तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक केलेलं आहे का? आणि जर नसेल केलं तर लगेच करून घ्या कारण (Deadline for Linking Aadhar with PAN) ३० जून हि पॅन आधार लिंक करण्याची शेवटची तारीख आहे. तसे न केल्यास भरावा लागणारा दंड हा रु. ५००/- वरून वाढवून रु. १०००/- केला जाणार आहे.
गेल्या वर्षी कोविडमुळे हि तारीख वेळोवेळी वाढवून देण्यात आली.
३० जून नंतर हि तारीख वाढवून देण्यात आली नाही तर आधारशी लिंक नसलेले पॅन कार्ड हे ‘इनऑपरेटिव्ह’ केले जातील.
पॅन कार्ड ‘इनऑपरेटिव्ह’ झाल्यास इन्कम टॅक्सच्या सेक्शन 234H नुसार दंड आकारला जाण्याची तरतूद सुद्धा केली गेलेली आहे.
आपल्याला माहित आहे फक्त मोठे आर्थिक व्यवहारच नाहीत तर बँकेचे खाते उघडताना तसेच इतरही महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला पॅन कार्ड दाखवणे हे अनिवार्य असते.
५० हजारांपेक्षा जास्त रकमेचे रोख व्यवहार करताना सुद्धा पॅन ची गरज भासते.
१ एप्रिल २०२३ नंतर पॅन आधार लिंक केले गेले नसेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून रुपये १० हजाराचा दंड हि लावला जाऊ शकतो.
आता आधी आपण बघूया आपले पॅन आधारशी लिंक आहे का हे कसे तपासायचे?
हे बघण्यासाठी सर्वप्रथम https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html या वेबसाईटवर जा
यामध्ये पॅन आणि आधार नम्बर टाकल्यानंतर तुमचे आधार आणि पॅन लिंक आहेत का? हे सांगणारा मेसेज दिसेल.
आणि जर ते लिंक नसतील तर ते लिंक करण्याच्या तीन पद्धती आहेत.
1) पद्धत १ : पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाईटवर जा.
चित्रात दाखवल्याप्रमाणे डावीकडून चौथ्या क्रमांकावर Link Aadhar या टॅब वर क्लिक करा.
त्यानंतर खाली दिलेली विंडो ओपन होईल.
यामध्ये विचारलेली पूर्ण माहिती भरून Link Aadhar या टॅब वर क्लिक केले असता. ती माहिती UADAI कडे पाठवली जाईल. आणि तुमचे आधार पॅन कार्ड बरोबर लिंक होईल.
2) पद्धत २ : 567678 किंवा 56161 या क्रमांकावर तुमच्या आधार बरोबर संलग्न म्हणजे रजिस्टर्ड मोबाईल नम्बर वरून खालील प्रमाणे SMS पाठवा…
UIDPAN <12 Digit Aadhar Number> <10 Charactor-Digit PAN Number>
3) पद्धत ३: या शिवाय अथोराइज्ड पॅन सर्व्हिस सेंटर वर जाऊन सुद्धा तुम्ही पॅन नम्बर आधार नम्बरशी लिंक करू शकता.
हे काम ३० जून पर्यंत तुम्हाला पूर्ण करायचे आहे बरंका. परंतु आधार आणि पॅन वरील नावात तफावत असेल तर मात्र या वेबसाइटवरून पॅन आणि आधार लिंक करायचे काम होणार नाही. आणि त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर भेट द्यावी लागेल.
आपले आधार कार्ड मोबाईल नंबर बरोबर अपडेट कसे करावे
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.