जाणून घ्या आधार नंबर वापरून कसे करता येईल ऑनलाइन पेमेंट?

आजकाल ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करणं ही अगदी कॉमन गोष्ट झाली आहे. सगळेच व्यवहार हल्ली ऑनलाइन पद्धतीने होतात. अगदी छोट्या रकमेपासून ते मोठ्या रकमांच्या डील पर्यंत सगळं ऑनलाइन केलं जातं. त्यासाठी वेगवेगळे पेमेंट ऍप्स वापरले जातात. उदाहरणार्थ बँकेचा UPI ID, किंवा Google Pay, Paytm

असे ID असतील तर ऑनलाइन व्यवहार करणे अगदी सोपे जाते. परंतु अजूनही काही लोक असे आहेत जे पेमेंट ऍप्स वापरत नाहीत. त्यांच्याकडे त्यांच्या बँक अकाउंटशी संबंधित UPI ID सुद्धा नसतो. अशा वेळी अशा व्यक्तींशी ऑनलाइन व्यवहार करणे मात्र अवघड जाते..

परंतु आता मात्र ह्यावर एक सोल्युशन आहे, ज्या व्यक्तीशी तुम्हाला ऑनलाइन आर्थिक व्यवहार करायचा आहे त्यांच्याकडे बँक अकाउंटशी संबंधित UPI ID नसेल तर तुम्ही BHIM अँप वरून त्यांचा आधार नंबर वापरून त्यांना पैसे ट्रान्सफर करू शकता.

नक्की काय आहे ही प्रोसेस?

UIDAI (Unique Identification Authority Of India) ह्यांनी त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर असे सांगितले आहे की ह्यापुढे BHIM App वापरताना ज्यांच्याशी व्यवहार करायचा आहे त्यांचा आधार नंबर वापरून व्यवहार करण्याचा ऑप्शन उपलब्ध असेल.

असे करण्यासाठी ज्याला पैसे पाठवायचे आहेत तो म्हणजेच लाभार्थी ह्याच्या नावापुढे त्याचा आधार नंबर भरून ‘verify’ ह्या बटनावर क्लिक करावे. त्यानंतर सिस्टिम कडून सदर व्यक्तीच्या आधार नंबरच्या सत्यतेची पडताळणी केली जाईल आणि आधार नंबर योग्य असल्यास त्या आधार नंबरला जोडलेल्या बँक अकाऊंटमध्ये पैसे जमा केले जातील.

तर अशा रीतीने BHIM App वापरणारे ग्राहक आता लाभार्थीकडे UPI ID नसेल तरी केवळ आधार नंबरच्या आधारे डिजिटल पेमेंट करू शकतात. ही प्रोसेस अतिशय सोपी असून पेमेंट केल्यावर ते ताबडतोब सदर व्यक्तिच्या खात्यात जमा होते.

ह्यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी UIDAI किंवा BHIM ऍपच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।