इस्रायलला जगातला सर्वात सुरक्षित देश बनवणारा हेरगिरीचा सुपरमॅन ‘मिर डगन’

मिर डगन

मिर डगन हे नाव भारतीयांसाठी अपरिचित असेल पण जगातील अनेक देशांनी ह्या नावाचा धसका घेतला होता. हा धसका घेण्यामागे कारण ही तसचं होतं. हेरगिरी आणि गुप्त मिशन तसेच गनिमी काव्या प्रमाणे हल्ला करून शत्रूला नमोहरम करता येऊ शकते हे ज्या संस्थेने पूर्ण जगाला दाखवलं आणि शिकवलं त्या संस्थेच्या जडणघडणीत मिर डगन ची भुमिका महत्वाची होती.