मानसिकरित्त्या मजबूत असलेल्या लोकांच्या तेरा सवयी!..

मानसिकरित्त्या मजबूत

मित्रांनो, आपल्या आजुबाजुला असे अनेक लोक असतात, जे कणखर वृत्तीचे असतात, मानसिकरीत्या मजबुत असतात, परिस्थिती प्रतिकुल असो वा अनुकुल, त्यांच्या चेहऱ्याव ताण दिसत नाही, त्यांच्या उत्साहावर कसलाच परिणाम होत नाही, ते कधी घाई गडबडीत चुकीचे निर्णय घेत नाहीत, गोंधळुन जात नाहीत, कारण त्यांनी त्यांच्या मनाला खास ट्रेनिंग दिलेली असते.