हे वाचा, ऎका म्हणजे सुखाचा शोध घेणं तुम्हाला सोपं वाटेल

जशी बाह्य गुलामगिरी आपल्याला सहन होत नाही तर आपला आनंद आपण दुसऱ्यावर अवलंबून का ठेवावा? मग हि आंतरिक म्हणजे मानसिक गुलामगिरीच तर झाली. आणि आपल्या आत काय होणार ते दुसऱ्याने ठरवणं हा गुलामीचा सर्वात वाईट प्रकार आहे. तुमच्या आजूबाजूचं जीवन १००% तुम्हाला हवं तसं कधीच असू शकत नाही. तर अशा परिस्थिती तुमचं सुख तुमच्या आजूबाजूला काय घडतं यावर अवलंबून न ठेवणं तुम्हाला जमलं पाहिजे.

नैराश्याचं कारण समजून त्यातून सुटका कशी करून घ्याल?

Sadguru

काहीतरी वाईट, अघटित म्हणजे आपल्या कल्पनेपलीकडलं घडलं तर माणूस नैराश्यात जातो. आणि माणूस नैराश्यात जातो म्हणजे तो खूप तीव्र भावना आणि विचार निर्माण करू शकतो पण त्या भावना असतात चुकीच्या दिशेने.