आम्ही मुले घडवितो

aamhi-mule-ghdavto

हल्ली सगळीकडे पॅकेज घेतले जाते ना.. ?? लग्नाचे … बारश्याचे….. कार्यक्रमाचे….. इतकेच काय ..?? अंत्यसंस्काराचे ही.. . पण आपण त्याच्या आधीचे पॅकेज घेऊ”.  डोळे मिचकावत प्रमोद म्हणाला. “हल्ली आई वडिलांना आपल्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळ कुठेय ..?? लहानपणी पाळणाघरात, नंतर इंटरनॅशनल स्कूल, मग पुढील शिक्षणासाठी कॉलेज/क्लास या सर्वांचे एकत्र पॅकेज आपण घ्यायचे….. अर्थात आपले ग्राहक अतिश्रीमंत असणार”.