भोग भोग भोगायची वस्तू नाहीरे ती
जरा डोकावून बघ तिच्या आत||
भावनांचा कल्लोळ माजलाय
तिच्या चेहऱ्यावर नसलेला…..
चढ चढ चढतोय नुसता
कधी तरी उतरून बघ||
आतमध्ये एकदा,
आणि बघ दिसतोय का
वेदनांचा पसारा……..
तुट तुट तुटतेय रे ती
शरिर नको बघू नुसतं तिचं||
मनाला पडतात तिच्या
तुझ्या नखांचे ओरखडे,
ओरबाडून घेताना तू शरिर तिचं…..
मर मर मरतेय रे ती
मादी म्हणूनच नको बघूस||
स्त्री आहे ती माणूस आहे ती
तू ही पुन्हा बन माणूस……
वाचण्यासारखे आणखी काही…..
पंकज कोटलवार यांचा ब्लॉग
संगीत शेंबेकर यांचा ब्लॉग
शब्द तुझे नि माझे ब्लॉग
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.