सुखी जीवनाचे आनंदी मार्ग
मनोव्यापार हा बिगर भांडवली व्यापार आहे. कोणत्याही इतर व्यापारापेक्षा महत्वाचा. समजा आपण एखाद्या व्यापारात करोडो रुपये संपत्ती कमावली पण तरीही मनोव्यापारामुळे सारं संप्पन्न जीवन शून्य होऊ शकतं.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
मनोव्यापार हा बिगर भांडवली व्यापार आहे. कोणत्याही इतर व्यापारापेक्षा महत्वाचा. समजा आपण एखाद्या व्यापारात करोडो रुपये संपत्ती कमावली पण तरीही मनोव्यापारामुळे सारं संप्पन्न जीवन शून्य होऊ शकतं.
घरच्यांना गमावल्यानंतर मानसिक आघात सहन करून धडपडीने शिकणारी, येणारी दिवसाकडे आशावादाने बघणारी हि पोरगी खरंच जिगरबाज आहे….. सलाम कीर्ती ताईला. शब्दच नाहीत बोलायला. नियती इतकी क्रूर आहे. पण कीर्तीचा आत्मविश्वास आणि जिद्द मात्र अवर्णनीय आहे. सलाम बेटा. भविष्यात खूप पुढे जाशील आणि खूप नाव कमवशील.
२००९ साली The Butterfly Circus या शॉर्ट फिल्मसाठी निकला बेस्ट ऍक्टर म्हणून पारितोषिक सुद्धा मिळाले. २००८ साली त्याचे प्रेरणादायी भाषण ऐकण्यासाठी आलेली Kanae Miyahara हिच्याशी झालेली ओळख प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केले. आज निक कॅलिफोर्नियामध्ये आपली पत्नी आणि मुलांसमवेत समाधानी आयुष्य जगतो आहे.
इतिहासाची आवड असलेला विनायक आता स्वतःच इतिहास झाला आहे. पण एक असा इतिहास जो इतरांना भविष्याची स्वप्न पाहण्याची उमेद देईल…. तुम्हाला कधी कुठल्या परीक्षेची भीती वाटली तर मागे बघून विनायकला आठवा… सगळी भीती, नैराश्य, दुःख झटकून आयुष्याला सांगा…
आयुष्य किती सुंदर आहे ते! आजचा दिवस ‘अक्षय तृतीये’चा पवित्र दिवस!, वर्तमान क्षणात जगण्याची कला ज्याला जमली, त्याच्या जीवनात ‘आनंदाचा क्षय’ कधीच होणार नाही. जीवन अधिकाधिक ‘आनंदी’, ‘खेळकर’ आणि ‘रुचकर’ बनण्यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद!
दोन दिवसांपुर्वी एक पुस्तक वाचले, वालॉन्ग, अजुनही मी स्वतःला त्या पुस्तकाच्या हॅन्गओव्हरमधुन बाहेर काढु शकत नाहीये. इतका ह्या पुस्तकाने मनाचा ताबा घेतला आहे. लेफ्टनंट कर्नल श्यामकांत चव्हाण हे एकोणीसशे बासष्टमध्ये झालेल्या चीनविरुद्धच्या युद्धात तेव्हाच्या नेफा म्हणजे आताच्या अरुणाचल प्रदेशात भारतमातेची लाज राखण्यासाठी, आणि हिमालयाच्या शिखरांचं संरक्षण करण्यासाठी लढायला गेले होते.
तणाव हा आपल्या एखाद्या वैयक्तिक कारणावरून असू शकतो, ऑफिस किंवा व्यावसायिक कारणामुळे असू शकतो किंवा अगदी एखादी डिस्टर्ब करणारी बातमी मिळाल्याने सुद्धा असू शकतो. कारण काही का असेना पण एवढं नक्की कि तणाव हि आपल्या मनाचीच एक अवस्था असते आणि केवळ आपणच त्याच्याशी मुकाबला करू शकतो.
डॉ. अब्दुल कलाम यांचा रोमहर्षक आणि रोमांचित करणारा जीवनप्रवास, ‘विंग्ज ऑफ फायर’ म्हणजे ‘अग्निपंख’ हे पुस्तक जगातल्या सर्वात चांगल्या मोटीव्हेशनल पुस्तकांपैकी एक आहे. हे पुस्तक मी लहानपणीच झपाटल्यासारखे कित्येकदा वाचुन काढले होते, परवा दिवशी पुन्हा एकदा लायब्ररीमध्ये हाती लागले आणि आता पुन्हा नव्याने वाचल्यावर, मी भारावुन गेलो आहे.
नजत बेल्कासम, फ्रांस मधल्या एका गरीब कुटुंबातली मुलगी. शेळ्या मेंढ्या चारत नजत लहानाची मोठी झाली. गरिबीतही आई वडिलांनी शक्य तसे शिक्षण दिले. आणि आपला अभ्यास एकाग्रचित्त होऊन नजत करत गेली. आणि हीच नजत बेल्कासम मोठी होऊन फ्रान्सची शिक्षण मंत्री झाली.
आपलं चुकतयं, हे आपल्याला कळणं, हेच यशाच्या वाटेवरचं पहिलं पाऊल असतं. आपण फक्त सवयी बदलायच्या, आयुष्य आपोआप बदलतं, निराशा, चिंता, भीती यामध्ये वेळ वाया घालवण्यासाठी, मौल्यवान वेळ फुकट घालवण्यासाठी आयुष्य स्वस्त नाही. ह्या निराशादायक विचारांना कंटाळला असाल तर बाह्या झटकुन कामाला लागा.