सावधान! तुमच्या घरातील ह्या वस्तूंमध्ये लपलेला असू शकतो करोनाचा विषाणू 

जगभरात सगळीकडे करोनाचा उद्रेक झालेला असताना सरकार आणि जनता मिळून त्यावर मात करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सरकार जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच लोकांमध्ये सोशल डिस्टनसिंग, मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, लस घेणे ह्याबाबतीत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सगळे नागरिकदेखील ह्या आजारवर मात करण्याच्या उद्देशाने नियम पाळताना दिसत आहेत. स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेताना दिसत आहेत. परंतु तरीही करोनाच्या केसेस वाढत आहेत. काय असावं ह्याचं कारण?

ह्याचं कारण आपल्या घरात तर नाही ना?

तज्ञ डॉक्टरांनी ह्या बाबतीत आपली मते नोंदवली आहेत. ते म्हणतात की अनेक लोकांचे लसीकरण झाले आहे तसेच अनेक लोक घराबाहेर असताना सोशल डिस्टनसिंगचे पालन करत आहेत.

घरी देखील वारंवार हात लागणाऱ्या जागा पुसणे, सॅनीटाईज करणे अशा गोष्टी लोक आवर्जून करत आहेत. त्यामुळे बरेच नागरिक आता करोनापासून सुरक्षित झाले आहेत.

परंतु असे लोक स्वतः तर करोनापासून सुरक्षित झाले आहेत परंतु ते करोनाचे वाहक (asymptomatic carriers) मात्र बनू शकतात. अशा लोकांमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. परंतु त्यांच्यामुळे इतर लोकांना लागण मात्र होऊ शकते.

त्यामुळे अशा लोकांच्या घरातील वापरातील वस्तुंमध्ये जसे की गादी, उशी, पांघरूणे, कपडे इत्यादी करोनाचे विषाणू लपलेले असू शकतात. असे लोक स्वतः करोनाने बाधित झाले नाहीत तरी ते वाहक असल्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेले इतर लोक त्यांच्यामुळे करोनाने बाधित होऊ शकतात.

आपल्या घरातील कोणत्या वस्तूंमध्ये लपलेला असू शकतो करोनाचा विषाणू?

जर एखादी व्यक्ती स्वतः करोनाने बाधित नसेल परंतु लक्षणे नसलेली वाहक असेल तर अशा व्यक्तीच्या घरातील अनेक वस्तूंमध्ये करोनाचे विषाणू लपलेले असू शकतात.

त्यामध्ये प्रामुख्याने गादी, उशी, पांघरूणे, बेडशिट, उशांचे अभ्रे ह्या वस्तु येतात.

सहसा घरातील वारंवार हात लागणारे पृष्ठभाग, दरवाज्याचे हॅंडल, दारे, खिडक्या इत्यादी गोष्टी वारंवार सॅनीटाईज केल्या जातात. त्यामुळे त्यांच्यावरील करोनाचा धोका टळतो.

परंतु बाकीच्या वस्तूंचे काय?

म्हणून आपण सर्वांनी आपल्या घरातील गाद्यांवरचे बेडशिट, पांघरूणे, उशांचे अभ्रे वारंवार बदलणे. स्वच्छ धुणे हे नियमितपणे केले पाहिजे. तसेच घराची स्वच्छता नियमित केली पाहिजेत. त्यामुळे करोनाचा धोका कमी होऊ शकतो.

तर अशा प्रकारे आपण आपल्या घरची स्वच्छता ठेवून करोनाला लांब ठेवू शकतो. असे जरूर करा आणि स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।