बाजारातील गतिरोधक आणि थांबे… (Circuit filter/breaker)

Circuit filter/breaker म्हणजे काय

भागबाजारात इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे समभागांचे भाव वर खाली होत असतात. एकाच वेळी अनेक हेतूने येथे गुंतवणूक केली जाते आणि कमीत कमी तोटा आणि अधिकाधिक फायदा, असा येथे भाग घेणाऱ्या प्रत्येकाचा हेतू असतो. सर्वसाधारणपणे मागणी आणि पुरवठा या तत्वाप्रमाणे — म्हणजे मागणी अधिक आणि पुरवठा कमी असेल भावात वाढ व पुरवठा अधिक आणि मागणी कमी असेल तर भावात घट होते. भागबाजारात वैयक्तिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार एकाच वेळी व्यवहार करीत असल्याने त्यांच्या सामूहिक मानसिकतेवर बाजार वरखाली होत असतो आणि तो कोणतीतरी एक दिशा पकडतो.

समुहाची अशी मानसिकता होणे याची अनेक कारणे आहेत. यामध्ये एखाद्या व्यवसायात आलेली तेजी मंदी, सरकारी धोरण, कररचनेतील बदल, देशांतर्गत स्थिती, जगातीक स्थिती, नैसर्गिक आपत्ती, पावसाचा अंदाज, कंपनीच्या धोरणातील बदल,कामगीरी, कंपनीविषयी पसरलेली अफवा इत्यादी अनेक कारणांमुळे लोकाना त्या कंपनीचे समभाग आपल्याकडे असावेत अथवा नसावेत असे अचानक वाटू शकते. तर बाजारातील काही घटक आपासातील संगनमताने कृत्रिमरीत्या खरेदी विक्री करून भावात मोठ्या प्रमाणात फरक पाडू शकतात. यामूळे छोट्या गुंतवणूकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते असे होवू नये म्हणून सेबीने एका विशिष्ठ मर्यादेतच भाव रहावेत यासाठी गतीरोधक बसवले आहेत. यांना circuit filters असे म्हणतात. सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बाजार व्यवस्थापन कमिटी ही मर्यादा किती असावी ते ठरवते. या गतीरोधकामुळे किमान त्यादिवशी तरी आधीच्या बंद बाजारभावापेक्षा विहित मर्यादेतच वर खाली होतील. सध्या ही मर्यादा २,५,१०,२० % असून डेरिव्हेटीव करीता कोणतीही मर्यादा नाही या पाच प्रकारांत विभागली असून अपवादात्मक परिस्थिथित ती मधे बदल होवू शकतो.या मर्यादेत ऑर्डर टाकता येते, ज्यावेळी आपणांस संगणक पडद्यावर फक्त खरेदीदार अथवा फक्त विक्रेते दिसतात.तेव्हा त्याचा उल्लेख अप्पर /लोअर सर्किट लागले आहे असा करण्यात येतो .

Circuit-filter-breakerव्यवहार थांबवण्याचे नियम

या गतीरोधकाप्रमाणे काही थांबेही आहेत समभाग किंवा निर्देशांकात (Share or Index) त्यात मर्यादेपलीकडे वटघट (बाजारभाव कमी अथवा जास्त) झाली तर हे थांबे (Circuit breker) कार्यान्वित होवून व्यवहार काही काळ किंवा त्या दिवसापुरते त्यातील सर्व व्यवहार थांबवले जातात .सध्या sensex आणि nifty तसेच काही निवडक समभाग यांना १०,१५ आणि २० % बाजारभाव जास्त कमी होण्यावर असे थांबे बसवले आहेत.

१. १० % या मर्यादेच्या जवळपास कोणत्याही एका बाजारात (BSE/NSE) जर दुपारी १ पर्यंत चढ उतार झाली तर ४५ मिनिटे दोन्ही बाजारतील व्यवहार थांबवले जातात आणि १५ मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी (ज्यामध्ये एक निश्चित भाव मिळतो) देवून एक तास थांबवले जातात .
२. जर परिस्थिती १ नंतर परंतू दुपारी २:३० पर्यंत उद्भवली तर १५ मिनिटे व्यवहार थांबवून १५ मिनीटे प्री कॉल ऑक्शन साठी देवून अर्ध्या तासाकरिता थांबवले जातात आणि २:३० वाजताच त्या दिवसापूरते यातील व्यवहार थांबवले जात नाहीत .
३. जर अशी परिस्थिती बाजार चालू झाल्याझाल्याच उद्भवली आणि एकदा व्यवहार थांबवून व्यवहार पुन्हा सुरू झाले त्यानंतर १० % फरक पडला तर व्यवहार थांबवले जात नाहीत मग दुपारी एक पर्यत १५ % चढ उतार आला तर १ तास ४५ मिनिटे व्यवहार थांबवून १५ मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी देवून दोन तास थांबवले जातात .
४. दुपारी एक ते दोन मधे १५ % चढ उतार आला तर ४५ मिनीटे थांबवून १५ मिनिटे प्री कॉल ऑक्शनसाठी देवून एक तास थांबवले जातात .
५. जर दोन नंतर १५ %कमी जास्त फरक पडला तर उरलेल्या पूर्ण वेळेसाठी व्यवहार थांबवले जातात .
६. दिवसभरात कधीही २० % कमी जास्त फरक पडला तर उरलेल्या पूर्ण वेळेसाठी व्यवहार थांबवले जातात.

सर्किट फिल्टर आणि सर्किट ब्रेकर लागल्याने छोट्या गुंतवणूकदारांचे संभाव्य नुकसान कमी होते . त्याचप्रमाणे जे खरेखुरे गुंतवणूकदार आहेत ते अचानक झालेली घट अथवा वाढ यामुळे गोंधळून जावू शकतात .त्यांना आपल्या गुंतवणूकीचे संदर्भात पुनर्विचार करून योग्य निर्णय घेण्याची संधी मिळते.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “बाजारातील गतिरोधक आणि थांबे… (Circuit filter/breaker)”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय