5 G इंटरनेट तुमच्या शहरात केव्हा सुरु होईल? त्याची किंमत काय असेल?

१ ऑक्टोबर २०२२ पासून आपल्या देशात 5G इंटरनेट सेवा सुरू झाली आहे.

याबाबत अधिक माहिती तुम्हाला देण्यासाठी हा लेख मनाचे Talks घेऊन येत आहे.

यातून 5G इंटरनेट स्पीड, कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध, याची किंमत, याचे फायदे, सिम कार्ड याबाबत सर्व काही जाणून घेऊया.

भारताचे पंतप्रधान श्री. नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा सुरु होत असल्याचे जाहीर करण्यात आले.

India Mobile Congress IMC 2022 या कार्यक्रमात त्यांनी 5G सेवा लॉन्च केली. या सेवेमुळे इंटरनेट स्पीड वाढणार आहे त्यामुळे 5G ही डिजीटल क्रांतीची सुरुवात आहे असे म्हणता येईल.

काय आहे 5G?

नेटवर्कचे 2G, 3G, 4G असे प्रकार आहेत. त्यानुसार 5G ही fifth generation अर्थात पाचवी पिढी होय. याचा वेग 4G पेक्षा किमान दहा पट जास्त असेल.

इंटरनेट सेवेमध्ये कालानुरूप सतत सुधारणा होत असते. डिजीटल तंत्रज्ञान सतत अपडेट होणे गरजेचे आहे.

त्यानुसार जगाच्या वेगाशी जुळवून घेण्यासाठी भारत आता सज्ज असेल.

5G स्पीड कसा असेल?

विविध टेलिकॉम कंपन्यांनी 5G च्या वेगाची चाचणी केली होती. यात एअरटेल, व्होडाफोन आयडिया, रिलायन्स जीओ यांचा डेटा अनुक्रमे 3000 Mbps, 3.7 Gbps व 1000 Mbps असा 5G स्पीड दाखवत आहेत.

यामुळे अवघ्या काही सेकंदात किंवा एखाद्या मिनिटात पूर्ण चित्रपट डाऊनलोड करता येऊ शकेल.

5G ची किंमत काय असेल?

जिओ आणि एअरटेल या कंपन्या 4G च्या किंमतीत 5G सेवा देण्याची शक्यता आहे. भारतात या सेवांचा अधिकृत दर अद्याप घोषित झालेला नाही.

परंतु सर्व टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रम लिलावात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. त्यावरुन 4G पेक्षा 20%पर्यंत ही सेवा अधिक महाग असू शकते.

5G सिम कार्ड

सध्या 2G ते 4G रेंज मधील सिम कार्ड उपलब्ध आहेत. 5G सेवा वापरण्यासाठी तुम्ही तुमचे 4G सिम अपग्रेड करु शकता.

तुमच्या टेलिकॉम ऑपरेटर ना कळवून तुम्ही अशाप्रकारे अपग्रेड करु शकता.

मग तुम्हाला सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. याचबरोबर जर 5G सेवेचा पूर्ण लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही सेल्युलर मोबाईल टॉवर क्षेत्राजवळ असणे आवश्यक आहे.

त्यामुळे यापुढील काळात मोबाईल टॉवर लोकेशन हा महत्त्वाचा मुद्दा असणार आहे.

भारतातील कोणत्या शहरांमध्ये 5G उपलब्ध असेल?

सध्या एअरटेलने भारतातील आठ शहरांमध्ये ही सेवा सुरू केली असून यात मुंबई, दिल्ली, वाराणसी आणि बेंगळुरू यांचा समावेश आहे.

तर जिओने दसऱ्याच्या मुहूर्तावर आपली 5G सेवा सुरू केली असून मुंबई, दिल्ली, वाराणसी आणि कोलकाता या शहरांना याचा लाभ मिळत आहे.

याखेरीज चंदीगड, पुणे, चेन्नई, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, जामनगर आणि अहमदाबाद या शहरांमध्ये सुरुवातीला ही सेवा उपलब्ध असेल.

भारत सरकारने प्रसारण मंत्रालयामार्फत संपूर्ण देशभर 5G सुरू करणार असल्याचे सांगितले. हे काम टप्प्याटप्प्याने केले जाईल.

पुढील सहा महिन्यांत अजून दोनशे ते सहाशे शहरांपर्यंत 5G सेवा पोहोचेल. आणि त्यापुढील दोन वर्षांत संपूर्ण देशात 5G इंटरनेट उपलब्ध होईल.

5G आणि औद्योगिक विकास

5G मुळे औद्योगिक क्षेत्रात मोठी उलाढाल होईल. सर्वप्रथम 5G नेटवर्क साठी आवश्यक असणारी यंत्रणा उभारणे. यात मोबाईल टॉवर्स आणि इतर सुविधांचा समावेश आहे.

अंदाजे पाच लाख करोड एवढी गुंतवणूक पुढील चार वर्षांत या क्षेत्रात केली जाईल.

5G मुळे मशिन्स, उपकरणे आणि माणसे जोडली जातील त्यामुळे हे तंत्रज्ञान प्रत्येकासाठी क्रांतिकारी ठरणार आहे.

वेगवान इंटरनेट मुळे देश विदेशातील उद्योग आपल्यासोबत व्यवसाय वाढवू शकतील.

औद्योगिक, शेतकी, शैक्षणिक, आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक अशा विविध क्षेत्रात अनेक नवीन संधी निर्माण होतील.

याखेरीज सायबर सिक्युरिटी, ट्रॅफिक कंट्रोल, बॅंकिंग पासून ते थेट भारतातील गावांची सुधारणा इथवर या तंत्रज्ञानाचा प्रभाव दिसून येईल.

संशोधन क्षेत्रात सुद्धा 5G मुळे खूपच सुधारणा होईल.

आत्मनिर्भर भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी टाकलेले 5G इंटरनेट हे महत्त्वाचे पाऊल आहे.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।