डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय

नाजूक डोळे हे सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग.

या डोळयांमुळेच मनात काय चालू आहे ते कळतं.

डोळ्यांची भाषा ही वेगळी असते असं ही म्हणतात.

एकमेकांशी होणा-या संवादात डोळ्यांचा मोठा वाटा असतो.

अशा या डोळ्यांचं आरोग्य जपणं आपल्या हातात असतं.

पिगमेंटेशनमुळे डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा काळवंडलेली दिसून येते.

ही त्वचा सैल झालेली ही दिसते.

धूळ, प्रदूषण, पाणी कमी पिणे, कॉम्प्युटर वर अनेक तास काम करणे अशा अनेक गोष्टींमुळे डोळ्याभोवती काळी वर्तुळं उमटायला लागतात.

मात्र त्यात घाबरण्यासारखं काही नाही कारण त्यावर काही घरगुती उपचार करून आपण डोळ्यांना पुन्हा एकदा सौंदर्य बहाल करू शकतो.

1) बदाम तेल आणि लिंबाचा रस

बदाम तेल आणि लिंबाचा रस या दोनच वस्तु घेऊन आपण डोळ्याचं सौंदर्य टिकवू शकतो.

तर याचं प्रमाण काय असावं आणि कशापद्धतीने वापरायवं ते जाणून घेऊया.

1 चमचा बदाम तेल आणि 1/2 चमचा लिंबाचा रस

1 चमचा बदाम तेल एका बाऊलमध्ये घेऊन त्यात लिंबाचा रस मिक्स करून घ्या.

हे मिश्रण त्वचेवर डोळ्यांच्या कडेला काळजीपूर्वक लावावं.

हलक्या हाताने डोळ्यांभोवती मसाज करावा.

काही मिनिटं मसाज करून चेह-यावर हे मिश्रण सुकू द्यावं.

साधारण अर्धा तासाने चेहरा कोमट पाण्याने धुवावा.

दिवसातुन दोनदा हे मिश्रण चेह-यावर लावलं तर अपेक्षित परिणाम लवकर दिसून जाईल.

2) हळद आणि पुदिना तेल

डोळ्याभोवतीचे डार्क सर्कस दूर करण्यासाठी हळद आणि पुदिन्याचं तेल वापरता येतं.

यासाठी आपल्याला लागेल… चिमूटभर हळद, 1/2 चमचा खोबरेल तेल, 3 ते 4 थेंब पुदिना तेल

बाऊलमध्ये पहिल्यांदा खोबरेल तेल घ्या. त्यात पहिल्यांदा पुदिना तेल घालून मग हळद मिक्स करा.

हे मिश्रण डोळ्याभोवती लावताना डोळे मिटून घ्या.

बोटांनी गोलाकार मसाज करत डोळ्याभोवती हे मिश्रण लावा.

अर्धा तास ते चेह-यावर वाळू द्या.

मग हळूवारपणे चेहरा धुवून टाका.

डोळ्यांसाठी हा उपाय आठवड्यातून 2/3 वेळा करायला हरकत नाही.

या मिश्रणामुळे डोळ्याभोवतीच्या त्वचेवर चांगला परिणाम झाल्याचं तुम्हांला दिसून येईल.

3) गुलाब पाणी आणि कच्चं दूध

डोळ्याभोवती असणारे डार्क सर्कल आपला चेहरा निस्तेज करतात.

अगदी घरच्या घरी सोप्या उपायांनी आपण यावर उपचार करू शकतो.

पुढचा उपाय ही सहजसोपा आहे. त्यासाठी आपल्याला हवं

1 चमचा कच्चं दूध आणि 1 चमचा गुलाब पाणी

हे मिश्रण डोळ्यांभोवती लावुन अर्धा तासाने धुवून टाकावं.

अशा पद्धतीने सोप्या उपायाने तुम्ही डोळयाभोवतीचा काळेपणा दूर करु शकता.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।