाके आणि गनपावडर यांचा शोध केव्हापासून लागला याबद्दल बऱ्याच इतिहासकारांचे मत वेगवेगळे आहे. त्यामुळे त्याची तारीख, वर्ष याचा नक्की तपास यातून घेणे इतिहासकारांसाठी अवघड आहे. असं मानलं जातं कि चीनमध्ये हान राजवटीच्या काळात इसवीसन पूर्व २०६ मध्ये फटाके बनवण्याची सुरुवात झाली ती मृतात्म्यांना घालवण्यासाठी म्हणजेच पळवण्यासाठी. तर आता हे यांचे फटाके होते कसे ते ऎका!! तर मृतात्म्यांना घालवण्यासाठी यांना अभिप्रेत असलेले फटाके म्हणजे ज्यातून धमाका होईल असा आवाज. असा धमाका करणारा आवाज उत्पन्न करण्यासाठी यांनी बांबू आगीत फेकले. हे बांबू आगीत फेकल्यानन्तर हळू हळू काही प्रमाणात आवाज होऊ लागला आणि शेवटी यातून एक मोठा स्फोट झाला. बांबूंमध्ये काही पोकळी असते. त्यामध्ये एक प्रकारचा गॅस असतो. हा गॅस गरम होऊन प्रसरण पावतो आणि मग तो बांबू फुटल्याने धमाकेदार आवाज होतो. हे होतं मूळ फटाक्याचं रूप.

हा त्या चिनी लोकांसाठी रोमांचकारी अनुभव होता. या भोळ्याभाबड्या लोकांना हा ठाम विश्वास होता कि वाईट आत्मा असतात. आणि हा बांबूचा स्फोट त्या मृतात्म्यांना घाबरवण्यासाठी पुरेसा आहे. कारण यामागचं विज्ञान त्यांच्यापासून कोसो दूर होतं. मृतात्म्यांना घालवणं हा त्यांच्यासाठी एक शुभ संकेत होता. म्हणून बांबूचा स्फोट होणं हे आनंद आणि उत्सवाचं प्रतीक मानल्या जाऊ लागलं. आणि मग भूत प्रेत घालवण्यासाठी बांबूचे हे फटाके फोडणं त्यांच्या परंपरेचा अविभाज्य भाग बनलं.

पुढे हळू हळू हे बांबूचे फटाके वापरणं लग्न, नववर्ष, पार्टी अशा कार्यक्रमांचा अविभाज्य भाग बनलं. जोपर्यंत गनपावडर चा शोध लागला नव्हता तोपर्यंत फटाके म्हणजे बांबूंना आगीत जाळून स्फोट करणं!! पुढे गनपावडरचा शोध लागल्यानन्तर पोकळ बांबूंमध्ये गनपावडर भरून त्याचा स्फोट केला जाऊ लागला. याने साहजिकच आवाजाचं प्रमाण वाढलं.

फटाक्यांच्या शोधाच्या बाबतीत चीनमध्ये आणखी एक दंतकथा प्रचलित आहे. त्यानुसार फटाक्यांचा शोध हा एका दुर्घटनेतून झाला. एका आचाऱ्याने काही मसालेदार पदार्थ बनवताना चिली सॉल्टपीटर आगीत टाकलं. त्यामुळे रंगीत आगीच्या ज्वाला उठल्या. आणि सर्वांची उत्सुकता वाढली. मग या आचाऱ्यांनीच सॉल्टपीटर बरोबर सल्फर, कार्बोन यांचा वापर करून आवाज, रंग यात विविधता आणली. आणि इथूनच फटाक्यांच्या आतषबाजीला सुरुवात झाली.

पुढे साधारण इसवीसन १०४० साली चीनमध्ये या तीन रसायनांशिवाय आणखी इतर रसायनं कागदात लपेटून ‘फायर पील’ बनवण्याची सुरुवात झाली. पुढे हि आतिषबाजी रंगीत करण्यासाठी वेगवेगळी रसायनं वापरायला सुरुवात झाली.

इतर देशांमध्ये फटाक्यांचा वापर कसा आणि केव्हा सुरु झाला

भारत आणि इतर पूर्वेच्या देशांमध्ये सुद्धा फटाके बनवण्याची कला अवगत होतीच. वर्ष १५८ ला युरोपमध्ये फटाके वापरणे सुरु झाले. युरोपात सर्व प्रथम सुरुवात झाली ती इटलीमध्ये. इंग्लडमध्ये सुद्धा समारंभात फटाक्यांची आतषबाजी केली जाऊ लागली. चौदाव्या शतकाच्या सुरुवातीला जवळजवळ जगभरात फटाक्यांचा वापर सुरु झाला.

१६ व्या शतकात अमेरिकेने प्रामुख्याने मिलिटरी मध्ये याचा वारप करण्याची सुरुवात केली. त्यामुळे विस्फोटकांच्या कित्येक कंपन्या सुरु झाल्या. कित्येक लोकांना रोजगार मिळाले. पुढे कोलंबस जेव्हा १८९२ साली अमेरिकेत आला तेव्हा ब्रुकलिन ब्रिजवर आतषबाजी झाल्याचे काही इतिहासकारांनी नोंदवलेले आहे. परंतु १९ सा व्य्या शतकाच्या अंतापर्यंत आवाजाचे दुष्परिणाम पुढे येऊ लागले आणि ‘सोसायटी फॉर सप्रेशन ऑफ अंनेसेसरी नॉईस’ ची सुरुवात झाली.

आता आपण भारतातला फटाक्यांचा इतिहास बघू

एका अभ्यासानुसार मुघल काळाआधीच भारतात फटाके वापरले जात होते. मुगलांच्या सुरुवातीच्या काळात जनावरांना घाबरवण्यासाठी फटाके वापरले जाऊ लागले. कौटिल्य अर्थशास्त्रात एका ज्वालाग्राही चूर्णाचा आणि त्यापासून बनवल्या गेलेल्या फटाक्याचा उल्लेख सुद्धा आढळतो. असा हा फटाक्यांचा रंगीत इतिहास. याबद्दल तुम्हीही काही नव्या नवलाईची माहिती ऐकली असेल तर कमेंटमध्ये लिहा.


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।