आपण आपापलं आयुष्य जगण्यात अगदी गुंतलेले असतो. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, मुलांचं शिक्षण आणि संसाराचे इतर व्याप यात आपल्यासारखी सामान्य माणसं इतकी अडकून पडतात की आपलं आयुष्य नेमकं कोणत्या दिशेने चाललंय हे समजत सुद्धा नाही.
पण कधीकधी अचानक अशा काही घटना घडतात की आपण मुळापासून हादरून जातो.
एखादा जीवघेणा आजार किंवा अपघात, प्रचंड आर्थिक नुकसान किंवा आपलं भावनिक जग उद्ध्वस्त करणारी घटना जेव्हा घडते, त्यावेळी आपल्या सर्व जाणीवा जणू गोठून जातात. आणि या धक्क्यातून सावरत असताना सभोवतालचे जग आपल्याला पूर्णपणे वेगळे दिसू लागते. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी नेमक्या कोणत्या हे कळेनासे होते.
अशावेळी स्वतःचे पुन्हा एकदा परिक्षण करणे खूप गरजेचे असते. आणि हे कसे करायचे ते सांगण्यासाठी हा खास लेख आम्ही घेऊन आलो आहोत.
या लेखातून आम्ही असे चोवीस प्रश्न तुमच्या समोर ठेवणार आहोत, की ज्यामुळे तुम्ही आपल्या आयुष्याचा आढावा घेऊ शकता. त्यात आवश्यक ते बदल करु शकता. आणि नव्याने जीवनाचा आनंद घेऊ शकता.
आयुष्याचा आढावा घेण्यासाठी स्वतःला विचार हे २४ प्रश्न!
१. मी वर्तमानकाळात जगत आहे का?
वर्तमानकाळात जगणे म्हणजे आज, आता, याक्षणी मी जे काही करत आहे त्याची पूर्ण जाणीव ठेवणे. त्या कामाचा आनंद घेणे. मग ते काम कितीही लहान किंवा अगदी रोजच्या रुटीनचे का असेना. पण आपण इतके घाईत असतो की रोजची कामे यांत्रिकपणे उरकून टाकतो.
सकाळचा चहा किंवा आंघोळ ह्या रोजच्या कामाचं उदाहरण घेऊया. आपण सकाळी इतक्या गडबडीत असतो की चहाचा कप एकदा तोंडाला लावला की मन पुढच्या कामाकडे धावतं. असं न करता, तो क्षण समरसून जगणं शिकलं पाहिजे.
कोणत्याही गोष्टीचा मनसोक्त आनंद घ्यायचा तर आपलं संपूर्ण लक्ष त्यावेळी एकाग्र असलं पाहिजे. मग रोजचा चहाचा सुगंध, वाफाळणारा कप वेगळा भासेल. असंच प्रत्येक क्षणी जागरूकतेने काम केलं तर आपण जीवनाचा आनंद घेऊ शकतो.
हा आनंद काही मोठ्या घटनांमध्ये नाही तर रोजच्या लहान सहान क्षणांमध्ये दडलेला आहे. गरज आहे आपण सजग होण्याची आणि या क्षणांशी एकरुप होऊन जगण्याची !!!
२. माझ्या जीवलग व्यक्तींसोबत मी आयुष्याचा आनंद घेतोय का?
आपलं आयुष्य हे ठराविक वर्षांचं आहे आणि काळ कोणासाठीही थांबत नाही. त्यामुळे तुमच्या जवळच्या माणसांना वेळ द्या. ते तुमच्यासाठी जो वेळ देतात त्याचा आदर करा. जाणीवपूर्वक आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत जगा. कारण तुम्ही इतर कोणत्याही महागड्या भेटवस्तू इतरांना देऊ शकता, पण निघून गेलेली वेळ परत आणू शकत नाही. म्हणून आपल्या जीवलग व्यक्तींसोबत असे आनंदाने जगा की त्या सुखद आठवणी कायम तुम्हाला सोबत करतील.
३. प्रत्येक परिस्थिती जशी आहे तशी मी स्विकारतो का?
आपलं आयुष्य हे अनेक बऱ्यावाईट घटनांचं एकत्र फलित आहे. काही घटना अतिशय उत्तम, काही अपेक्षेप्रमाणे, काही अनपेक्षित तर काही घटना अत्यंत दुर्दैवी!!! पण या घटनांकडे आपण कसे पहातो हे महत्त्वाचे आहे. आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या लोकांचा सहवास, मनासारखे यश याबाबत आपण सदैव कृतज्ञता बाळगली पाहिजे. आणि दु:खदायक अनुभव, वेदना हे सर्व आयुष्याचा एक भाग म्हणून स्विकारले पाहिजे. या वाईट घटनांमध्ये देखील कोणतीतरी शिकवण असते. त्यापासून धडा घेऊन पुढे वाटचाल सुरू ठेवली पाहिजे.
कित्येक वेळा या वाईट घटना आपली परीक्षा घेत असतात. त्यातून तावून सुलाखून बाहेर निघालेली व्यक्ती अगदी झळाळून उठते.
यापुढे पूर्ण लेख तुम्ही ऍमेझॉन किंडल वर जाहिरातींविना वाचू शकाल.
रहस्य जगण्याचे : समाधानी आयुष्याचे पुस्तक अमेझॉनवर खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे या पुस्तकाची अनुक्रमणिका खाली दिलेली आहे.
- अस्थिर मनाला शांत करणारी ही आहेत १५ जादूई वाक्यं!!!
- तणावाखाली असतानाही मानसिक ताकद टिकवून ठेवणाऱ्या पाच सवयी.
- निराशेतच दडलाय ध्येय गाठण्याचा मार्ग!!!
- अडचणीतून मार्ग काढून आयुष्य रुळावर कसं आणावं?
- मनातून विचारांचे वादळ काढून टाकून जगण्याची कला शिकवणारे आठ सोपे मार्ग.
- वाईट विचारांच्या भुताला कसे पळवून लावावे, यासाठीचे तीन नियम!!
- आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल
- हे तेरा प्र श्नं स्वतःला विचारून स्वतः मधले उत्तम व्हर्जन विकसित करा!
- तुम्ही भरभरून का जगू शकत नाही? जाणून घ्या कारणे.
- नीरस आयुष्य सप्तरंगी करण्याचे दहा उपाय.
- आपला अंतरात्मा काय सांगतो ते ऐका.. या पाच कारणांसाठी.
- आयुष्याचा आढावा घ्यायचाय? हे चोवीस प्रश्न स्वतः ला विचारा.
- स्वतःसाठी या दहा गोष्टी करायला कधीच घाबरु नका
- पॉझिटिव्ह एनर्जी साठी करा हे पाच उपाय!!!
- मनाशी दोस्ती करण्याचे ५ उपाय.
- स्वतः वर प्रेम करा, आयुष्य सुंदर भासेल!!!
- स्वप्नं वास्तवात आणण्यासाठी हे करा…!!!
- जीवन मूल्य म्हणजे काय? आणि ती जपायची कशी?
- समाधानी आयुष्याची त्रिसूत्री!!!
- एक मुक्तपत्र… तुमच्या मनाचे मैत्र!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.