प्रेम

गर्मीचे दिवस आणि त्यात तिच्याजवळ विनाकारण बोलणे म्हणजे भर दुपारी उन्हात उभं राहून उष्माघाताने मरणे 😫….. असं मला वाटायचं पण ती तर भलतीच थंडगार सावली निघाली..!🏕

ती आणि मी एकाच लायब्ररीत जायचो आणि कधी कधी एकमेकांच्या बाजूला पण बसायचो पण कधी बोलणं काही झालं नाही….. म्हणून म्हटलं की काहीहि करून बोलायचंच…….

गर्मीचे दिवस असल्याने सगळ्यांकडे पाण्याची बाटली सोबत असायची आणि ती देखील रोज घेऊन यायची.

तिच्याशी बोलायचं म्हणून मी दुसऱ्या दिवशी पाण्याची बाटली सोबत घेतली नाही किमान वाटलं पाणी मागण्याच्या निमित्ताने तर आमचं बोलणं होईल…..🙇🏻

मग शेवटी घाबरत घाबरत धीर करून तिच्याकडे पाहिलं…… आणि तेवढ्यात तिने पण माझ्याकडे पाहिले.

पुढे दोघांच्या तोंडातून एकच प्रश्न बाहेर पडला…

“पाणी आहे का ???”💑

तात्पर्य:- तहान दोघांनाही लागली होती…😘

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “प्रेम”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

30 Days Challenge For Financial Independence – दिवस पहिला मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।