नवीन वर्षाचा संकल्प सत्त्यात उतरवण्यासाठी या चार गोष्टींची काळजी घ्या

नवीन वर्षाचा संकल्प

तसेही संकल्प पुरे झाले नाही तरी फार मोठे संकट कोसळणार नसते. पण जर पुरे झालेच तर त्याचा आनंद चिरकाल टिकणारा नक्कीच असतो. या लेखात,नवीन वर्षाचा संकल्प ‘न्यू इयर रिझोल्युशन’ हवेत विरून न जाऊ देता निग्रहाने कसे पूर्ण करता येतील यासाठीच्या चार टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे.

नवीन वर्षाचे संकल्प सत्त्यात उतरावेत यासाठी माझ्या आयडिया!!

नवीन वर्षाचे संकल्प

बघता बघता २०१९ चा शेवटचा महिना सुरु झाला सुद्धा. आपल्यापैकी बऱ्याच जणांना, ‘हे वर्ष किती पटकन गेलं, आत्ता तर कुठे २०१९ ची सुरुवात झाली होती आणि डिसेंबर आला सुद्धा!’ असं वाटत असेल.