आज इथे आपण अशीच काही पुस्तकं माहित करून घेऊ. हे वाचून नक्कीच आल्याला रोजच्या जीवनातले काही प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल. (Motivational Books In Marathi)
Think and Grow Rich (विचार करा आणि श्रीमंत व्हा)
नाव- थिंक अँड ग्रो रिच (मराठी) / Think & Grow Rich (English)
लेखक – नेपोलियन हिल
तुम्ही तुमच्या विचारातून तुमचे आयुष्य कसे सफल सम्पूर्ण घडवू शकाल हे या पुस्तकातून समजावून सांगितले आहे. लेखकाने २० वर्षांच्या कालखंडात ५०० हुन अधिक व्यक्तींचे अध्ययन करून श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सर्वसाधारण सवयी म्हणजे एकूणच त्यांची विचार करण्याची पद्धत यात सुरेख पद्धतीने उलगडून दाखवली आहे.
The 7 Habits of Highly Effective People (अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी)
नाव : अति परिणामकारक लोकांच्या ७ सवयी (मराठी) \ The 7 Habits of Highly Effective People
लेखक: स्टीफ़न आर. कवी
आपले आयुष्य सुखी आणि समृद्ध करण्यासाठी आधी आपले विचार बदलले पाहिजेत.
आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक समस्यांना सोडवण्यासाठी आपण आपल्या विचारांमध्ये बदल आणले तर नक्कीच त्याचा परिणाम चांगला होऊ शकतो हे या पुस्तकातून जगातील अति परिणामकारक व्यक्तींच्या अनुभवातुन उलगडवून दिलेले आहे.
How to Win Friends and Influence People (मित्र जोड आणि लोकांवर प्रभाव पाडा)
नाव : मित्र जोड आणि लोकांवर प्रभाव पाडा / How to Win Friends and Influence People
लेखक: डेल कार्नेगी
How to Win Friends and Influence People हे पुस्तक १९३६ मध्ये प्रकाशित झाले आणि लवकरच बेस्ट सेलर पुस्तक ठरले. हे पुस्तक तुम्हाला नवे विचार नव्या महत्वकांक्षा आणि प्रेरणा देण्यासाठी खूपच उपयोगी आहे.
मित्र बनवणं, लोकांवर प्रभाव पडणं हि हातोटी खूपच कमी लोकांना अवगत असते. आणि ज्यांना ती नसते ते मनोमन सहजासहजी मित्र बनवू शकणाऱ्या लोकांनाच हेवा करतात.
तर असा हेवा करण्यापेक्षा हे पुस्तक वाचून नक्कीच ती हातोटी आपल्याला शिकता येईल.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.