मधुमेह किंवा डायबेटीस हा एक भयंकर आजार आहे. मात्र तुम्ही तुमच्या शरीरातील शुगर लेव्हल कंट्रोल करुन या समस्येवर मात करू शकता.
शुगरची चिंता सतत मनात ठेवूनच डायबेटिस असणारे लोक गोड खाण्याचं टाळतात. अगदी फळंसुद्धा खात नाहीत. फळांमध्ये साखर असते, तर फळे खाऊ नये. या भीतीत आणि गैरसमजात लोक राहतात.
खरंतर डायबेटीस असोसिएशनचं असं म्हणणं आहे की डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींनी सगळ्या प्रकारची फळं खाल्ली पाहिजेत.
काहींना एखाद्या प्रकारच्या फळाची अँलर्जी असते तेव्हढं फळ सोडून बाकीची फळं खायला काहीच हरकत नाही.
नँशनल इंस्टीट्यूट ऑफ़ डायबेटिक अँड डाइजेस्टिव अँड किडनी डिसीज यांच्या मताप्रमाणे डायबेटीसचा सामना करणाऱ्या व्यक्तींनी फळांचा ज्युस, बाजारात उपलब्ध असणारा फळांचा रस कधीही पिऊ नयेत .
याचं एकमात्र कारण यामध्ये असणारं साखरेचं प्रमाण जे शुगर लेव्हल वाढवण्याचंच काम करतं.
त्याऐवजी डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींनी ताजी फळं खावीत. तुम्हांला डायबेटीस असेल तर कोणकोणती फळं तुम्ही खाऊ शकता चला जाणून घेऊया.
1) स्ट्राॅबेरी
स्ट्राॅबेरी एक पौष्टिक फळ आहे. यामध्ये अँथोसायनिन नावाचं एक अँटीऑक्सीडेंट असतं ज्यामुळं स्ट्राॅबेरीचा रंग लालचुटूक असतो.
अँथोसायनिन कोलेस्ट्रॉल आणि इन्शुलिन वर नियंत्रण ठेवतं. याचबरोबर ब्लडशुगर व्यवस्थित कंट्रोल करून हृदयरोगींना दिलासा देतं.
एक कप स्ट्राॅबेरीत 49 कँलरी, 11 ग्राम कार्ब्स आणि 3 ग्रँम फायबर असतं.
स्ट्रॉबेरी मधले अँटी-इन्फ्लेमेटरी गुण हृदयच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात.
2) चेरी
डायबेटीस पेशंटसाठी चेरी एक चांगला पर्याय आहे.
चेरीच्या एका कपात 78 कँलरी आणि 19 ग्रँम कार्ब्स असतात.
शरीरावरील सूज कमी कमी करायला चेरी मदत करते.
यामध्ये उपलब्ध असणाऱ्या ऑक्सीडेंट्समुळे हृदय विकार, कँसर आणि इतर आजारांमध्ये आराम मिळतो.
फ्रोझन चेरी मिळाली तरी हरकत नाही मात्र डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींनी शक्य असेल तर ताज्या चेरी आवर्जून खा.
कोणत्याही रुपात चेरी खाता येते. बाजारात चेरीपासून केलेले पुष्कळ पदार्थ मिळतात. मात्र यात भरपूर साखर असते.
अर्थात त्यामुळं तुमची शुगर वाढू शकते. त्यामुळे चेरीपासून तयार केलेले पदार्थ खाणे मात्र टाळावे.
3) पौष्टिक सफरचंद
सफरचंद चवीला जितकं टेस्टी तितकंच ते आरोग्यासाठी उपयुक्त ही आहे.
एका छोट्या सफरचंदात 77 कँलरी आणि 21 ग्रँम कार्ब्स असतं. त्याचबरोबर फायबरचं प्रमाण ही भरपूर असतं, शिवाय सफरचंदात व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं.
याचमुळं डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी सफरचंद उत्तम पर्याय ठरतो. मात्र तुम्ही हे सफरचंद सालीसकट खाल्लं पाहिजे म्हणजे सालीतल्या पौष्टिक तत्वांचा आणि अँटीऑक्सीडेंचा फायदा तुम्हांला मिळू शकतो.
4) उपयोगी अॅवोकाडो
खरंतरं अॅवोकाडोमध्ये खूप फँट असतं. मात्र हे फँट मोनोसँच्युरेटेड असल्याने शरीरासाठी उपयुक्त ठरतं.
डायबेटिस असलेल्यांसाठी हे फळ उत्तम असतं.
अॅवोकाडो नुसतंच खाता येतं किंवा काही हर्ब्ससह लिंबाचे काही थेंब घालून अॅवोकाडो खाल्लंत तर उत्तम स्वादाची अनुभूती घेता येईल.
5) लाभदायक नाशपती
नाशपती फायबर आणि व्हिटॅमिनयुक्त असल्याने ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी आपल्या आहारात याचा जरूर वापर करावा.
सगळी फळं रूम टेंपरेचरमध्ये खाण्यायोग्य असतात. पण नाशपती एकदा कापलं की तसचं ठेवता येत नाही, त्यामुळं ते पटकन संपवून टाका कारण ते टिकणार नाही.
बाकीच्या फळांबरोबर ही नाशपती कापून तुम्ही खाऊ शकता.
6) स्वादिष्ट किवी
डेंग्यूच्या साथीत आपल्याकडे किवी फळाला प्रचंड मागणी आली होती.
यामध्ये असणारी 56 कैलोरी आणि 13 ग्रँम कार्बोहाइड्रेट डायबेटीसच्या पेशंटना सुद्धा उपयोगी ठरतात.
पोटँशियम, फायबर आणि व्हिटॅमिन सी यात भरपूर प्रमाणात असतात.
किवी फळ वर्षभर मिळतं, तुम्ही हे फळ फ्रीजमध्ये तीन आठवड्यापर्यंत साठवू शकता.
तात्पर्य इतकचं की कोणतंही कारण न देता किवीचा तुम्ही आहारात समावेश करा.
तर मित्रांनो ही फळं सगळ्यांसाठी आरोग्यदायी ठरतातच, पण डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून या फळांना आपल्या आहारात सामावून घ्यावं, ज्यामुळं तुमची शुगर कंट्रोल मध्ये राहिल.
जास्त साखर खाण्याचे दुष्परिणाम काय आणि साखरेचे प्रमाण कमी कसे करावे?
डायबिटीसचे अचूक निदान करण्यासाठी Hba1c टेस्ट करणे गरजेचे का आहे?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.