आयुष्यातले चैतन्य हरवले आणि सगळीकडे अंधारच दिसायला लागला तर ही लेखात सांगितलेली जीवनशैली निवडा. यात सांगितलेली नऊ सूत्रं पाळून जगण्यात पुन्हा ऊर्जा आणता येईल का हे स्वतःलाच एकदा विचारून बघा!
अडचण कुठलीही असो… नातेसंबंधातली, व्यवहारातली, आर्थिक अडचण किंवा या कोरोना संकटामुळे थिजलेलं जगणं…..
चारही बाजूने हताश, निराश करणाऱ्या घटना घडत असताना माणूस पूर्ण हतबल होतो..!! प्रत्येकाच्या आयुष्यात अशा प्रकारच्या घटना कधी ना कधी घडतात.. चालू काळ बघता पुढे आयुष्य कसे असेल ह्याचा अंदाजही लावता येत नाही.
अशा वेळी माणसाने काय करावे..? गलीत गात्र व्हावे.? निराश व्हावे? की रडत बसावे..??
जर छोट्या छोट्या वाईट घटना आयुष्यात घडत असतील तर नक्कीच माणूस निराश होतो, गलितगात्र होतो किंवा रडत बसतो..
तब्येतीची कुरबुर, नोकरी धंद्यात अपयश, नात्यांचा गुंता, पैशांची अडचण आणि प्राथमिक गरजाही भागवता येऊ नये अशी परिस्थिती झाली तर एखाद्या व्यक्तीची काय अवस्था होत असेल..??
तो आयुष्यातून उठतो.. सगळ्या चिंतांमुळे तो स्वतःलाच संपवायचा प्रयत्न करतो. अंधाराच्या गर्तेत जातो आणि आत्महत्येचे प्रयत्न करतो..
करण तो अशा पायरीवर पोहोचलेला असतो जिथून पुन्हा वर चढणे त्याला अशक्य वाटू लागते..
‘हिटिंग द रॉक बॉटम’ म्हणतो ते हेच.. म्हणजेच आयुष्याच्या सगळ्यात वाईट अगदी जीवघेण्या वळणावर पोहोचणे. इथे पोहोचणे फारच दुःखदायक..
कित्येक वेळा अशी माणसे आला दिवस ढकलत असतात.. कसे बसे जगत राहतात.. का..??
तर ज्यांना ते हवेहवेसे आहेत त्यांना त्रास होऊ नये म्हणून.. कारण आपल्याला काही बरेवाईट झाले तर आपल्यावर अवलंबून असणारी माणसे काय करतील? ह्याच विचाराने निराश माणसे जगतात..
मनाच्या खोलवर फक्त नैराश्य असते.. डिप्रेशन असते.. पण आपल्या काही प्रेमाच्या माणसांसाठी जगावे लागते..
आपल्या आयुष्यात जे वाईट घडत आहे त्याचा दोष तरी कोणाला द्यावा..?? नेहमी तर हवे ते मिळत होते, किंवा आयुष्य बरे चाललेले होते मग अचानक इतकी संकटे आली तर दोषी दुसरे कोणी कसे असेल..??
पण संकटे आली तर त्रास आपल्यालाच होतो.. हे मात्र खरे.. ह्यासाठी काही तरी करायलाच हवे नाही का..?
एकदाच मिळणाऱ्या आयुष्याला मृत्यूच्या दारात का सोडावे..?? त्याला त्या जीवघेण्या वळणावरून पुन्हा चैतन्यपूर्ण, आनंददायी मार्गावर कसे आणावे..??
त्यासाठी आज आम्ही काही टिप्स शेअर करतोय. बघा तुम्हाला कशा वाटतात.
१. परिस्थितीला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका:
कोणतीही सिच्युएशन येऊद्या.. तिच्याशी दोन हात करायची तयारी ठेवा.. दर वेळी पळवाटा शोधणे, कारणे काढून निघून जाणे हे अयोग्य आहे..
आपल्यासमोर असलेले काम जर आपल्याला येत नसेल तर त्याला सोडून पुढे जाणे आपल्या हिताचे नाही.. जे काही अवघड काम आहे ते करायचेच असे मनाशी ठरवा.. त्याला चॅलेंज म्हणून स्वीकारा…
जर येणारी परिस्थिती आपण ताब्यात घ्यायचा, तिच्यावर कंट्रोल करायचा प्रयत्न केला तर आपण त्या परिस्थितीला अजून क्लिष्ट करून ठेवत असतो. स्वतःला त्याचे मनस्ताप सहन करायला लागतो तो वेगळा. त्यापेक्षा जे घडणार आहे ते घडू द्या.. त्याला दाबू नाका किंवा त्यापासून तोंड फिरवू नका..
येत नसेल तर शिकून घ्या. प्रॅक्टिस करा पण काम आपल्यापरीने पूर्ण करता आलेच पाहिजे…
आपल्याला ते काम टाळून पुढे जाणे सोप्पे वाटेल पण फक्त आत्ताच्या घडीचा विचार करण्यापेक्षा पुढील आयुष्याचा विचार करा.. परीक्षा दिली तरच आपल्याला मार्क्स मिळतात.. परीक्षाच नाही दिली तर पुढच्या वर्गात कसे पोचणार..?? पुढची पायरी कशी चढणार..??
परीक्षा द्या.. त्यातून जो अनुभव मिळेल तो आयुष्यभर उपयोगाला येईल.. जेव्हा कठीण प्रसंगातून जात असाल तेव्हा हे अनुभव आपल्याला तारून नेतील ह्याची खात्री ठेवा..
२. आपल्याला सगळेच जमले पाहिजे असा हट्ट नको:
आपण आपली कर्तबगारी दाखवायला सगळ्याच डगरींवर पाय ठेवून उभे राहिलो तर कसे होईल..?? ते शक्यच नाहीये.. सगळीच कामे सगळेच निर्णय आपण घेणे गरजेचे नाही..
एकाच वेळी थाळीमध्ये डोंगरएव्हढे अन्न वाढून घेतले म्हणजे सगळेच खाऊ शकणार आहोत का आपण..?? नाही ना.. कामाचे ही तसेच असते..
आपल्याला जे काम करायचे आहे त्यात सगळ्यांना सामावून घ्या.. ज्याला जो भाग उत्तम जमेल त्यावर विश्वास टाकून त्यास तो करण्यास द्या..
टीम बिल्डिंग ऍक्टिव्हिटी मुळे तुमचे काम लवकर आणि उत्तम होईल.. आणि कमी तणावाचे ठरेल सगळ्यांनाच..
एकमेका सहाय्य केले तर त्यामुळे आयुष्यातला तणाव निवळतो.. आणि आपल्या कठीण प्रसंगी ही माणसेच आपल्या मदतीला धावून येतात.. आपण एकटे पडत नाही..
३. स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा:
ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे ही म्हण माहीतच असेल.. आपण ठराविक वयानंतर आणि अनुभवांच्या मदतीने स्वतःसाठी नक्कीच योग्य निर्णय घेऊ शकतो.. योग्य रीतीने परिस्थिती सांभाळू शकतो..
त्यामुळे वडीलधाऱ्यांशी, अनुभवी मंडळींशी सल्लामसल्लात जरूर करावी मात्र त्यातून आपल्याला कामी येईल असा योग्य निर्णय स्वतःच घ्यावा..
आपले अंतर्मन सहसा आपल्याला फसवत नाही.. त्यामुळे ते काय सांगतंय ह्याचा विचार नक्की करावा..
४. ‘जर तर’ च्या चक्रव्यूहात अडकू नका:
हे ‘जर तर’ खूपच डेंजर असतात.. जर असे घडले तर मी तसे करेन.. ह्या भुलभय्यात जर आपण अडकलो तर खोल खोल फसत जातो..
आपला आनंद, आपले दुःख कशा कशावर अवलंबून ठेवणार..?? हेच करत राहिलो तर एक दिवस भयंकर अडचणीत येणार आणि मग आयुष्याच्या दुःखद वाटेवर पोहोचणार त्यामुळे हे ‘जर तर’ टाळले पाहिजे.. आत्ताच्या क्षणामध्ये जगणे शिकून घ्यायला हवे..
ह्या विषयावर मनाचेtalks वर उत्तम लेख ही आहे.. तो जरूर वाचा.. ह्या जर तर चे सगळे दुष्परिणाम समजून घ्या.. संबंधित लेखाची लिंक या लेखाच्या शेवटी दिलेली आहे.
५. आयुष्यास शिस्त लावा:
शाळेत असताना आपल्याला शिस्तीत वागावे लागते.. शिस्त मोडली तर शिक्षा मिळते. मात्र शिस्त पाळली तर शालेय जीवन यशस्वी होते..
आयुष्याचेही अगदी तसेच आहे.. बेशिस्त आयुष्य वाईट वळणावर पोहोचते.. मात्र शिस्त लावली असेल तर अवघड वेळ सुद्धा सोपी करण्यात आपण यशस्वी होतो..
रोजचे काहीतरी रुटीन अंगवळणी पाडून घ्या. चांगले वागा. लोकांना मदत करा… छंद जोपासा..
बरेचदा असंही होतं कि तुमच्या मदत करण्याच्या किंवा कुठल्याही चांगुलपणाचा समोरचं माणूस फायदा घेत असल्याने चांगुलपणावरचा विश्वास विश्वास उडून जातो.
अशा वेळी मदत करणं हा तुमचा प्लस पॉईंट होता आणि त्या मदतीला न जागणं हा समोरच्या व्यक्तीचा कृतघनपणा होता हे समजून घेऊन झाल्या गोष्टीचा खेद न करणं हेच हिताचं.
हे सगळे आपल्याला आपल्या पडत्या काळात मजबूत राहायला मदत करतात..
६. पाया मजबूत बनवा:
आपल्या आयुष्याचा पाया मजबूत ठेवा.. स्वतःचे चांगले व्यक्तिमत्व घडविण्यास ह्याचा फायदा होतो.. पैशाच्या मागे धावून प्रेमाच्या माणसांना दुखवू नका..
पैसा आज आहे उद्या नाही.. मात्र माणसे आज हरवली तर पुन्हा मिळत नाहीत.. नाते संबंध, ज्ञान आणि ध्येय ह्या सगळ्यांचाच पाया मजबूत बनवा.. सगळ्याच बॅलन्स साधता आला पाहिजे..
नाहीतर आपल्या वाईट दिवसात हे सगळे साथ सोडून गेले तर एकाकीपणा आपल्याला खायला उठेल..
७. आनंद कशात मानायचा हे शिकून घ्या:
आनंद मिळवायचा म्हणून अविवेकीपणे वागू नका.. मोठा आनंद मिळवायला त्याच्या मागे धावत बसलात तर कशातून आनंद मिळतोय हे देखील कळेनासे होईल.. आनंद खरे तर छोट्या छोट्या गोष्टीत असतो.. फक्त तो शोधता आला पाहिजे..
आपल्या भावतालची माणसे, निसर्ग, प्राणी, घडामोडी ह्या गोष्टी खूप आनंददायक असतात. पण ते कळण्यासाठी आपली इंद्रिये जरा सावध ठेवा.. नाहीतर काहीतरी ग्रँड मिळवायच्या नादात ह्या सगळ्याला मुकाल..
८. प्रयत्नांवर जोर द्या:
प्रयत्नांची कास सोडू नका. यश अपयश येत असतात.. मात्र प्रयत्न सोडले तर आपण हार पत्करली असे समजा..
हरलेला माणूस कधीच आनंदी होऊ शकत नाही.. दुनिया त्याला लूजर म्हणूनच ओळखते..
एखादी गोष्ट करायला घेतली तर ती पूर्ण होण्याकडे कल असू द्या.. उत्साहात आज काम केले आणि उद्या कंटाळा आला असे घडत असल्यास आपला त्या कामाबद्दलचा दृष्टिकोन बदला.. कंसिस्टंसी आपल्याला तारून नेते.. उथळपणा आपल्याला बुडावतो हे लक्षात ठेवा..
सोपे उदाहरण द्यायचे म्हणजे,
तुम्ही जर ठरवले की वजन कमी करायचे तर तुम्ही काय करता ह्यावर तुमचे ध्येय साध्य होणार की नाही ते ठरते..
तुम्ही जिम लावता वर्षभराचे पैसे भरून आणि जेम तेम 2 महिने जाता.. मग कसे होणार वजन कमी..??
सातत्य ठेवता आले पाहिजे.. तरच यश तुमचे.. सातत्य शिकले तर अवघड काळातही ते साथ देते..
९. सचोटीने वागा आणि आपली तत्वे सोडू नका:
खरे पणाने वागणे आणि आपली तत्वे न सोडणे हे आपल्याला आयुष्यात खूप आदर मिळवून देतात.. आपल्या अशा वागण्याने लोक आपल्याला ओळखतात, आपल्यावर विश्वास ठेवतात..
खोटे बोलून कोणाचे भले होत नसते.. वेळ मारून नेता येते मात्र तेच खोटे आपल्याकडे विक्राळ रूप घेऊन परत येते.. अशा परिस्थितून जाण्यापेक्षा खरे बोलून परिस्थितीला तोंड देणे जास्त साहसाचे काम आहे…
खोटे बोलणाऱ्या माणसाची क्रेडिबिलिटी शून्य असते हे तर वेगळे सांगायलाच नको.
आपल्या तत्वांबद्दल सुद्धा ठाम राहा. दुसऱ्याच्या चुकीच्या तत्वांपुढे एकदा झुकलात तर आयुष्यभर पस्तावाल..
मित्रांनो हे आयुष्याचे धडे गिरवणे खूप गरजेचे आहे. ह्या फास्ट युगात हे संस्कार, प्रेम, दया, माया कुठे तरी लुप्त होत चालले आहेत..
त्यामुळे जर आयुष्य निरस आणि एकाकी होत चालले असेल.. आपण हे धडे लक्षात ठेवले तर नक्कीच पुन्हा जग सुंदर होईल.. आयुष्य सुंदर होईल..!!
तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा.
आणि हो! हा लेख दिलेल्या योग्य पर्यायांचा वापर करून आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. हे सांगण्याचे कारण असे कि बरेच वाचक आमच्यावर चिडतात.
कि एवढी चांगली माहिती आहे, आम्ही का इतरांना द्यायची नाही? तर नक्की द्या!! पण कॉपी-पेस्ट करून नाही, तर दिलेल्या पर्यायातून शेअर करूनच…
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
आपले लेख खरच खुप प्रेरणा दायी असतात. तुमच्या लेखात असे विषय तुम्ही मांडतात की जे खरच मनातल मनोगत पण आपण त्याला परखड पणे नाही मांडू शकत आणि त्यावर तुम्ही परिपूर्ण एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही भुमिका पार पाडत आहात खरच आपले मनापासून धन्यवाद…..
मनस्वी धन्यवाद💐
Why don’t you allow us to share such wonderful articles/post on other whats app group.
It will benefit more people.
Secondly toooo much of advt in every post.
Please look into the matter.
Thanks for such nice write ups.
Thank you very much… It is allowed to share… There are many options given to share and it is clearly mentioned in articles. You can share it through this. It is strictly prohibited by law to only copy and pest. Many times we have found this copy-pest activity and have to take action.
In such copy and pest activities, people should respect hard work done by the team. A few of them are students.
And your next question is about the advertisement… So without advertisements how can we get revenue to run this organization? Our team is taking so many efforts to study for this.
Many people have objections to advertisements but are you asking TV channels, that why they are showing advertisements, whereas you people pay for cable or DTH network, many channels you select as paid channels…
In the coming days, we are planning for a paid subscription, which will not include advertisements. Please let us know weather you are ready to opt for paid subscription.
Thanks & Regards…
खुप छान लेख यातून भरपूर शिकून स्वतःला अपग्रेडे करण्यासाठी फार उपयुक्त व मोलाचे आहेत.
त्याबद्दल मनाचे talks टीम चे मनापासून धन्यवाद व या उपक्रमाला खुप साऱ्या शुभेच्छा.
मनःपूर्वक धन्यवाद
Tumcha lekh vachun jagnyachi navi aasha milali mala..😊 kharch khup relax vatle mala majha stress kami zala
Thank u very much 💐 asech margdarshan Kart raha amchya sarkhya vachkana hyachi khup khup garj ahe karn he lekh vitamin sarkhe ahet majhya sathi tri ❤ 🙏🙏
#मनाचेTalks च्या लेखांचे अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी 👇व्हाट्सएप तसेच टेलिग्राम चॅनलला जॉईन होता येईल.
तसेच सबस्क्रिप्शन थांबवायचे असल्यास, जॉईन केलेला ग्रुप अथवा चॅनल ‘लिव्ह’ करून द्यावा.
त्याचबरोबर मनाचेTalks च्या सर्व पोस्ट न चुकता फेसबुकच्या न्यूज फीड मध्ये दिसण्यासाठी पोस्टच्या वरच्या उजव्या कोपऱ्यावर असलेले तीन डॉट्स वर दाबून *’Add मनाचेTalks to Favourites’* यावर क्लिक करा…
व्हाट्स ऍप इन्व्हाईट लिंक.👇
https://chat.whatsapp.com/LTv393KE2TSL0Yu4usFmpZ
टेलिग्राम चॅनल👇
https://t.me/manachetalksdotcom
Tumcha ajcha ha lekha vachlyamule mala manasik adhar milala dhanyawad to manache talk