“अचानक दम्याचा तीव्र अटॅक आला, आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले, सावरायला, दवाखान्यात नेऊन उपचार करायला वेळच मिळाला नाही म्हणाल्या, ”प्राणप्रिय आईने डोळ्यांसमोर जीव सोडला, यापेक्षा, ह्या जगात, तीव्र दुःख कोणते?
आई गेली, हे दुःख वेगळेच पण त्यासोबतच अजुन एक विचार त्यांना प्रचंड छळत होता, मनाला वेदना आणि यातना देत होता,
“मी आईला योग्य उपचार देण्यात कमी पडले का?” ,”मी तिची गुन्हेगार आहे का?” “मला माहित होते की, तिला दमा आहे, पण तो इतका सिरीअस आहे, असे मला कळाले नाही.”
“तिच्या मृत्युला मी जबाबदार आहे का?”
अपराधभाव, गिल्ट आणि आत्मग्लानी मनात ठेवुन कोणी सुखाने जगु शकेल काय?
आपल्या प्रिय व्यक्तीला गमावणं हे आयुष्यातलं सर्वात मोठ्ठं दुःख!
पण अपराधभाव मनात ठेऊन सुखी, आनंदी भविष्याकडे वाटचाल करता येईल का?
आणि आताच परत आमच्या ग्रुपमधल्या एका सदस्याने तोच प्रश्न पुन्हा विचारलाय, “करीअर मध्ये अपयशं आलं, मनातली गिल्ट छळत राहते, त्याचं काय करु?”
दोन रस्ते आहेत, “आपला पराभव उराशी जपुन ठेवा, आणि दुःखी व्हा!” किंवा “पराजयातुन धडा घे, आणि पुर्वीपेक्षा अधिक उत्साहाने आयुष्याला सामोरे जा, झोकुन देऊन लढाई लढ आणि विजयी बनुन दिमाखाने ह्या जगापुढे मिरव.”
पण मानसिक संतुलन असलेले बुद्धिमान लोक दुसरा पर्याय निवडतात….
पराजयातुन धडा घे, आणि पुर्वीपेक्षा अधिक उत्साहाने आयुष्याला सामोरे जा, झोकुन देऊन लढाई लढ आणि विजयी बनुन दिमाखाने ह्या जगापुढे मिरव.
मलाही माझ्या आयुष्यात अनेकदा पराभवाला सामोरं जावं लागलं, पण आम्ही मुळुमुळु रडत बसलो नाही, आणि अपराध बोध घेऊन जगलो नाही,
अर्रे हट!…
हे जग फक्त विजेत्या लोकांना सलाम करतं!
आणि रडक्या लोकांची देवही मदत करत नाही, फक्त कीव करतं!
तेव्हा माझं सांगणं एकच आहे, दोस्त!, मर्द बनुन लढ!
बरं! जे जे व्हायचं होतं ते सगळं घडणं अटळ होतं, ते घडुन गेलं.
टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, ती सुविधा आपल्याकडे नाही.
तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च होणार आहे.
व्यवहारात हिशोबी असलेलो, एकेक रुपया खर्चताना शंभरदा विचार करणारे आपण विचार करताना हिशोबी का होत नाही?
आणि मनामध्ये नको त्या घटना, आत्मग्लानी, गिल्ट, अपराधभाव, आपल्या हातुन झालेल्या चुका, भुतकाळातल्या सर्व सर्व वाईट घटना विसरुन जाणं, आपल्या भविष्यासाठी चांगलं आहे, हा साधा हिशोब आहे!
धो धो पावसात गाडी चालवताना, काचांवर व्हायपर का फिरवतात? समोरचं दिसलं नाही तर अपघात होईल म्हणुन!
तसंच मनात रुंजी घालणार्या वाईट आठवणीच्या, ओघळांना, रोजच्या रोज पुसुन टाकलं नाही, तर मनाच्या नितळ काचेतुन भविष्य कसं बर पाहता येईल.
शरीराला मजबुत बनवण्यासाठी व्यायाम करा, मनाला मजबुत बनवण्यासाठी व्यायाम करा.
कधी समस्यांपुढे तुम्ही कधी स्वतःला हतबल समजणार नाहीत.
बॅड मेमोरीज डिलीट करण्यासाठी एक सोपा प्रयोग सांगत आहे….
डोळे बंद करुन बसायचे आणि स्वतःच्या मनाला तीन वेळा सुचना द्यायची.
“माझ्या सर्व वाईट आठवणींना मी डिलीट करुन टाकत आहे.”
कल्पना करायची एक मनातला त्रासदायक आठवणींनी भरलेला कप्पा डिलीट होत आहे.
आनंदी व्हायचं आणि हलकंफुलकं होऊन पिसासारखं तरंगतोय असा अनुभव घ्यायचा!
खुपचं मजेशीर असतं हे!
आपले सर्वांचे मन, पर्वताहुन कणखर आणि फुलपाखरासारखं आनंदाने बागडणारं बनो, ह्या ह्रद्यपुर्वक प्रार्थनेसह…
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Khup chan lekh aahe,nice to Change our mind
Thanku
खूप छान लेख
मोटीवेशन कोर्स बद्दल कळवा