पांडवानो, युद्ध टाळुन घरी बसावं अशी तुमची कितीही इच्छा असली, तरी हे शक्य नाही. तुम्हाला वाटतयं, कसलीच भांडणे नकोत, आरामदायक जीवन जगावे, कलह नकोत, स्वार्थ नको, आम्ही कोणाला दुखवणार नाही, आम्हालाही सन्मानाने जगु द्या, पण तुमच्यापुढे ऑप्शन नाहीच.
श्रीकृष्ण
“बाळा, आयुष्यात शक्यतो, होईल तितकं, संघर्ष करणं टाळावं!”
वडील आपल्या लाडक्या मुलाला एक धडा शिकवत होते, त्याला नीट समजावं म्हणुन त्यांनी महाभारतातील एका घटनेचा एक रेफरन्स द्यायला सुरुवात केली.
“जेव्हा अज्ञातवास संपवुन पांडव प्रकट झाले, तेव्हा युद्ध आणि संहार टाळण्याचा शेवटचा प्रयत्न, म्हणुन कृष्ण संधीचा प्रस्ताव घेऊन कौरवांच्या दरबारात गेले.
कृष्ण धृतराष्ट्रासमोर एक प्रस्ताव मांडतो, राज्य तुलाच राहु दे, पांडवांना फक्त पाच गावं दे, बाकीचं राज्य खुशाल ठेवुन घे.”
“पांडवांच्या मनात वेडी अशा होती, की दुर्योधनाशी सलोखा होईल. झालं गेलं विसरुन पुन्हा आपण सुखानं नांदु, मात्र कृष्णाला युद्ध हवं होतं. त्याला दुष्टांचं निर्दालन करायचं होतं.
धर्माचं राज्य आणणं, हाच त्याच्या अवताराचा हेतु होता. तरीही कौरव पांडव यांच्यात शिष्टाई व्हावी, म्हणुन त्याने शेवटचा प्रयत्न केला. दुर्योधन युद्धासाठी आसुसलेला होता.
सुईच्या टोकाईइतकी भुमीसुद्धा देणार नाही असं म्हणुन, त्याने अपेक्षेप्रमाणे कृष्णाचा प्रस्ताव धुडकावुन लावला.”
“मग कृष्ण त्यांच्या दरबारात शिष्टाई करण्यासाठी गेलेच कशासाठी?”
“ते पांडवांना दाखवण्यासाठी की बघा, दुर्योधन किती अन्यायी आहे, स्वार्थी आहे, त्याचं खरं रुप ओळखा.”
कारण त्याला पांडवांना मॅसेज द्यायचा होता, “पांडवानो, युद्ध टाळुन घरी बसावं अशी तुमची कितीही इच्छा असली, तरी हे शक्य नाही.
तुम्हाला वाटतयं, कसलीच भांडणे नकोत, आरामदायक जीवन जगावे, कलह नकोत, स्वार्थ नको, आम्ही कोणाला दुखवणार नाही, आम्हालाही सन्मानाने जगु द्या, पण तुमच्यापुढे ऑप्शन नाहीच.”
युद्धाचा नियम आहे, जो पक्ष मानसिकरित्या प्रबळ कणखर असतो, तोच जिंकतो.
शेवटी कौरवपांडवांचही युद्ध झालं, कौरवांची सेना संख्येने मोठी होती, पांडव जिंकले, कारण त्यांचा नेता कृष्ण होता!
आता वळूया आपल्या आयुष्यातील युध्दांकडे…
असंच आपल्यालाही आयुष्यात संघर्ष नको असतो. झिकझीक नको असते, पण परिस्थिती अशी असते, की जिथे संघर्ष अटळ असतो.
तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला युद्धाला सामोरं जावचं लागेल आणि एक सत्य हेही आहे की, जो मानसिकरित्या जास्त कणखर असेल, तोच हे युद्ध जिंकेल.
मित्रांनो, इटली आणि ऑस्ट्रीया यांचं घनघोर युद्ध सुरु होतं. तेव्हा मॅझिनी नावाचा इटलीचा मुत्सद्दी नेता होता. चिमुकल्या इटलीतल्या लोकांना, अन्यायाविरुद्ध उठाव करण्यासाठी त्याने प्रवृत्त केलं, कानमंत्र देऊन त्याने लोकांमध्ये चैतन्य जागवलं.
युद्ध जिंकण्यासाठी त्याने दिलेले तीन मुलमंत्र आपल्यालाही मानसिक युद्ध जिंकायला मदत करेल.
१) हाताला मिळेल, ते हत्यार घेऊन लढा.
मॅझिनी लोकांना म्हणायचा, जे शस्त्र मिळेल, ते हातात घेऊन लढा, भाला, तलवारी नाही मिळाले तर लाकडाचे दंडुके घेऊन सज्ज व्हा. शस्त्रांपेक्षा जास्त शक्ती मनामध्ये असते.
मानसिकरित्या कणखर बनण्यासाठीसुद्धा असंचं आपल्याकडे जे आहे, त्याचा वापर करावा. काहीतरी मिळण्याची वाट बघत बसु नका, जे हातात आहे, तेच वापरुन लढायला सज्ज व्हा.
२) स्वतःची मानसिक ताकत वाढवा.
1) दररोज घडणाऱ्या बऱ्या वाईट प्रसंगांचा तुमच्यावर परिणाम होतो का?
2) जरा कोणी काही रागाने बोललं, एखादं छोटंमोठं नुकसान झालं की लगेच तुमचा मुड ऑफ होतो का?
3) एखादी किरकोळ गोष्ट मनासारखी नाही झाली की, लगेच तुमची चिडचिड होते का?
4) आपल्यावर अन्याय झाला की आपण अस्वस्थ होऊन कामावरचा आपला फोकस हरवतो का?
5) एखादं अपयश आपली शक्ती, उत्साह शोषुन का घेतं?
6) घडुन गेलेली एखादी दुर्देवी घटना, पुन्हापुन्हा आठवुन मनाला छळते का?
असं वारंवार होत असल्यास, तुम्हाला मनाला स्थिर करण्यासाठी, ध्यान करण्याची आवश्यकता आहे. शरीराची हालचाल होईल असा रोजचा व्यायामही आवश्यक आहे.
3) ऐक्य निर्माण करा.
आपल्या आजुबाजुच्या लोकांसोबत आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केल्यावर मनाची शक्ती वाढते. आत्मविश्वास वाढतो. दुसरा ‘दुसरा’ नाही, आपलाच आहे, असं मानल्यास समस्या चुटकीसरशी सुटतात.
लोकांमध्ये मिसळा, नवनवीन ओळखी बनवा, इतरांना बोलण्यात पुढाकार घ्या, हसत खेळत हलक्याफुलक्या विषयांवर संवाद साधण्याची कला डेव्हलप करा.
लोकांवर निर्मळ भावनेने प्रेम करा, लोकांना जोडल्याने पैसा मिळतो, आदर सन्मान मिळतो.
एखाद्याचं वागणं नाही पटलं, तर दुर्लक्ष करुन सरळ पुढे जा. त्याला धडा शिकवण्याच्या नादात वेळ आणि उर्जा वाया घालवु नका.
संतुलित व्यक्तीच्या मन आणि बुद्धीमध्येही ऐक्य असतं. ‘हे करु की ते करु’ असे प्रश्न घेऊन, ते कंफ्युज नसतात. विचारांची स्पष्टता स्पष्ट ध्येयातुन येते. मनाचा गोंधळ दुर करण्यासाठी स्पष्ट ध्येय ठरवा.
सगळं काही स्वच्छ, नितळ आणि क्लिअर दिसु लागेल.
धन्यवाद!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice I want to join Wattaapp
सध्या कुठलाही कोर्स शेड्युल नाही. मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स विनामूल्य मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या व्हाट्स ऍप नम्बरवर ‘अपडेट्स’ असा मेसेज पाठवल्यास अपडेट्स पाठवले जातील. ‘अपडेट्स सब्स्क्रिप्शन’ बंद करायचे असल्यास STOP UPDATES असा मेसेज पाठवावा लगेल.
धन्यवाद.
V. Nice
आज प्रत्येकाला जीवन जगताना नोकरी, उद्योग, काम – धंदा, शिक्षण या सारख्या व अशा अनेक ठिकाणी संघर्षाला सामोरं जावं लागतं.
त्यासाठी मनाचे talks टीम ने आजच्या लेखातुन जे तीन मूलमंत्र सांगितले आहेत त्याचा नक्कीच फायदा होईल या बद्दल मनाचे talks टीम चे मनापासून आभार, धन्यवाद.