२००४ साली या फेसबुकची स्थापना झाली पण साधारण २००९ नंतर आपल्या भारतात फेसबुकच्या वापराने जोम धरला आणि पाहता पाहता २०१२-१३ च्या आसपास भारतात प्रत्येक १० मधले ७ जण फेसबुकचा वापर करू लागले. एका सर्वेक्षणानुसार जगातले जगातले ९४% किशोरवयीन मुले अथवा मुली फेसबूकवर वापरतात? त्यातले सरासरी फक्त निम्मी मुले म्हणतात कि त्यांच्या फ्रेंड लिस्ट मध्ये ५०० पेक्षा कमी मित्र अथवा मैत्रिणी आहेत. आणि जास्तीत जास्त किशोरवयीन फेसबुक वापरणाऱ्यांना हजारापेक्षाही जास्त मित्र मैत्रिणी आहेत!!!! धक्कादायक गोष्ट तर हि आहे कि या सर्वेक्षणानुसार टिनेजर्स प्रमाणेच ९-१० वर्षे वयाच्या मुलांचे प्रमाणही यात बरेच मोठे आहे. आणि हि आकडेवारी येणाऱ्या काही वर्षात नक्कीच वाढलेली असेल.
थोडक्यात काय तर आपण जेवढे जास्त मुलांना यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढीच त्याबद्दल त्यांची उत्सुकता वाढेल. तर का नाही पालकांनीच अशा वयात मुलांना सोशल मीडियाची ओळख करून द्यावी ज्या वयात ते पालकांचे सल्ले ऐकतात.
आजच्या धकाधकीच्या जीवनात आई वडील दोघेही नोकरी व्यवसायात गुंतल्यामुळे नक्कीच त्यांना तितका वेळ नसतो पण आपण स्वतः फेसबुक व्हाट्स अँप वर वेळ घालवत असतानाच पालकांनी मुलांची या माध्यमाबरोबर ओळख करून दिली तर त्यांच्या उत्साहाला नक्कीच चांगल्या दिशेने वळवता येईल!! स्वतः यामध्ये सहभागी राहून मुलांच्या शाळेतल्या अचिव्हमेंट्स त्यांना पोस्ट करायला लावून त्यांना त्याचा सकारात्मक उपयोग करायची सवय आपण लावू शकतो. सोशल मीडियावरचा त्यांचा पहिला मित्र किंवा मैत्रीण बनून पालक आणि मुलांमधले नाते सुद्धा द्रुढ होऊ शकते. बरेचदा लाजाळू मुलांना व्यक्त होण्यासाठी हे माध्यम उपयोगात आणले जाऊ शकते आणि नंतर हेच व्हर्चुअल ट्रेनिंग प्रत्यक्षात वापरण्यासाठी पालकच त्यांना प्रोत्साहित करू शकतात.
असेच एकदा माझे एका मैत्रिणीबरोबर या विषयावर बोलणे झाले होते. त्यावेळी तिची मुलगी आस्था नऊच वर्षांची होती पण तिच्या १० वर्षाच्या भाच्याचं घरच्यांना “ब्लॉक” करून वापरत असलेलं फेसबुक प्रोफाइल हा तिच्या काळजीचा विषय होता. नंतर काही महिन्यांनी ती मला भेटली तेव्हा तिने मला सांगितले की तीने आस्थाचे फेसबुक अकाउंट स्वतःच चालू करून दिले आणि काहीसे निमंत्रण दिल्याच्या थाटात मला आस्थाची “Friend request accept” करायला सांगूनही टाकले.? मीही तिला माझ्याकडून डिस्क्लेमर देऊन मोकळी झाले की तू बरोबर असतानाच तिला ते फेसबुक वापरू दे!! आणि हा सायबर गुन्हा करण्याची आयडिया तू माझ्याकडून घेतली असे मात्र कोणाला सांगू नकोस?
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
We both are using FB.My teenager daughter insist me to open it.She taught me everything.I too always shows them interesting posts.I share their achievements school activities on it.Our use of social media is very transparent.No coding no lock.Surprisingly she never wants to open her account.It is only possible because of transparency and faith in our relationship
You are right Varsha faith is important in parent-child relationship.