जाणून घ्या पांढऱ्या केसांच्या समस्येचे निवारण करण्याचे काही घरगुती उपाय.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासोबतच आपल्या सुंदर केसांची निगा राखणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळेच आपले बाह्य सौंदर्य खुलून आत्मविश्वास वाढतो.
दाट, लांब आणि काळेशार केस कुणाला आवडत नाही ?
वडीलधाऱ्या मंडळींना बरेचदा आपण म्हणताना ऐकले असेल कि, “हमने ये बाल धूप मे सफेद नाही किये”. याचाच अर्थ असा कि वाढत्या वयासोबत केसांचा रंग पांढरा होणारच.
हे अगदी नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे.
पण आजकाल बदलेल्या जीवनशैलीमुळे म्हणा किंवा राहणीमानाच्या फरकामुळे म्हणा फार कमी वयात तरुण मुलांचे सुद्धा केस पांढरे झालेले आपण पाहतो.
अशी व्यक्ती ज्यांचे केस वेळेअगोदरच पांढरे झाले आहेत त्या कधी कधी चेष्टेचा विषय बनतात आणि मग कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो.
यावर उपाय म्हणून अनेक जण, बऱ्याचदा केसांचा रंग काळा करण्यासाठी बाजारात मिळणारे रासायनिक प्रक्रियेतून निर्माण केलेले उत्पादनं वापरतात. ज्याचा कधीकधी वाईट परिणाम होऊन फार नुकसान होते.
पांढऱ्या केसांना काळे करण्यासाठी घरगुती उपाय करून पहिले तर…
कारण यामध्ये नुकसान होण्याची शक्यता फार कमी असते. आपल्या आई आणि आजींना आपण बरेचदा घरगुती पद्धतीने तयार केलेले तेल वापरताना पहिले असेल.
आज अशाच काही घरगुती रेसिपीज आम्ही आपल्यासोबत शेअर करणार आहोत ज्यामुळे तुमच्या केसांचा रंग आणि पोत सुधारण्यास मदत होऊ शकेल. चला तर मग जाणून घेऊया काही नवीन रेसिपीस.
१) घरगुती हेयर मास्क
केसांची निगा राखण्यासाठी आपण घरच्या घरी हेअर मास्क तयार करू शकतो. ते बनविण्यासाठी ब्लॅक टी, कांद्याचा रस, गोड लिंब (कडी पत्ता) आणि खोबरेल तेल यांचा वापर प्रामुख्याने होतो. हेयर मास्क बनविण्याची पहिली कृती आपण पाहूया.
१. बदाम तेल आणि लिंबाचा रस याचे मिश्रण
बदामाचे तेल आणि लिंबाचा रस एकत्र करून केसांना लावल्यास यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई हे सत्व केसांना पोषक ठरतात.
व्हिटॅमिन ई केसांच्या मुळापर्यंत जाऊन केसांची नैसर्गिक वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर केसांचा रंगसुद्धा काळाशार राहतो.
हे बनविण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य :
- बदामाचे तेल- ३ मोठे चमचे.
- लिंबाचा रस -२ मोठे चमचे.
कृती :
- तयार केलेले हेयर मास्क केसांना लावण्यासाठी सर्वात आधी एका वाटीमध्ये बदामाचे तेल आणि खोबरेल तेल एकत्र करावे.
- त्यानंतर सर्व व्यवस्थित एकत्र करून टाळू वर लावावे.
- अर्ध्या तासाने सौम्य शाम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
- आठवड्यातून दोन वेळा यापद्धतीने हेअर मास्क लावल्यास पांढरे झालेल्या केसांचा रंग बदलू शकतो.
२. कडी पत्ता आणि खोबरेल तेल यांचे एकत्रित मिश्रण
कडी पत्ता आणि खोबरेल तेलाच्या मिश्रणाने व्हिटॅमिन बी केसांच्या मुळापर्यंत जाऊन केसांचा मूळ रंग टिकून ठेवण्यास मदत होते.
हे मिश्रण केसांची मूळे घट्ट ठेवण्यास उपयुक्त असून उष्णता शोषून घेते. त्यामुळे केसांची नैसर्गिक वाढ होऊन केस दात होतात.
हे मिश्रण बनविण्यासाठी लागणारे साहित्य.
- कडी पत्ता – १ कप
- खोबरेल तेल – १ कप
कृती :
- सर्वप्रथम एका भांड्यामधे कडी पत्त्याची पानं आणि खोबरेल तेल एकत्र करून घेणे.
- रंग बदलेपर्यंत हे व्यवस्थित उकळू द्यावे.
- उकळून झाल्यावर ते व्यवस्थित थंड होऊ द्यावे.
- यानंतर हे मिश्रण एका बाटलीमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवावे.
- आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाने केसांना आणि टाळूला मसाज करावा.
३. कांद्याच्या रसापासून बनवलेले हेअर मास्क
कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम असल्याने केसांचा रंग काळा राहून त्यांची प्राकृतिक वाढ होण्यास याप्रकारचे हेअर मास्क फायदेशीर ठरते. यामुळे केसांची चकाकी सुद्धा कायम राहते.
कांद्याचे हेअर मास्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य
- कांद्याचा रस – २ ते ३ मोठे चमचे.
- ऑलिव्ह ऑइल – १ मोठा चमचा
- लिंबाचा रस- १ मोठा चमचा
कृती :
- एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे कांद्याचा रस घ्यावा.
- आता यामध्ये १ चमचा ऑलिव्ह ऑइल आणि १ चमचा लिंबाचा रस घालावा.
- यानंतर हे मिश्रण एकत्रित करून टाळू वर लावत हलक्या हाताने मसाज करावा.
- १ तासानंतर सौम्य शांपू लावून केस स्वच्छ धुवून घ्यावेत.
- आठवड्यातून दोन वेळा हे मास्क लावले तर पंधेय केसांची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते.
४. आवळा आणि मेथीच्या बियांपासून टायर केलेले हेअर मास्क.
आवळा केसांच्या वाढीसाठी उत्तम मानल्या जातो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी केसांचे योग्य पोषण करतात त्यासोबतच आवळ्यातील अँटिऑक्सिडेंट्स केसांना पांढरे होण्यापासून वाचवतात.
आणि मेथी तर केसांवरील समस्यांसाठी गुणकारी आहे. या दोन्ही सामग्री एकत्र करून नियमित वापरल्यास पांढरे झालेले केस काळे होण्यास नक्की मदत होऊ शकेल.
चला तर पाहूया आवळा आणि मेथीचे हेअर मास्क बनविण्यासाठी लागणारे साहित्य.
- आवळे- ६-७ (किंवा आवळ्याची बारीक पूडही चालेल )
- तेल (ऑलिव्ह ऑइल, खोबरेल तेल, किंवा बदामाचे तेल)-३ मोठे चमचे.
- मेथीच्या बारीक केलेल्या बिया – १ मोठा चमचा.
कृती :
- सर्वप्रथम एका भांड्यात तेल घेऊन त्यामध्ये आवळ्याची पूड टाकावी.
- थोडावेळ मंद आचेवर हे मिश्रण गरम होऊ द्यावे.
- हे मिश्रण गरम होताच त्यामध्ये १ मोठा चमचा मेथी पूड घालावी.
- व्यवस्थित मिक्स करून थंड झाल्यावर हे मिश्रण एका हवाबंद डब्यात किंवा बरणीमध्ये भरून ठेवावे.
- रात्री झोपण्या आधी हे मिश्रण टाळूवर लावून मग झोपावे.
- सकाळी सौम्य शाम्पूने केसांना सवच्छ करावे.
- या हेअर मास्क च्या नियमित वापरामुळे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.
५. रिंस ऑफ ब्लॅक टी
केसांचा काळा रंग कायम राहून केस चमकदार दिसण्यासाठी आपण ब्लॅक टी रिंस चा उपयोग करू शकतो. याच्या वापरामुळे केसांचे पोत सुधारते आणि केस अगदी मऊ होतात.
साहित्य :
- ब्लॅक टी – २ मोठे चमचे
- पाणी – १ कप
- मीठ – १ मोठा चमचा
कृती:
- सर्वप्रथम १ कप पाण्यात २ मोठे चमचे ब्लॅक टी घेऊन उकळुन घ्या.
- हे मिश्रण थंड होताच केसांवर लावावे.
- आठवड्यातून एकदा तरी हा उपाय केला तर नक्कीच चांगले परिणाम मिळू शकतात.
याव्यतिरिक्त केसांवरील समस्यांचे निवारण करण्यासाठी आहार व्यवस्थित असावा. आहारमध्ये हिरव्या पालभांज्या, मोड आलेले प्रोटीनयुक्त कड धान्य, दूध, अंडी यांचा समावेश असावा.
आपली दिनचर्या आणि कामाच्या सवयी, मानसिक ताण, इतर काही आजार असतील तर त्याप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.
आणि शक्य तोवर रसायनयुक्त उत्पादनांचा वापर टाळून नैसर्गिक वस्तू वापराव्यात.
तळ टीप : शाम्पूऐवजी शिकेकाई आणि रिठ्याचे उकळलेले पाणी वापरल्यास केसांशी निगडित सर्व समस्या कमी होऊ शकतात.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.