आश्चर्याचा धक्का बसला ना? परंतु थोडेसे भांडवल आणि व्यवसाय चांगल्या पद्धतीने करण्याची क्षमता असणारी कोणीही व्यक्ती अमूल कंपनीची फ्रॅंचाईजी घेऊन उत्तम प्रकारे कमाई करू शकते.
आज आपण त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय उभा करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांसाठी अमूल ही डेअरी उत्पादनातली अतिशय मोठी आणि नावाजलेली कंपनी एक उत्तम संधी घेऊन आली आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने असे सांगितले की अतिशय थोडे भांडवल आणि उत्तम बिजनेस सेन्सच्या जोरावर हा व्यवसाय सहजपणे सुरू करून यशस्वी करता येऊ शकतो.
नवव्यावसायिकांसाठी ह्यातली आनंदाची गोष्ट अशी की एकदा फ्रॅंचाईजी घेतल्यानंतर पुढे व्यवसायातील नफा किंवा कोणत्याही प्रकारची रॉयल्टी अमूल कंपनीशी शेअर करण्याची गरज नाही.
फ्रॅंचाईजी मिळवून त्यानंतर व्यावसायिक स्वतःच्या मनाप्रमाणे व्यवसाय करू शकतात. त्यासाठी सुरुवातीला रुपये दोन लाख ते रुपये सहा लाख इतका खर्च येऊ शकतो.
कसे आहे अमूलचे बिझनेस मॉडेल?
अमूलची फ्रॅंचाईजी घेणाऱ्या व्यक्तीकडे चांगल्या मोक्याच्या जागी स्वत:ची अथवा भाडेतत्वावर घेतलेली जागा असणे आवश्यक आहे. या जागेचा उपयोग ‘अमूल पार्लर‘ साठी होतो.
या जागेतील फर्निचर बनवून घेण्याची तसेच इतर आवश्यक सामग्री जमा करण्याची तसेच आवश्यकतेनुसार मदतनीस ठेवण्याची जबाबदारी फ्रॅंचाईजी घेणाऱ्या व्यक्तीची असते.
फर्निचर इत्यादीचा खर्च रुपये दीड लाख ते रुपये सहा लाख इतका असू शकतो. तो निर्णय पूर्णपणे फ्रॅंचाईजी घेणारा व्यक्ती घेऊ शकतो. कंपनी त्यात हस्तक्षेप करत नाही.
सदर जागा अमूल पार्लर उघडण्याच्या दृष्टीने तयार झाली की अमूल कंपनीचे होलसेल डीलर्स कंपनीची उत्पादने त्या व्यावसायिकाला पुरवतात.
होलसेल दराने मिळालेली ही उत्पादने फ्रॅंचायजी घेतलेल्या व्यक्तीने रिटेल भावात विकली की होणारा नफा हे त्या व्यावसायिकाचे उत्पन्न असते. होणाऱ्या विक्रीवर कोणत्याही प्रकारची रॉयल्टी किंवा नफ्यातील समभाग कंपनीशी शेअर करण्याची आवश्यकता नाही. झालेला नफा संपूर्णपणे त्या व्यावसायिकाचा असतो.
फ्रॅंचाईजी घेतलेल्या व्यावसायिकास अमूलची उत्पादने खरेदी करण्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज पडते. हे भांडवल ज्या भागात पार्लर आहे त्या भागातील विक्रीनुसार ठरते.
ज्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक केली असेल त्या प्रमाणात सदर व्यावसायिकास नफा होतो. सर्वसाधारणपणे रुपये पाच लाख रुपये, दहा लाख प्रति महिना इतका सेल होऊ शकतो.
होणारी विक्री ही पार्लर कोणत्या भागात आहे यावर काही अंशी अवलंबून असते. मोक्याच्या ठिकाणी अर्थातच जास्त विक्री होते.
अमूल कंपनी कोणकोणत्या प्रकारची गुंतवणूक करू देते?
अमूल कंपनीच्या तीन प्रकारच्या फ्रॅंचाईजी घेता येतात.
१. अमूल पार्लर आउटलेट
२. अमूल रेल्वे पार्लर
३. अमूल किऑस्क
याशिवाय अमूलची आईस्क्रीम पार्लरची स्वतंत्र फ्रॅंचाईजी देखील घेता येते.
अतिशय कमी गुंतवणुकीत अशा सर्व फ्रॅंचाईजी मिळवून तुम्ही तुमचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करू शकता. त्याशिवाय अमूलची विविध उत्पादने विकण्याबद्दल कंपनीकडून काही प्रमाणात कमिशन देखील मिळते. त्याचा विक्री व्यतिरिक्त अधिक फायदा व्यावसायिकांना होतो.
अमूल काम करण्याची इच्छा असल्यास https://amul.com/m/amul-franchise-business-opportunity या वेबसाईटवर संपर्क करा किंवा ०२२-६८५२६६६६ या नम्बरवर संपर्क करा
तर ही आहे नवीन व्यावसायिकांना अमूल सारख्या मोठ्या कंपनीबरोबर व्यवसाय सुरू करण्याची सुवर्णसंधी. ह्या संधीचा जरूर लाभ घ्या. तसेच हा लेख जास्तीत जास्त शेअर करून ही संधी आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
I am interested
I’m interested
लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे अर्ज करा
I want to start Amul outlet
लेखात दिलेल्या माहितीप्रमाणे अर्ज करा