खराखुरा निसर्ग अनुभवायचा तर पावसाळा हाच सर्वोत्तम काळ आहे, कारण हीच ती वेळ असतं जेंव्हा निसर्ग बहरलेला असतो ताजातवाना असतो, फुललेला असतो, मोहक दिसतो.
महाराष्ट्रात तर निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्याची उधळण केली आहे.
पावसाळ्यात ‘कुठं-कुठं जायाचं फिरायला?’ वाचा या लेखात (भाग:१) ची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे
मग या पावसाळ्यात कुठं जायचं ते ठरवण्यासाठी हा लेख नक्की वाचा!
१२) कळसूबाई, नाशिक
महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर असणारं दक्षिण भागातील ट्रेकिंगचे एक लोकप्रिय ठिकाण, कळसूबाई हे पावसाळ्यातलं सुध्दा एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
धुक्यात गायब होणाऱ्या रोमांचक पायवाटा. माउंट कळसूबाई, १६४६ मीटर हे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे.
प्रत्येकानं आयुष्यात एकदा तरी भेट द्यायला हवी असं हे एक रोमांचक ठिकाण आहे.
निसर्गातल्या मृदू संगीताने हलकेच जागे व्हा आणि सह्याद्री पर्वत रांगेत वसलेल्या शांत वातावरणाने स्वतः शांततेचा अनुभव घ्या.
कळसूबाई शिखर पावसाळ्यात ताजंतवानं आणि स्वच्छ असतं.
आजूबाजूला हरिश्चंद्रगड, वन्यजीव अभयारण्य आणि कळसूबाई मंदिराला भेट द्यायला विसरू नका.
कळसूबाई शिखराकडे जाणारा लोकप्रिय ट्रेकिंग मार्ग भंडारदरा पासून १० किमी अंतरावर असलेल्या बारी गावातून सुरू होतो, जिथं मुंबई-नाशिक रस्त्यानं प्रवास करत इगतपुरीमार्गे जाता येतं.
मुंबई ते कळसूबाई अंतर : १५२ किमी
वेळः २ तास ५२ मीटर
पुणे ते कळसूबाईचे अंतर : १७८ किमी
वेळः ५ तास
कसारा रेल्वे स्टेशन हे बारी गावासाठी सर्वात जवळचे स्टेशन आहे
१३) दुरशेत, खोपोली
गरम पाण्याचे झरे, विहंगम दृश्य, सोप्या लेव्हलचे ट्रेक, नाईट सफारी आणि किल्ला यांसाठी, दुरशेत हे पश्चिम घाटातलं आवर्जून भेट देण्यासारखे आकर्षण आहे.
जंगलातल्या लॉजमध्ये मुक्काम करा, किंवा निसर्गात शांत भटकंती करा, दुरशेतला भेट देणं हा शुद्ध समृध्द अनुभव आहे.
पावसाळा हा असा काळ असतो जेव्हा किल्ले नेहमीपेक्षा सुंदर दिसतात
निसर्ग जगा, जपा, आणि मनापासून अनुभवा
मुंबई ते दुरशेत अंतर : ७६ किमी
वेळः १.५ तास
पुणे ते दुरशेत अंतर : ९९ किमी
वेळः १ता ४७ मिनिटं
३० किमी अंतरावर असणारं खंडाळा हे दुरशेतसाठी सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे.
१४) आंबोली, सिंधुदुर्ग
गोव्याजवळचा सुखद अनपेक्षित उंच प्रदेश! देवांच निवासस्थान म्हणून शोभणारं गोव्याजवळील आंबोली हे एक निसर्ग संपन्न आणि शांततेची दुलई पांघरून बसलेलं ठिकाण आहे.
सह्याद्री पर्वतरांगांचं उल्हसित करणारं हवामान आणि दाट धुकं पसरलेले वातावरण आंबोलीच्या हवेत जादूची शिंपण करतं.
पावसाळ्यात तर आंबोली जास्त सुंदर होतं, धुक्याच्या चादरीत गुरफटून जातं आणि यामुळेच हे पावसाळ्यात कुटुंबासह भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक बनतं.
घाटांच्या विस्तीर्ण जंगलात वाहणारे मोठमोठे धबधबे, आणि डोंगराच्या माथ्यावरून दिसणारा चिरंतन सूर्योदय हा अस्वस्थ मनाला शांत करणारा खरा उपाय आहे.
कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशीचा उगम,नांगरतास धबधबा याचबरोबर
सावंतवाडीचा मोती तलाव, तेरेखोल किल्ला, सागरेश्वर बीच आणि सिंधुदुर्ग किल्ला ही जवळपासची काही आकर्षणे आहेत.
मुंबई ते आंबोली अंतर : ४८९ किमी
वेळः ८ तास ३० मिनिटं
पुणे ते आंबोली अंतर: ३४६ किमी
वेळः ६ तास ३० मिनिटं
३० किमी अंतरावर असणारा सावंतवाडी हे आंबोलीसाठी सर्वात जवळचं रेल्वेस्टेशन आहे .
१५) पाचगणी, सातारा
पाच टेकड्यांचा सौंदर्यात दिमाखानं मिरवणारा निसर्ग.
नावाप्रमाणेच, पाचगणी हे पाच टेकड्यांचे ठिकाण आहे सातारा जिल्ह्यातील लोकप्रिय ठिकाणांपैकी एक प्रमुख आकर्षण.
मनोहारी दृश्यं, मंदिरं, तलाव आणि भव्य जलसाठे असलेलं हे शहर पावसाळ्यात आणखी सुंदर भासते.
माउंट माल्कम, महाबळेश्वर मंदिर, पंचगंगा मंदिर, विल्सन पॉइंट, सिडनी पॉइंट, टेबल लँड, वेण्णा लेक, लिंगमाला फॉल्स, धोम धरण आणि बॉम्बे पॉइंट ही ठिकाणे तुम्ही पाचगणीला जाणार असाल तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायला हवीत.
मुंबई ते पाचगणी अंतर: २४४ किमी
वेळः ४.५ तास
पुणे ते पाचगणी अंतरः १०१ किमी
वेळः २ तास १७ मिनिटं
सातारा हा पाचगणीसाठी सगळ्यात जवळचं रेल्वेस्टेशन आहे. तसेच, पुण्यातून पाचगणीला रस्ते मार्गाने ही सहज जाता येऊ शकतं.
१६) ठोसेघर धबधबा, सातारा
विस्तीर्ण घाटमाथ्यावर असलेला ठोसेघर धबधबा निसर्ग सहलीसाठी पावसाळ्यात योग्य आहे.
पावसाळ्यात इथली निसर्ग दृश्यं विलक्षण आणि निसर्गप्रेमींना आनंद देणारी असतात.
ठोसेघरचे धबधबे पावसाळ्यात उत्साहाने फसफसत असतात.
पावसाळ्यात आवर्जून भेट देण्यासारखे सर्वात रोमांचक ठिकाण आणि एक मौल्यवान रत्न आहे.
मुंबई ते ठोसेघर अंतर : २७६ किमी
वेळः ५ तास
पुणे ते ठोसेघर अंतरः १३३ किमी
वेळः ३ तास
सातार्यापासून रस्त्याने धबधब्यापर्यंत पोहोचता येतं.
१७) मुळशी धरण, पुणे
निसर्गाची कमाल शांतता इथं आहे। तुम्ही महाराष्ट्रात मान्सूनची ठिकाणं शोधत असताना मुळशी धरणाइतकं मोहक ठिकाण तुम्हांला सापडणार नाही.
विस्तीर्ण निसर्गाच्या पायवाटेने आणि हिरवाईने नटलेलं हे ठिकाण पुण्यापासून अगदी जवळ आहे.
पुण्यापासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर तमुळशी धरणापर्यंत आहे.
पावसाळ्यात आणखीनच निसर्गरम्य होणाऱ्या मुळशीत तुम्ही पिकनिक, ट्रेकिंग आणि पक्षी-निरीक्षण यांचा आनंद तुम्ही लुटू शकता.
मुंबई ते मुळशी अंतरः १६५ किमी
वेळः ३तास ४० मिनिटं
पुणे ते मुळशी अंतर: ४० किमी
वेळः १तास २४ मिनिटं
१८) तापोळा, महाबळेश्वर
मिनी काश्मीर असणारं, महाबळेश्वर प्रदेशात वसलेलं तापोळा हे मुंबई आणि पुण्यापासून जवळ असणारं पावसाळ्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.
महाबळेश्वर हे एक परिपूर्ण निसर्गाचा आनंद लुटता येणाऱ ठिकाण आहेच पण तापोळा हे एक असे ठिकाण आहे जिथं निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य उत्तम प्रकारे फुलताना दिसतं.
इथली सकाळ आनंदी, शांत आणि तेजस्वी असते, तर संध्याकाळ उदात्त आणि मोहक असते.
घनदाट वृक्षाच्छादित पर्वत अत्यंत मोहक आहेत आणि निसर्ग पाहण्यासाठी तुम्हांला ते आमंत्रण देतात.
हे महाराष्ट्रातील पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी हे एक आहे.
मुंबई ते तापोळा अंतर : २२७ किमी
वेळः ५.५ तास
पुणे ते तापोळा हे: १३४ किमी
वेळः ३ तास १८ मीटर
१९) लवासा पुणे
एक सुनियोजित हिल स्टेशन जे तुम्हांला महाराष्ट्रात असताना इटालियन शहरांत सुट्टी घालवण्याची मजा देऊ शकतं.
टेकडीवर वसलेलं लवासा, हे महाराष्ट्रातलं पावसाळी सौंदर्यानं परीपूर्ण ठिकाणांपैकी एक आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्ं नयनरम्य दृश्य तुम्ही इथं पाहू शकता.
पाऊस पडत असताना ही सुनियोजित शहरात राहण्याची कल्पना करा.
मनोरंजक वाटेल बरोबर ना?
मुंबई ते लवासा अंतर : १८७.५किमी
वेळः ४ तास २९ मीटर
पुणे ते लवासा अंतर : ५७.५ किमी
वेळः २ तास १९ मीटर
२०) खंडाळा
ए क्या बोलती तू? आती क्या खंडाला?
हे बॉलिवूडचं गाणं तुम्हांला या ठिकाणची लोकप्रियता सांगेल.
तुम्ही खरोखर या सुंदर ठिकाणी भेट द्यायला उत्सुक असाल नाही?
आनंदाची गोष्ट म्हणजे पावसाळ्यात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी हे एक आहे.
इथून विसापूर, राजमाची, लोहगड आणि बरेच काही ट्रेक करता येतात.
खंडाळ्यात भेट देण्यासाठी काही उत्तम ठिकाणं म्हणजे बेडसा लेणी, ड्यूक नोझ, कार्ला धरण आणि बरेच काही आहे.
मुंबई ते खंडाळा हे अंतर: ७९.७किमी
वेळः २ तास १८ मी
पुणे ते खंडाळा अंतर : ७०.९ किमी
वेळः १ ता ५१ मिनिटं
खंडाळा हे लोणावळ्याजवळ आहे त्यामुळे तुम्ही लोणावळ्यापर्यंत बसने जाऊन नंतर घाट रस्त्यापर्यंत खाजगी वाहनाने जाऊ शकता.
२१) ताम्हिणी घाट
चित्रपटात दिसणा-या हिरव्यागार कुरणांचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही इथं भेट द्यायला हवी.
उंचीवर असलेला, ताम्हिणी घाट नयनरम्य दृश्ये दाखवतो जी तुम्हांला मंत्रमुग्ध करतात.
सुंदर हिरवाई ,कुरणं आणि गल्ल्यांनी सुशोभित असणारा ताम्हिणी घाट एका अनोखा अनुभव तुम्हाला देऊ शकतो.
मुंबई ते ताम्हिणी अंतर : १४३.३ किमी
वेळः ४ तास ३ मिनिटं
पुणे ते ताम्हिणी अंतर : ५३.३ किमी
वेळः २ तास ९ मि
मुंबई-गोवा महामार्गाने ताम्हिणी घाटात सहज पोहोचू शकता .
२२) लोणावळा
हिरवाईने नटलेलं लोणावळा हे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे.
तुम्हाला लोणावळ्याचं खरं सौंदर्य पाहायचे असेल, तर पावसाळ्यात लोणावळ्याला नक्की भेट द्या.
जसजसा पाऊस पडतो तसतशी कायम हिरवीगार असणारी झाडी जास्त हिरवीगार होते आणि मनमोहक दृश्य पहायला मिळतात.
पावसाळ्यात वाहणारी थंडगार वाऱ्याची झुळूक तुमच्या तापलेल्या मनाला गारवा देईल
पावसाळ्यात दिसणा-या लोणावळ्याविषयी शब्दांत वर्णन करणं अशक्य आहे.
तिथला नजारा प्रत्यक्ष अनुभवला पाहिजे.
मुंबई ते लोणावळा अंतर: ८३.१ किमी
वेळः १ तास ५७
पुणे ते लोणावळा अंतर: ६७.४ किमी
वेळः १ तास ९ मिनिटं
लोणावळ्यात रेल्वे स्टेशन आहे. तसंच लोणावळ्याला रस्त्याने जाता येतं.
तर ही सगळी पावसाळी पर्यटनाची स्थळं वाचून तुम्ही कुठं मुशाफिरी केलीत आम्हांला जरूर कळवा.
पावसाळ्यात ‘कुठं-कुठं जायाचं फिरायला?’ वाचा या लेखात (भाग:१)
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.