संघर्षाचा कठीण काळ संपला की चांगले दिवस सुद्धा येतातच नं.. कठीण काळात एवढं लक्षात ठेवा कि,
The greater your storm, the brighter your rainbow…
जी माणसं त्यांच्या कठीण काळातही घट्ट पाय रोवून उभी राहतात, यश त्यांच्याच पदरात आपलं माप घालतं. मग आपला कठीण काळ आला की नेमकं कसं वागायचं ते वाचा या लेखात.
1. स्वतःच्या क्षमता ओळखायला शिका.
जो माणूस स्वतःला पूर्णतः ओळखतो, अपयश अशा लोकांना हरवू शकत नाही.
अशी माणसं प्रयत्न सोडत नाहीत तर प्रयत्नांची दिशा बदलतात. संयम ठेवतात. आणि स्वतःशी प्रामाणिक राहतात.
एक दिवस असा येतो की, संघर्ष संपून जातात आणि यश आपल्या नजरेच्या टप्प्यात असतं.
2. प्रयत्न सोडू नका.
आपल्या आजू बाजूला जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, अपयशी लोक नशिबामुळे नाही तर अजून एक प्रयत्न कमी केल्या मुळे हरतात.
कित्तीही काही होउदे, आपण प्रयत्न थांबवले नाहीत तर यश फक्त आपलं आहे.
3. टीकाकारांना आयुष्यात स्थान देऊ नका.
आपल्या कडे जशी म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, तसं टीका करणाऱ्या लोकांचे शब्द मनावर घ्यायचे नाहीत..
पण त्यांच्या टीका आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी एक महत्वपूर्ण पायरी बनू शकतात.
स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी ही अशी मंडळी आपल्याला भेटणं हे खरं तर आपलं भाग्य.. !!! आ
पण अशा लोकांना कोणत्या चष्म्यातून पाहतो हे जास्त महत्वाचं.
4. स्वतःला कमी लेखणं बंद करा.
परमेश्वराने प्रत्येक माणसाला काही विशिष्ट कला गुण देऊन पाठवलं आहे. आपण तरीही स्वतःला कमी का समजतो??
स्वतः स्वतःशी संवाद करण टाळतो आपण. याऐवजी आपण मनावर घेतलं तर आपण स्वतः स्वतःसाठी खास बनू शकतो..
आणि थोडा वेळ स्वतःला दिला तर आपल्या क्षमता आपल्यालाच आश्चर्यचकीत करतील.
5. देवावर श्रद्धा ठेवा.
भाव तिथें देव असं काही उगाच म्हणत नाहीत. अपयश आणि नकारात्मक विचार यापासून नितांत सुटकारा केवळ परमेश्वराचे चिंतन करूनच मिळू शकतो.
कर्ता भाव आपल्या कडे न ठेवता देवाचा ध्यास घेतला तर यश तर मिळतंच, पण त्यांसोबतच मिळणारं आत्मिक समाधान हे केवळ अवर्णनीय असतं.
तर मित्रानो, आयुष्य हा संघर्ष आहेच पण तो तसा वाटून न घेता त्याचं नंदनवन करणं ज्याला जमलं त्याला आयुष्य खूप सुरेख कळलं असं मी म्हणेन. !!!!!!!
लेखन: वरदा आफळे
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Mast 👍