विचारांचा गुंता सोडवता सुटत नाही, हे तुम्ही खूपदा अनुभवलं असेल. तो गुंता सोडवता आला आणि सरावाने गुंता न होणं तुम्हाला जमू लागलं तर तुमच्या पर्सनल, प्रोफेशनल आयुष्यात तुमच्यातील सर्वोत्तम व्हर्जन विकसित करण्याचा मार्ग तुम्हाला दिसू लागतो.
आणि म्हणूनच, विचारांचा अनावश्यक गुंता सोडवण्यासाठी सजग कसं राहायचं? ते वाचा या लेखात.
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे…?
निद्रादेवतेला तिलांजली देऊन Netflix, Amazon Prime, Hotstar, News… यांची शास्त्रशुद्ध रित्या पारायणे चालू आहेत की नाही….? काय म्हणता आता त्याचाही कंटाळा आला….. चालायचंच…..
बरं आता विषय निघालाच आहे म्हणून विचारते की तुमच्या बाबतीत कधी असं घडलं आहे का हो, की एखादे पुस्तक वाचताना किंवा एखादा व्हिडिओ बघता बघता एक विचार मनात येतो आणि मग त्या विचारां बरोबरच तुम्ही वाहवत जाता…
आणि जेव्हा भानावर येता… तेव्हा कळतं की, की अरे व्हिडीओ तर संपला…. मग पुन्हा सुरुवातीपासून सुरू…
काहींच्या बाबतीत असं होतं की फोनवर बोलता बोलता किंवा बातम्या बघता बघता ते नाश्ता किंवा जेवण करतात आणि जर त्यांना थोड्यावेळाने विचारलं की आज काय जेवलात ..??? त्यांच्याकडे उत्तर नसते…
गृहिणींच्या बाबतीत स्वयंपाक करताना असे काही विचारचक्र मनात चालू असतात की भानावर येताच नक्की आपण भाजीत मीठ टाकलं आहे की नाही तेच, त्यांना आठवत नाही…..
घरातल्या घरात एखाद्या खोलीतून दुसर्या खोलीत एखाद्या कामासाठी आपण जात असतो आणि त्या खोलीत आल्यावर आपण नक्की कशासाठी आलो होतो हे स्वतःलाच विचारतो….
ऑफिसमध्ये नेमक्या वेळेवर मागितलेली महत्त्वाची फाइल सापडत नाही…. कुठे ठेवलेली असते तेच आठवत नाही….
बॉसने एखादी अतिशय महत्त्वाची कामगिरी आपल्यावर सोपवलेली असते… जिथे चुकीला माफी नसते….
आपण सुद्धा अगदी चुकायचंच नाही अशी खूणगाठ मनाशी बांधून सुसज्ज होऊन रणांगणात उतरतो आणि कुठल्यातरी बेसावध क्षणी आपल्या हातून चूक घडते आणि मग सातत्याने अशा गोष्टींची पुनरावृत्ती व्हायला लागल्यावर माथी शिक्का बसतो तो ‘धांदरट’ असल्याचा किंवा Absent Mminded असल्याचा…
ABSENT MINDED
कसा वाटतो हा शब्द ऐकायला…??? खूप वाईट वाटते ना हा शब्द ऐकल्यावर…. चर्रर्रर्र……होतं ना काळजात हा शब्द ‘आपल्यासाठी वापरल्याचा’ ऐकला की…
दैनंदिन जीवनात ह्या गोष्टी आपल्याला खूप वरवरच्या वाटतात…. कधीकधी तर आपणच आपला धांदरटपणा इतरांना सांगतो परंतु मनात खोल कुठेतरी असतेच की हे असं का होतं आपल्या बाबतीत…???
परंतु जेव्हा आपण या गोष्टी चारचौघात सांगतो तेव्हा कळतं की आपल्यासारखे आणखीही आहेत म्हणजे हे नॉर्मल असेल आणि पुन्हा येरे माझ्या मागल्या सुरू होतं…
आज आता एकच करा…. हा लेख वाचताना मध्येच थोडं थांबून शांतपणे डोळे बंद करून स्वतःच्या मनाला एकदा विचारा की का होतं हे असं माझ्याबाबतीत?
मला १००% खात्री आहे की तुम्हा सर्वांचं उत्तर एकच असेल ते म्हणजे…. ‘विचार-अनियंत्रित विचार’
होय मित्रांनो, आपलाच आपल्या विचारांवर ताबा नसल्याने या गोष्टी नकळतपणे आपल्या हातून घडतात.
आपल्या धांदरटपणावर पाठीमागून हसणारे लोक, मनातल्या मनात आपल्यावर Absent Minded हा शिक्का मारणारे लोक….
अनवधानाने आपल्याच हातून सतत होणाऱ्या चुका आणि त्यातून सतत मनाला येणारी अपराधीपणाची बोचणी… आणि या सर्वांतून निर्माण होणारा अनावश्यक नकोसा वाटणारा तणाव…. या सर्व गोष्टींना एकच कारण आहे ते म्हणजे,
नको त्या वेळी येणारे नको ते विचार….
विषय कुठलाही असो मित्रांनो, आपल्याला ही जी विचारांवर विचार करण्याची सवय लागली आहे ना त्या चक्रव्यूहात आपण अडकत जातो आणि इच्छा नसताना आपल्या हातून अशा चुका किंवा काही धांदरटपणा होत राहतो.
बरं, आता तुम्ही म्हणाल ते सगळं ठीक आहे हो. पण आता यावर उपाय काय???
सांगते ….उपाय एकच तो म्हणजे
‘Mindfullness’ म्हणजेच ‘सजगता’
आता हा शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात आशा पल्लवित झाल्या असतील आणि संभ्रमही निर्माण झाला असेल की काय आहे हे माइन्ड फुलनेस…?
कसे करायचे..? किती वेळात आमचा हा प्रॉब्लेम सॉल्व होईल..??
कित्येक जणांना तर माहीतही असेल. हा शब्द कदाचित त्यांच्या मनात येईल…. हो हे तर माहिती आहे कि आम्हाला… काही नाही होत हो याने…
एक ना अनेक विचारांची वावटळं पुन्हा तुमच्या मनात उठली असतील परंतु प्रथम ही सर्व वावटळं थांबवा आणि पुन्हा मन एकाग्र करून वाचा…
जर तुम्हाला आठवत नसेल तर पुन्हा एकदा आठवण करून देते, किमी मी माझ्या मागच्या लेखात सांगितले होते की
दृष्टीचा इलाज होऊ शकतो परंतु दृष्टिकोनाचा इलाज नाही होऊ शकत…
म्हणूनच सर्व प्रथम पूर्वग्रह बाजूला सारून माईंडफुलनेस या शब्दाकडे पाहूया आणि प्रथम जाणून घेऊया की हे माईंड फुलनेस म्हणजे नेमके आहे तरी काय…????
‘माईंडफुलनेस’ म्हणजे ‘सजगता’ म्हणजेच वर्तमानातल्या क्षणाकडे लक्ष देण्याचा सराव आणि ते सुद्धा अगदी हेतुपूर्वक आणि जजमेंटल न होता…
काय असतं फ्रेंड्स, आपण जेव्हा एखादे काम करत असतो तेव्हा मागे म्हटल्याप्रमाणे विचारांची चक्र आपल्या मनात हळूहळू फिरायला लागतात.. बरोबर..?
तर या माईंड फुलनेस मध्ये आपल्याला या विचारांवर फक्त लक्ष ठेवायचे असते हो पण एक आहे बरं का… अजिबात जजमेंटल न होता लक्ष ठेवायचे….
म्हणजे नेमकं काय करायचं…????
सांगते.. येणारे विचार…. ते चांगले आहेत की वाईट… सकारात्मक आहेत की नकारात्मक आहेत… याचा विचार न करता त्या विचारांवर किंवा भावनांवर लक्ष ठेवायचे…
शास्त्रशुद्ध अभ्यासातून देखील आता हे सिद्ध झाले आहे की माईंडफुलनेस च्या मदतीने आपण आनंदी व यशस्वी जीवन जगू शकतो …
या विषयावर आधारित अनेक गैरसमज देखील आहेत…. उदाहरणार्थ, माईंडफुलनेस हा एक धर्म आहे।।।
परंतु खरे पाहता हा एक लोकप्रिय सराव आहे जो कित्तीतरी धर्मात वापरला जातो. ही एक Mental Training Technique आहे.
बरेचदा असेही म्हटले जाते की आपण अगदी जमिनीवर आसनस्थ होऊनच हे केले पाहिजे परंतु हा सुद्धा एक गैरसमज आहे…
तुम्ही दिवसातून कुठल्याही वेळा आणि कितीही वेळा हे करू शकता… फक्त तुम्ही, ज्या ठिकाणी आहात ते ठिकाण… ती जागा तुम्हाला तुमच्या सोयीची वाटली पाहिजे…
तुम्ही याचा सराव एका मिनिटापासून ते पूर्ण दिवसापर्यंत कुठेही करू शकता.
हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे..
तुम्ही या प्रक्रियेत कुठल्याच प्रकारची निंदा किंवा स्तुती करत नाहीत आणि कुठलीही प्रतिक्रियाही देत नाहीत…
हे सगळं मी तुम्हाला एका उदाहरणाने समजावते म्हणजे तुमच्या मनात थोडी स्पष्टता येईल…
समजा एखाद्या दिवशी तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये एखाद्या सहकाऱ्याचा खूप वाईट अनुभव आला.
तुम्ही घरी जाताना त्याच गोष्टींचा विचार करत आहात. घरी जाईपर्यंत तुम्ही तुमच्या प्रत्येक विचारांना, React झाल्यामुळे किंवा प्रतिक्रिया दिल्यामुळे आता तुमचा घरी येईपर्यंत तिळपापड झालेला असतो…
घरी आल्यानंतर वड्याचे तेल वांग्यावर तर निघतंच आणि घराचं संपूर्ण वातावरण दूषित होऊन जातं…. त्यानंतर अजूनही तुमचे विचार शांत झालेले नसतात.
त्यामुळे तुमचं एक मन तुम्हाला सांगत असतं लगेच त्या, सहकाऱ्याला तुम्ही फोन करून किंवा मेसेज करून तुमच्या मनातला राग बोलून दाखवावा किंवा अपमानाचा सूड घ्यावा….
आता याच घटनेकडे आपण माईंडफुलनेस दृष्टीने पाहूया…
जेव्हा तुम्ही ऑफिसमधून घरी येत असता, तेव्हा विचार तुमच्या मनात येतच असतात परंतु तुम्ही इकडे फक्त इतकेच करता की तुम्ही त्या विचारांवर कुठलीच प्रतिक्रिया देत नाही आहात… फक्त तुम्ही तुमच्या विचारांना किंवा भावनांना एका त्रयस्थ नजरेने बघण्याचा प्रयत्न करता….
आता आपल्या मनात जे काही आलंय तो फक्त एक विचार आहे. आणि तो जसा आला तसा तो जाणारही आहे याची खूणगाठ तुम्ही तुमच्या मनाशी बांधलेली असते. . .
त्यामुळे तुमच्या मनाचा तोल न ढळता तुम्ही घरी येता… घरी देखील वड्याचे तेल वांग्यावर निघत नाही… आणि तुम्ही या संपूर्ण घटनेकडे शांतपणे पाहिल्यामुळे तुम्हाला एखादा प्रभावी तोडगाही मिळतो किंवा एखादा चांगला निर्णयही घेता येऊ शकतो…
कारण, मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा शांत व खंबीर मनात घेतले जाणारे निर्णय हे नेहमी यशस्वी ठरतात परंतु भावनेच्या भरात घेतलेले निर्णय तुम्हाला फक्त अपयशाच्या खाईकडेच लोटतात….
प्रत्येक वेळेला आकाश निरभ्रच असते असे नाही… कधीकधी काळे ढग येतात… चोहीबाजूंनी अंधारूनही येते… परंतु प्रत्येक वेळेलाच ते बरसतातच असं नाही…. कधीकधी ते तसेच पुढे निघून जातात….
मित्रांनो.. अगदी त्याचप्रकारे माईंड फुलनेस आपल्या नकारात्मक विचारांचे साचलेले मळभ अलगदपणे दूर सारते व आपले मनःपटल पुन्हा निरभ्र करते….
एकदा शांतपणे विचार करून बघा मित्रांनो…. प्रत्येक घटनेवर किंवा नकारात्मक विचारांवर त्वरित प्रतिक्रिया देणे खरंच आवश्यक असते का…?
माइंडफुलनेस तुम्हाला तुमच्या वर्तमानाच्या क्षणाला अनुसरून काम करण्याची प्रेरणा देते….
वर्तमानाचा क्षण भरभरून आनंदाने जगायला शिकवते… त्या क्षणात ना भविष्याची चिंता असते ना भूतकाळाच्या आठवणी असतात….
असतो तो फक्त तुम्ही आणि तुमचा वर्तमानकाळ बस्स……..
आज फक्त इतकंच करा… की हा लेख वाचून झाल्यावर फक्त पाच मिनिटांसाठी डोळे बंद करून शांत बसा आणि बघा की मनामध्ये अक्षरशः निरर्थक विचारांची ट्रॅफिक होते की नाही…
अशा परिस्थितीत ‘माईंड फुलनेस’ अप्लाय करणे वाटते तितकी साधी गोष्ट नाही परंतु ती अशक्यही नाही… सततच्या सरावाने हे अगदी सहज शक्य आहे…
परंतु हा विषय खूप खोल आहे त्यामुळे आपण या विषयाची अधिक माहिती टप्प्याटप्प्याने घेऊया….
उदाहरणार्थ, माईंडफुलनेस मोठ्यांसाठी आणि लहानमुलांसाठी कसे फायदेशीर आहे…????
ते कशा प्रकारे केले जाऊ शकते …???
तणावजन्य परिस्थितीत त्याचा कसा फायदा होऊ शकतो…. ??
या सर्व गोष्टी हळूहळू आपण पुढच्या लेखांमध्ये पाहूया…..
आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा कारण तुमचा प्रेमळ प्रतिसाद हीच माझी ऊर्जा…
धन्यवाद
लेखन: प्राची पाटील
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice
खुप छान आहे लेख ह्या लेखात सांगितल्या प्रमाणे मी खूप गोधळुन गेलो आहे
Mast
खुप छान माहिती दिली आहे
खुप छान माहिती
खुप छान आणि विचारांचे नियंत्रण कसे करावे?? याबद्दल मार्गदर्शन भेटले…
Khup chan lekh,Budhil mahiti milali tar khup madat Hoil samjun ghyayla ,aani apply karayla,asech positive affirmations pathvlet tar khup chan thank you
One of the best page in marati…… Thanks for all your beautiful articles… Plz make more such article
Very good usefull topic thank you..
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
खूपच छान …..!
पुढचा लेख कधी…..!
Pls send your mobile no for further information
My no 8793438184
Thanks