भारतीय वास्तुकलेला पडलेलं मनमोहक स्वप्न – चार्ल्स कोरीया.

थोड्याच दिवसांपुर्वी नवी मुंबई महापालीकेला सरकारकडून सर्वात स्वच्छ महापालीकेचा पहील्या क्रमांकाचा पुरस्कार दिला गेला. हे शहर देखणं आणि नेटनेटकं दिसण्याचं श्रेय आणखी एका व्यक्तीला आवर्जुन द्यायला हवं, ते म्हणजे आधुनिक भारतीय वास्तुकलेचे रचनाकार आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट चार्ल्स कोरीया यांना. नवी मुंबई शहराची टाऊन प्लानिंग करण्यात त्यांचाच मोलाचा वाटा आहे.

आर्किटेक्चर क्षेत्रात काहीतरी वेगळं करु पाहणार्‍या, प्रत्येकासाठी ‘चार्ल्स कोरीया’ हे नाव मार्गदर्शन करणार्‍या दीपस्तंभाप्रमाणे आहे.

एक सप्टेंबर १९३० साली सिकंदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन शिक्षण मुंबई येथे झाल्यावर त्यांनी मिशीगन आणि केंब्रिज युनिव्हर्सिटीतुन पदव्या घेतल्या, आणि १९५८ मध्ये त्यांनी मुंबईत आर्किटेक्ट म्हणुन स्वतःची प्रॅक्टीस सुरु केली.

त्यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी डिझाईन केलेल्या अहमदाबाद येथील गांधी स्मृती संग्रहालयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना ओळख मिळाली.

साबरमती आश्रम
साबरमती आश्रम

साबरमती नदीच्या काठावर एका विस्तीर्ण आश्रमात गांधीजी तब्बल बारा वर्षे वास्तव्यास होते, पुढे कालांतराने त्या निसर्गरम्य घरातल्या त्यांच्या आठवणी जिवंत ठेवुन स्मृती संग्रहालय बनवावे असा विचार पुढे आला, ती जबाबदारी चार्ल्स कोरीयांनी समर्थपणे पेलली, त्यांनी जुन्या आश्रमाचे ऐतिहासिक अशा स्मृती संग्रहालयामध्ये जादुई रुपांतरण केले. १९६३ मध्ये पंडीत नेहरुंच्या हस्ते ह्या स्मृतीस्थळाचे उद्घाटन झाले आणि चार्ल्स कोरीयांचे नाव जगभर गाजले.

चार्ल्स कोरीया
मध्यप्रेदेश विधानसभा

१९६७ मध्ये भोपाळमध्ये त्यांनी मध्यप्रदेशच्या विधानसभेचे डिझाईन केले. भोपाळमध्येच असलेली भारतभवन ही त्यांची अजुन एक लक्षवेधक कलाकृती. इथे सर्व प्रकारच्या व्हिज्युअल आणि परफॉर्मिंग आर्ट्सचे वर्कशॉप होतात, इथली ओपन एअर थिएटर फारच सुंदर आहेत. तसंच साहीत्य आणि कविता प्रेमींसाठी इथं समृद्ध दालनं आहेत.

मुंबईतल्या कुलाबा हिलला गेल्यास उंच उंच गगनचुंबी इमारतींमध्ये ठळकपणे उठुन दिसणारी एक पिवळसर आकर्षक ठोकळ्या-ठोकळयाच्या आकाराची इमारत चटकन लक्ष वेधुन घेते, ती म्हणजे ‘कांचनजुंगा अपार्टमेंट’. ही बनवताना भारतीय हवामानशास्त्राचा, उन, पाऊस, वाऱ्याचा बारकाईने विचार केला गेला होता. सत्तावीस मजल्यांची ही इमारत १९८३ मध्ये तयार झालीय, पण आज पस्तीस वर्षानंतरही तिचे आकर्षण कायम आहे.

नॅशनल क्राफ्ट म्युझीयम
नॅशनल क्राफ्ट म्युझीयम

नव्या दिल्लीत कलेचं माहेरघर म्हणवलं जाणारं नॅशनल क्राफ्ट म्युझीयम आणि जयपुर मध्ये असणारं जवाहर कला केंद्र ह्या इमारती चार्ल्स कोरीयांच्या कलात्मकतेची साक्ष देत उभ्या आहेत.

नॅशनल क्राफ्ट म्युझीयमची जन्मकथा गंमतीशीर आहे, कमलादेवी चट्टोपाध्याय नावाच्या एक स्वातंत्र्यसैनिक होत्या. त्यांच्या पुढाकाराने भारताच्या लुप्त होत जाणाऱ्या सर्व प्रकारच्या चित्रकला, भरतकाम, वीणकाम, हस्तकला, शिल्पकाम, नक्षीकला इतक्या सगळ्या कलांचं जतन करण्याच्या उद्देशाने ह्या म्युझीयमची निर्मीती झाली. आज ह्या संग्रहालयामध्ये पस्तीस हजार दुर्मीळ वस्तुंचं कलेक्शन आहे. १९७२ मध्ये इथे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. त्याचचं पुन्हा कायमस्वरुपी कलाग्रामात रुपांतर करण्यात आलं. पाच एकरावर पसरलेल्ं हे कलाग्राम म्हणजे नयनरम्य पंधरा इमारतींच संकुल आहे.

दिल्ली मध्येच कोरीयांची अजुन एक बिल्डींग म्हणजे ब्रिटीश कौन्सिल. कालौघात भारतीय संस्कृतीत मिसळलेल्या अनेक इतर संस्कृती जसं की युरोपियन, मुस्लीम आणि इतर धार्मिक परंपराच्या मिलाफाचे प्रतिक म्हणुन ही इमारत बांधण्यात आली. याच्या प्रवेशद्वारावरच एका वडाच्या झाडाचं म्युरल आहे. मार्बल आणि ग्रॅनाईटमध्ये, काळ्या पांढऱ्या रंगात, झकास जमुन आलेलं हे शिल्प दर्शनी भागात स्वागतालाच लक्ष वेधुन घेतं.

कोरीयांनी १९८४ साली मुंबईत अर्बन इन्स्टिट्युट रिसर्च सेंटरची स्थापना केली. बकाल वस्त्या आणि महागडी घरे या शहरीकरणाच्या समस्या ओळखुन आयुष्यातली शेवटची चाळीस वर्ष या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात त्यांनी खर्ची घातली.

स्वतःला ग्रेट समजणाऱ्या, साहेबांच्या देशात, लंडन मध्ये, रॉयल इन्स्टीट्युट ऑफ ब्रिटीश आर्कीटेक्ट ह्या संस्थेने ‘रॉयल गोल्ड मेडल’ देवुन चार्ल्स कोरीयांचा सन्मान केला.

एवढेच नाही तर २०१३ साली, ह्या संस्थेने एक प्रदर्शन भरवले होते त्याचे नाव होते, चार्ल्स कोरीया – इंडियाज ग्रेटेस्ट आर्किटेक्ट.

इस्माईली सेंटर -टोरंटो
इस्माईली सेंटर -टोरंटो

परदेशातही कोरीयांनी अनेक कामे केली, त्यांनी कॅनडामध्ये, टोरंटो शहरात असलेलं हे चहुबाजुंनी बागेंनी वेढलेलं, काचेच्या पिरॅमिडच्या आकारात असलेलं चकचकतं इस्माईली सेंटर आहे, तर पोर्तुगालच्या लिस्बेन शहरात गोलाकार भिंतीमध्ये आणि मोठमोठ्या अंडाकृती खिडक्या असलेलं, भव्य असं चॅंपालिमाऊद फाऊंडेशन सेंटर आहे.

असं म्हणतात, ज्याप्रमाणे आर्किटेक्ट लॉरी बेकरचे सर्वोत्कृष्ट काम पहायचे असेल त्यांची होम सिटी असलेल्या केरळमधल्या त्रिवेंद्रमलाच भेट द्यायला हवी, त्याचप्रमाणे खरा चार्ल्स कोरीया शोधायचा असेल तर तो मुंबई आणि गोव्यातल्या, त्यांनी उमेदीच्या काळात डिझाईन केलेल्या प्रोजेक्टस मध्येच भेटतो.

मानाचे पद्मश्री आणि पद्मविभुषण पुरस्कार देऊन भारत सरकारने त्यांचा यथोचित गौरव केला.

वयाच्या चौरीऐंशीव्या वर्षी, अनेक सुरेख कलाकृती बनवणारा, हा अदभुत वास्तुरचनाकार, त्याच्या अजरामर आठवणी मागे ठेऊन आपल्या सारख्या असंख्य लोकांसाठी प्रेरणा ठेवुन काळाच्या पडद्याआड गेला.

लेखक मोटिव्हेशन संदर्भात व्हाट्सअप वरती विविध कोर्सेस घेतात. त्यासाठी अभिप्रायातून त्यांना सम्पर्क करता येईल.

वाचण्यासारखे आणखी काही…..

Low Cost Housing – बांधकामाची किंमत कमी कशी कराल?
गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!

वाचनकट्टा...
वाचनकट्टा- वास्तूसंबंधी मराठी पुस्तकांचा…

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय