जाणून घ्या कडीपत्त्याच्या रसाचे आश्चर्यकारक फायदे

कोणत्याही खमंग पदार्थाची फोडणी कडीपत्त्याशिवाय अपूर्ण आहे. कडीपत्त्यामुळे पदार्थाला छान स्वाद येतो. सांबार, कढी असे पदार्थ तर कडीपत्ता घातल्याशिवाय केलेच जात नाहीत.

परंतु कडीपत्ता फक्त पदार्थाचा स्वादच वाढवतो असे नाही तर कडीपत्त्यामध्ये अनेक पोषक गुणधर्म ही आहेत. म्हणूनच पारंपरिक भारतीय भोजनात कडीपत्त्याचा वापर सढळ हाताने होतो.

कडीपत्त्यामध्ये आयर्न, झिंक, कॉपर, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए आणि बी, फॉलीक ऍसिड आणि अमिनो ऍसिड अशी पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात.

इतका पौष्टिक असला तरी बहुतेकवेळा आपण पदार्थात घातलेला कडीपत्ता काढून टाकतो. तो खाल्ला जात नाही.

परंतु ह्यावर उपाय आहे. कडीपत्त्याच्या पानांचा रस किंवा जूस जर नियमित प्यायला तर तो आरोग्यासाठी खूपच गुणकारी आहे.

आज आपण कडीपत्त्याच्या पानांचा रस पिण्याचे फायदे जाऊन घेणार आहोत. पण त्याआधी पाहूया की कडीपत्त्याचा रस कसा तयार करायचा?

कडीपत्त्याचा रस दोन प्रकारे करता येतो.

१. कडीपत्त्याची १२ ते १५ पाने स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये थोडे पाणी घालून बारिक वाटून घ्या. त्यानंतर त्या पेस्टमध्ये ग्लासभर पाणी घालून नीट मिसळून गळून घ्या. कडीपत्त्याचा जूस तयार आहे.

२. एका पातेल्यात दीड ग्लास पाणी घेऊन त्यात कडीपत्त्याची १५, २० पाने घालून उकळून घ्या. पाणी एक ग्लास होइपर्यंत उकळा. मग ते गाळून त्यात मध घालून प्या.

दोन्ही प्रकारे केलेला कडीपत्त्याचा जूस तितकाच फायदेशीर आहे.

जाणून घेऊया कडीपत्त्याच्या रसाचे फायदे 

१. ऍनिमिया 

कडीपत्त्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि फॉलीक ऍसिड असल्यामुळे ह्या रसाचे नियमित सेवन शरीरातील रक्ताची कमतरता, अशक्तपणा आणि ऍनिमिया कमी करण्यास मदत करते.

२. डिटोक्स 

कडीपत्त्याच्या रसामुळे शरीरातील विषारी पदार्थ (टॉक्सिन्स) बाहेर टाकायला मदत होते. त्यामुळे विविध गंभीर आजारांचा धोका कमी होतो.

३. वजन घटवणे 

कडीपत्त्याच्या रसात भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबी वितळण्यास मदत होते. ज्यांना रस पिणे अवघड वाटत असेल त्यांनी कडीपत्त्याची पाने चावून खावी. त्यामुळे देखील वजन कमी करण्यास मदत होते.

४. पचनशक्ती सुधारते 

कडीपत्त्याच्या रसाचे नियमित सेवन केल्याने पचनशक्ती सुधारते. तसेच गॅसेस, करपट ढेकर, अपचन ह्यासारख्या समस्या दूर होतात.

५. डोळ्यांसाठी गुणकारी 

मोतीबिंदूची समस्या असणाऱ्या लोकांना कडीपत्त्याच्या रसाचा विशेष उपयोग होतो. ह्या रसाच्या नियमित सेवनामुळे मोतिबिंदूची वाढ हळूहळू होते. तसेच डोळ्यांचे एकूण आरोग्य सुधारते.

६. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते 

कडीपत्त्याच्या रसात असणाऱ्या गुणधर्मामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी योग्य प्रमाणात राखली जाते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तर हे आहेत कडीपत्त्याच्या रसाचे गुणधर्म.

सहज उपलब्ध असणारा कडीपत्ता इतका गुणकारी आहे. त्याचे जूस, रस किंवा नुसती पाने अशा कोणत्याही स्वरूपात नियमित सेवन करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment