आयुष्याची दिशा भरकटल्यासारखी वाटतेय? मग स्वतःला विचारून पहा हे प्रश्न

तरुणपणी तुमच्या आत असलेली ती महत्वाकांक्षी मुलगी लग्न, संसार मुलांचे संगोपन यात कुठेतरी हरवून जाते.

तिशी पार होते, चाळीशी पार होते आणि मग वेळ असला तरी तुमच्यातली ‘ती’ आता स्वतःला शोधायचं कसं हे न समजल्याने भांबावून जाते आणि आज #WomansDay, या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ‘आयुष्याची दिशा भरकटल्यासारखी वाटत असेल तर स्वतःला शोधण्यासाठी काय करता येईल’

‘महत्वाकांक्षी मुली’ अख्या जगाला त्यांच्या पायाशी लोळवू शकतात.. कारण त्यांच्याकडे सौंदर्य असेल किंवा नसेल पण बुद्धिमत्ता अफाट असते..

काही मुलींचे पाय आपण पाळण्यात बघतो.. आणि त्यांच्या आयुष्यातील स्वप्ने त्यांना साकारताना त्यांना बघून आपण अचंभीत होतो..

हे चित्र जितकं सकारात्मक आणि आनंददायी असते तितकेच ह्याच्या बरोबर उलट चित्र खूपच नैराश्य आणते..

जन्मापासून ही मुलगी वेगळी आहे असे वाटत असल्याने तिची उत्तोरोत्तर प्रगती बघून डोळे दिपून जातात..

आत्मविश्वासाने भविष्याची घडी बसवायला निघालेली ‘कुमारी’ लग्नानंतर स्वतःची सगळी स्वप्न बाजूला ठेऊन, तेच चूल आणि मूल करणारी ‘स्त्री’ का बनून जाते ह्याचे उत्तर काही केल्या मिळत नाही.

कित्येक वेळा आरशात पाहिल्यावर आपल्याला जाणवते वयाच्या तिशीत काय काय करायचं ठरवलं होतं,

चाळीशीला कोणता माईलस्टोन पार करायचा ते निश्चित केलं होतं, पन्नाशीच्या टप्प्यावर मिळवायच्या सगळया आचिव्हमेंट्स प्लॅन करून होतील का? पण..

पण मनातली ‘ती’ आणि आरशातली ‘ती’ कोणीतरी वेगळीच आहे..

तिशीतच पन्नाशी आल्यासारखी कोणीतरी..

कुठे निघाले होते? आज कुठे पोचले? काय चुकलंय? काहीच कळत नाही..

आरशात स्वतःला पाहताना क्षणभर वाटते कुठे हरवली ती हरहुन्नरी, स्वप्नाळू, नसानसात चैतन्य भरलेली गोड ललना..?

आता जी दिसतीये ती भलतीच कोणीतरी आहे.. सगळं करिअर आणि आयुष्य खुंटीला बांधून कोणीतरी चार चौंघींसारखी जगणारी एक स्त्री.

असे कसे स्वतःचे सगळे वर्तमान कोणा दुसऱ्याच्या हाती सोपवून स्वतःच भविष्य अंधारात जाऊ दिलं?? कुठे हरवलीये जुनी ‘मी’.. कुठे गेली माझी स्वप्नं? का नाही पुरी होऊ दिली मी? असे सतत जाणवत राहते.

कुणाची ही तऱ्हा तर कुठे लग्न संसाराचे ओझे मागे नसतानाही कुणाची स्वप्ने तिकडेच बधिर झालेली असतात.

करिअर काम पैसा ह्याच्या रहाटगाडग्यात आयुष्य जगायचेच विसरून गेलेली ‘मी’ रोज रोज स्वतःला विसरूनही जाते..

जबाबदाऱ्यांचा ओझ्याखाली दबून गेल्यावर स्वतःची ओळख विसरून गेलेल्या स्त्रीया स्वतःला शोधू पाहतात मात्र दिशाहीन झाल्याने त्यांना असे करणे खूपच अवघड होऊन बसते.

कधी कधी वाटते हे रुटीन झुगारून द्यावे आणि ठरवलेले मौज मजेचे आयुष्य पुन्हा जगावे.

भरकटलेली गाडी पुन्हा रुळावर आणावी. पण कसे ते काही केल्या उमगत नाही. सतत आपण आपले रस्ता चुकल्यासारखे आयुष्य जगत राहतोय असेच कुठेतरी वाटायला लागते.

जर तुम्हालाही सतत असे जाणवत असेल तर स्वतःला काही प्रश्न विचारून पहा.. कदाचित उत्तरं तुमची तुम्हाला सापडतील…

तुमची ‘कटी पतंग जिंदगी’ पुन्हा एकदा ऊंच भराऱ्या मारेल. त्यासाठी स्वतःला शोधा. होय..!! हरवलीये ना ‘ती’ पण ती आहे तुमच्याच मध्ये कुठे तरी..

शोधल्यावर नक्की सापडेल.. फक्त दिशा योग्य हवी. तुम्ही कोण आहात आणि काय काय करू शकता ह्याचा अंदाज घ्या.. स्वतःवर तो प्रकाशझोत येऊ द्या.. चला स्वतःला उठवूया..

१. स्वतःला तुम्ही काय विशेषणे देऊ शकता?

काढा तुमची डिक्शनरी आणि शोधा तुमच्यातले कलागुण.. स्वतःला तुम्ही कोणकोणती विशेषणे देऊ शकता? चपखल विशेषणे तुम्हाला स्वतःला शोधायला मदत करतील.

२. तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात तुम्हाला चांगले वाटते का?

तुम्ही जिथे राहता, ज्यांच्या बरोबर राहता आणि ज्या परिस्थितीत राहता हे तुम्हाला आनंद देते का नाही ह्याची उत्तर शोधा. ते उत्तम असेल तर काम सोपे नाहीतर ते वातावरण पाहिले शुद्ध करण्याचा प्रयत्न करूया..

३. तुम्ही आयुष्य बदलण्यासाठी कोणती रिस्क घ्यायला तयार आहात का?

जर तुमची परिस्थिती तुमचे जगणे नको करत असेल तर तुम्हाला पाऊल पुढे टाकता आले पाहिजे.. जे काही तुम्हाला आडवत आहे त्याच्या पलीकडे जाऊनच तुम्हाला हवी तशी लाइफस्टाइल तुम्ही जगु शकाल..

मग जुनाट पाश तोडून पुढे जायची आहे का तेवढी हिम्मत तुमच्यात ते पहा.. नोकरी असो किंवा संसार..!!

४. तुम्हाला एकट्याने काम करायला आवडते की घोळक्यामध्ये राहून?

तुमचा सध्याचा जॉब सोडून तुम्हाला स्वतःचा व्यवसाय करायला आवडेल की नोकरीच्या रोजच्या रुटीन मध्ये तुम्ही आनंदी आहात का ते पहा.

किंवा एकटे न्यूक्लिअर फॅमिली मध्ये राहणे पसंत नसेल तर जॉईंट फॅमिली मध्ये राहणे आवडेल का ते तपासा.

कदाचित तुम्हाला माणसांची आवड असेल तर आपल्या जिवाभावाच्या माणसांच्या घोळक्यात तुम्ही पुन्हा स्वतःला शोधू शकाल.

कधी कधी एकटेपणही तुम्हाला स्वतःपासून तोडते. किंवा सतत ढीग भर माणसांच्यामध्ये राहिल्याने तुम्ही तुमच्या राहत नाही.

तेव्हा स्वतःबद्दल विचार करायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला काय रुचतंय ते पाहणे महत्वाचे..

५. तुमची शक्तीस्थाने काय आहेत?

तुम्हाला काय वाटते? तुमच्या मध्ये कोणकोणत्या उत्तम क्वालिटीज आहेत?? त्या क्वालिटीज तुम्हाला खूप काही फायदे मिळवून देणाऱ्या असतात.

पण तुम्ही त्यांचा कधी विचारच केला नसेल तर तेच तेच रुटीन तुमच्या वाट्याला येतं.. जो तुमचा सगळ्यात भारी गुण आहे त्याला तुम्ही कसे वापरू शकाल त्याचा आढावा घ्या. कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यांपासून वेगळं बनवते ते ही शोधायला विसरू नका..

६. तुमच्यातले दोष कोणते?

दोष, दुबळे घटक सगळ्यांच्या मध्ये असतात. ते माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीला अडथळा येतो आणि म्हणूनच त्यांचे निर्मूलन केल्यास आपण स्वतःला परत रुळावर आणू शकतो.

७. तुम्हाला स्पर्धा आवडते का?

स्पर्धा दोन प्रकारच्या असतात. एक जी तुम्हाला सतत कार्यरत ठेवते आणि दुसरी म्हणजे जी तुम्हाला सतत दुर्बल असल्याचे जाणवून देते. जर तुम्ही दुसऱ्या प्रकारच्या स्पर्धेत अडकलात तर तुम्ही नक्कीच हरवून जाल..

पण पहिल्या प्रकारची स्पर्धा सगळ्यांनीच केली पाहिजे.. एक माणूस म्हणून आपण नेहमीच grow होणे आपल्याला ह्या युगात टिकवून ठेवते.

८. तुमची आवड काय आहे?

तुम्हाला कोणत्या पद्धतीचे सिनेमे आवडतात? कोणती पुस्तके तुम्ही तासंतास वाचू शकता? कोणते टीव्ही शो तुम्हाला आकर्षित करतात?

ह्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला खूप काही सांगून जातात. तुमचा स्वभाव कसा आहे किंवा तुम्ही कोणत्या पठडीतले मनुष्य आहात हे तुमच्या आवडी निवडीतून कळते.

९. तुम्ही कायदे, रूढी पपरंपरांचे पालन करू शकता की त्याच्या विरोधात राहायला तुम्हाला आवडते?

ह्याचा शोध तुम्हाला तुम्ही बंडखोर आहात की सहनशील हे नक्कीच सांगेल. तुम्हाला काय आवडते किंवा खटकते हे जर तुम्ही खुल्या मनाने बिनधास्त सांगू शकत असला तर तुम्ही बोल्ड आहात आणि कोणी तुम्हाला काही रूढी परंपरा न पटताही करायला लावत असेल आणि तुम्ही त्याला पुरजोर विरोध करत असाल तर बंडखोरी कुठेतरी तुमच्यात आहे!! बाकी भिडस्त असणे ही वाईट नाही.. मात्र त्यामुळे आपले काही नुकसान तर नाही ना ते तपासावे..

१०. तुम्हाला सकाळ आवडते की संध्याकाळ?

ह्यावरून तुम्ही तुमच्या स्वभावाचा मागोवा काढू शकता. तुम्ही मॉर्निंग पर्सन आहात की ईव्हीनिंग पर्सन ह्यावरून तुमच्यात असणारी काम करायची एनर्जी तुम्ही धुंडाळू शकाल.

११. तुम्ही कशा बद्दल खोटे बोलता आणि का?

हे आपल्यातल्या छुप्या शत्रूंना बाहेर काढेल. आपण खोटे बोलतो ते कशाबद्दल हे कळल्यास आपल्याला पुढे जाण्यापासून काय थांबवते ते तुम्हाला सहज लक्षात येईल.

मला अजिबात लग्नकार्यात किंवा कुठल्या कार्यक्रमात जायला आवडत नाही.. असा बहाणा हे सांगतो की तुम्हाला चार चौघांच्यात जायला भीती वाटत असावी. पण जर तुम्ही हिम्मत करून चार चौघांच्यात वावरलात तर तुम्हाला स्वतःला आत्मविश्वास मिळेल..

१२. पैसा ही संकल्पना नसती तर तुम्ही काय केले असते?

नोकरी करणाऱ्यांसाठी जर बघितलं तर पैसा आहे म्हणून तो कमावणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी लागणारं स्किल आपण शिकतो. जीव ओतून काम करतो आणि मग एक मोठया आकड्याचा पगार दर महिन्याला आपल्या खात्यावर जमा होतो.. पण पैसा नावाची कोणती गोष्टच नसती तर..? तर तुम्ही काय करत आयुष्य घालवले असते हे स्वतः विचारून पहा.. जे उत्तर मिळेल ती तुमची सुप्त इच्छा.. तिला खत पाणी घाला..

१३. स्वतःच्या चुका तुम्ही मान्य करता का?

चूक मान्य करणे हे सध्या आऊट ऑफ फॅशन झाले आहे. पण तरीही तुम्हाला जर स्वतःच्या चुका मान्य करता येत असतील तर तुम्ही अगदी जेन्यूईन व्यक्ती आहात.

कारण जो चुका करतो आणि जो तो मान्य करू शकतो तोच आयुष्यात खूप काही शिकू शकतो. नाहीतर बाकीचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले असतात..

१४. करिअर की कुटुंब.. काय महत्वाचे आहे?

स्वतःला हा प्रश्न जरूर विचारला पाहिजे.. ह्यामुळे तुम्हाला कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे आहे ते कळेल.. दोन्ही डगरींवर पाय देणे अयोग्य..

इतक्या महत्वाच्या प्रश्नोत्तराच्या परीक्षेनंतर तुम्हाला तुमची नव्याने ओळख होऊ लागेल हे नक्की..

कदाचित महत्वाकांक्षेच्या उंबरठ्यावर सुद्धा तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारले नसतील. जशी जशी आपली परिपक्वता/ मॅच्युरिटी वाढत जाते तसतसे आपले आयुष्यातील ध्येय एकदम स्वच्छ दिसायला लागतात..

त्यामुळे आयुष्याच्या प्रवासात स्वतःला हरवू न देणे हे आपण कसोशीने सांभाळले पाहिजे. स्वतःशी संवाद ठेवलाच पाहिजे. त्यानेच आपण हव्या असलेल्या मार्गावर क्रमण करत राहतो.. मग आरशात पाहत उभे राहिल्यावर आपल्याला दुसरी कोणी स्त्री नव्हे तर आपल्याच मनात असलेली छबी नक्की दिसेल..!!

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “आयुष्याची दिशा भरकटल्यासारखी वाटतेय? मग स्वतःला विचारून पहा हे प्रश्न”

  1. Help me to improve myself.
    I can not take a single dicission. I don’t know what I like. I don’t know what I want to do…. Iam always in confusion..

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।