Author: श्री. उदय पिंगळे

बँकिंग व्यवहारातल्या तक्रारी कशा सोडवाव्यात

समजून घ्या बँकिंग आणि व्यवहारात तक्रार असेल तर काय आणि कसे करावे?

बँकिंग व्यवसाय कसा चालतो ते आपल्याला माहीत आहेच. जनतेकडून व्याजाने ठेवी स्वीकारून भांडवलाची जरुरी असलेल्या व्यक्ती आणि संस्था यांना अधिक व्याजाने देणे हा कोणत्याही व्यापारी बँकेचा मुख्य व्यवसाय. या बँका सहकारी, सरकारी व खाजगी स्वरूपाच्या आहेत.

पर्यायी गुंतवणूक निधी

पर्यायी गुंतवणूक निधी म्हणजे काय?

सेबीच्या पर्यायी गुंतवणूक निधी (Alternetive Investment Funds) 2012 च्या नियमावलीतील प्रकार 2 नुसार व्यावसायिक गुंतवणूक व्यवस्थापकांकडून (Fund Manager) ही योजना राबवण्यात येईल. यासाठी एस बी आय व्हेंचर कॅपिटल निधी व्यवस्थापक म्हणून काम पाहातील.

जीवन विमा (लाईफ इंश्युरन्स)

आपण काढलेल्या इन्शुरन्स बद्दल तक्रार असेल तर काय करावे

यापूर्वीच्या लेखातून आपण जीवन विमा, सर्वसाधारण विमा म्हणजे काय? त्यांचे विविध प्रकार यांची माहिती करून घेतली आहेच. विमा हा विमाकंपनी आणि ग्राहक यातील कायदेशीर करार असून त्यातील तरतुदीनुसारच त्याची अंमलबजावणी केली जाते. जोखीम व्यवस्थापन हे...

चिट फ़ंड म्हणजे काय

चिट फ़ंड म्हणजे काय? आणि चिट फंडाचे काम कसे चालते?

चिट म्हणजे वचनचिठ्ठी, असंघटित क्षेत्रातील लोक, ज्यांचा बँकिंग व्यवहाराशी अत्यंत कमी संबंध येतो, अशा समान उत्पन्न असलेल्या गरजू लोकांना आपल्या आर्थिक गरजा ताबडतोब भागवण्यासाठी या फंडाचा उपयोग होतो. भिशीच्या जवळपास जाणारा हा बचतीचा प्रकार असून त्यास अनेक वर्षांची परंपरा आहे. काही चिट फंड कंपन्या १०० वर्षाहून जुन्या असून अजून व्यवस्थित चालू आहेत.

बँकांमध्ये आपला पैसा असुरक्षित वाटतो?

बँकांमध्ये आपला पैसा असुरक्षित वाटतो? आपली ठेव सुरक्षित ठेवण्याचे अन्य मार्ग वाचा

बँकेतील एकुणऐक रकमेची सुरक्षितता आवश्यक असून अशी सुरक्षितता मिळवण्याची संधी ठेवीदारांस असली पाहिजे. सध्याच्या परिस्थितीत आपली ठेव सुरक्षित ठेवायचे आणि त्यातून हमखास नियमित उत्पन्न मिळवण्याचे अन्य मार्ग असे–

पी. एम. सी. बँकेच्या घोटाळ्यानंतर

पी. एम. सी. बँक घोटाळा आणि सिबिल रोपोर्टच्या विश्वासार्हतेबद्दल उभे राहिलेले प्रश्नचिन्ह

‘बँका KYC करतात बँकेची KYC कुणी करायची?’ अशा आशयाच्या पोस्ट व्हाट्सअप्पवर सध्या झळकत आहेत या विधानात नक्कीच तथ्य आहे. एकंदरीतच आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे तिच्या सत्यअसत्याविषयी यातून शंका निर्माण होतात. यात सहभागी तपास यंत्रणा एकतर सुस्त झालेल्या आहेत आणि यात सुधारणा होण्याची गरज त्यांना वाटत नाही.

बँकिंग व्यवहार

बँकिंग व्यवहार करताना हे नियम आपण माहित करून घेतलेच पाहिजेत

अनेकजण नियम काय आहेत हेच माहीती करून घेत नाहीत अथवा नियम माहीत असेल किंवा इतरांकडून समजला आणि आपल्यावर अन्याय झाला असेल तर त्याची योग्य ठिकाणी तक्रार करून पाठपुरावा करण्याऐवजी ज्यांचा या गोष्टीशी संबंध नाही अशा लोकांसमोर आपले गाऱ्हाणे गात बसतात. ही वृत्ती सोडून नियम काय आहेत ते माहीती करून घ्यावे आणि जरूर पडल्यास संबंधितांच्या लक्षात आणून द्यावेत.

इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX)

इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX) बद्दल हे माहित आहे का तुम्हाला?

इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX) हा मुंबई शेअरबाजारांने आपल्या उपकंपनीमार्फत स्थापन केलेला आणि भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहे. 9 जानेवारी 2017 रोजी या बाजाराचे उद्घाटन आपल्या पंतप्रधानांनी केले आणि 16 जानेवारी 2017 पासून नियमित सौदे...

गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT-City)

गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT-City) काय आहे माहित आहे का तुम्हाला?

येथे कार्यालये, निवासी क्षेत्र, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल्स, करमणूक केंद्रे असतील. घरातून कामाच्या ठिकाणी सहज चालत जाता येईल अशी येथे व्यवस्था आहे, भविष्यात ज्यांना सायकलने यायचे आहे त्यांच्यासाठी विशेष मार्गिकेची योजना आहे. याशिवाय बाहेरुन सहज येता येईल अशी वाहतूक व्यवस्था आहे. याची रचना आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञान यावरील उद्योगांना केंद्रस्थानी धरून करण्यात आली आहे.

मर्यादित भागीदारी / Limited Liablity Partnership म्हणजे काय?

व्यवसाय भागीदारीत करता येतो हे आपल्याला माहिती आहेच. अशा पारंपरिक भागीदारीत प्रत्येक भागीदारची जबाबदारी अमर्यादित असते. एखाद्या भागीदाराने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका, यात असलेल्या सामूहिक जबाबदारीमुळे इतर सर्व भागीदारांना बसू शकतो. त्यामुळे पूर्ण व्यवसायच...

error: © Copyrights 2023. All rights reserved!