बेनामी मालमत्तेची माहिती द्या आणि रु.५ करोड पर्यंत बक्षीस जिंका
पूर्वी टीव्हीवर ‘आपण यांना पाहिलत का?’ नावाचा एक प्रोग्रॅम लागायचा. यामध्ये हरवलेल्या व्यक्तींचे नाव व वर्णनासहीत फोटो दाखवण्यात यायचे. क्वचितप्रसंगी शोधून देणाऱ्यास ईनामही (बक्षीस) जाहीर केले जात असे. आजही अनेक वर्तमानपत्रांमध्ये अशाप्रकारचे कॉलम बघायला मिळतात. रस्ता, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन अशा अनेक ठिकाणी आजही अशा प्रकारच्या जाहिरातींचे कागद चिकटवलेले असतात. शोधून देणाऱ्यास किती बक्षीस मिळेल हे सुद्धा त्यावर लिहिलेले असते.