कोणतीही महत्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण नेहमीच चांगला आराखडा अर्थात ‘प्लान’ बनवतो.
मग आयुष्याच्या ध्येयप्राप्तीसाठी आपण प्लान करतो का? चला, जाणून घेवूयात इच्छित ध्येय गाठण्यासाठी कसा बनवायचा मास्टर प्लान.
उद्यमेन हि सिध्यंती कार्याणी न मनोरथै: |
न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविश्यंती मुखे मृग:||
या संस्कृत सुभाषितचा अर्थ असा आहे की, कोणतेही काम, ध्येय हे प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही.
अहो, जंगलाच्या राजाला, सिंहाला सुद्धा हरणाची शिकार करण्यासाठी पळावे लागते. नुसत्या बसून राहिलेल्या सिंहाला आयती शिकार कशी मिळेल? बरोबर की नाही….
कोणतेही काम करायचे तर कष्ट तर हवेतच. पण पाहिल्यांदा आयुष्यात काहीतरी चांगल ध्येय ठरवलं पाहिजे.
अनेकजण नुसतं म्हणतात मला मोठा बिजनेसमन व्हायचय, तर कोणाला चांगल्या पगारची नोकरी.
कोणाला बंगला, फ्लॅट हवा असतो तर कोणाला आलीशान कार.
पण नुसत ठरवून चालेल का हो? ते ध्येय गाठण्यासाठी पहिलं प्लान करायला हवा ना.
म्हणजे पहा की आपल्याला गुलाबजाम करायचाय.
आपण बाजारात जातो, खवा- मैदा-दूध आणतो, मैदा-खवा एकत्र दूध घालून मळतो.
तूप तापवून त्यात मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून तळतो. साखरेचा पाक करतो आणि त्यात ते गुलबजामचे गोळे टाकतो आणि मग मुरल्यावर छान गुलाबजाम तयार होतो.
गुलाबजामची ही एका प्रक्रिया आहे तसंच आयुष्यात ध्येय गाठण्यासाठीही प्रक्रिया आहे. त्यासाठी आराखडा तयार असावा लागतो तरंच त्याची योग्य दिशा मिळते.
अनेकदा ध्येय साध्य करण्यासाठी तसा प्लान नसल्याने लोक मधूनच आपली हार मानून ते सोडून देतात.
आपण आज या लेखात ध्येय गाठण्यासाठी मास्टर प्लान कसा तयार करायचा, त्याच्या काही पायर्या आणि छान टिप्स काय आहेत ते पाहुयात. फक्त लेख शेवटपर्यंत नीट वाचा…
काय आहे ध्येय गाठण्याचा मास्टर प्लान ?
यामध्ये अंतर्भूत आहे तुमच्या ध्येयाच्या संकल्पना. म्हणजे त्यामधील ‘बकेट लिस्ट’. तुमच्या मनामध्ये असणार्या ध्येयाच्या लिस्टमध्ये असणार्या गोष्टींचा समावेश यात होतो.
त्यामध्ये तुमच्या ध्येय पूर्ततेसाठी लागणारी कौशल्ये, ती आत्मसात करण्यासाठीच्या काही महत्वाच्या पायर्या यांचा समावेश होतो.
ध्येय गाठण्याची पहिली पायरी म्हणजे आराखडा. असा मास्टर प्लान तयार असेल तर तुम्हाला ध्येय गाठणे सोपे होईल.
अश्या प्लानची गरज काय?
कोणत्याही ध्येयासाठी प्लानची गरज असतेच. कारण त्याची दिशा ठरेल तर तुम्ही भरकटणार नाही.
अनेकदा आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेणारे कटू प्रसंग येतात, अडचणी येतता. अश्या वेळी निराशा येते.
त्यामुळे आपण काहीवेळा ध्येय सोडून देण्यासाठी विचार करू लागतो. हे होऊ नये यासाठी प्लानची गरज आहे. यामुळे आपल्याला सकारात्मकतेने पुढची वाटचाल करण्यासाठी ऊर्जा मिळते आणि योग्य दिशाही.
मास्टर प्लॅनमध्ये काय हवे?
मास्टर प्लॅनमध्ये प्रमुख ध्येय, त्यानंतर दुय्यम उद्दीष्ट आणि त्यासाठी करावयाच्या काही आवश्यक गोष्टींचा समावेश होतो.
यासाठी कृतीशील राहण्यासाठी गरज आहे. असे टप्पे समाविष्ट करा आणि त्यासाठी करायच्या कृती यांचा समावेश करा.
जसे की तुमचे ध्येय आहे, वर्षाकाठी काही रक्कम साठवणे….
त्यासाठी काय करायला हवे? याचा ऍक्शन प्लान बनवा. जसे की तुमच्या पगारातील काही रक्कम बाजूला काढून ठेवणे, त्यानंतर त्यासाठी बँकेत वेगळे बचत खाते काढणे, त्यानंतर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो वाचवणे.
अश्या प्रकारचा आराखडा करून तुम्ही नक्कीच वर्षाच्या शेवटी तुम्हाला हवी असणारी रक्कम बचत करू शकता.
१) परिणामांपेक्षा कृतीशीलतेकडे लक्ष केन्द्रित करा
जर आपण नेहमी परिणामांची चर्चा करत बसू किंवा भीती बाळगू तर आपल्या हातून काहीच चांगले होणार नाही.
आपण ध्येय प्राप्तीसाठी जे प्लान बनवले त्यातील पायऱ्यांपरमाणे कृती केली पाहिजे. जेंव्हा आपण आपल्या ध्येयावर लक्ष केन्द्रित करतो, त्यावर काम करतो तेंव्हा आपली ऊर्जा त्यावर खर्च करतो.
त्यामुळे काहीतरी साध्य नक्कीच होते आणि आपल्याला आपण थोडेसे आपल्या ध्येयाजवळ गेल्याचा आनंद होतो.
यासाठी आपण अगदी साधे उदाहरण पाहू. समजा तुम्हाला तुम्ही ज्यात पारंगत आहात त्यासंदर्भातील नोकरी मिळवायची असेल तर प्रथम तुम्हाला नोकरीसाठी जाहिराती शोधल्या पाहिजेत.
त्यानंतर तुमचं रेज्युम तयार केला पाहिजे. त्यानंतर जर तशी कंपनी मिळाली तर त्यासाठी अर्ज केला पाहिजे. त्यानंतर जर तुमची निवड झाली तर मुलाखत घेतली जाईल. त्यातही तुम्ही निवडले गेलात तर तुमचे अर्धे ध्येय तुम्ही गाठता. त्यानंतर तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीने तुमची चांगली छाप पडलीत तर तुमचे प्रमोशन नक्की.
२) एकाच वेळी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रात करा
अनेकदा आपण आपले ध्येय गाठण्याच्या प्रक्रियेत खूप गोंधळ करतो. एकाचवेळी अनेक गोष्टी मिळवायच्या मागे लागतो आणि आपले मुख्य ध्येय विसरून जातो.
त्यामुळे आपले ध्येय मागे पडते. इतर गोष्टी करण्यातच आपला वेळ फुकट जातो. आपली ऊर्जा अश्या अवास्तव कामात खर्च होते.
त्यामुळे एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रीत करा, त्यासाठी प्रयत्न करा आणि ते आधी पूर्ण करा. अनेक गोष्टी एकाचवेळी केल्याने आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि काही काळानंतर निराशा येते.
त्यामुळे कोणतंच काम नीट होत नाही. एकाचवेळी अनेक गोष्टी करण्याकडे लक्ष न देता आपली शक्ति एकाच कामावर खर्च करा आणि ते पूर्ण केल्यावर दुसर्या ध्येयसाठी तयार रहा.
३) कार्यपद्धती बदला आणि नवीन आव्हाने स्वीकारा
आपले ध्येय गाठण्यासाठी आपल्याला बर्याचदा अडचणी येतात. अशावेळी आपण त्यातून मार्ग काढत कामाची पद्धत थोडी बदलून पहा.
तुमच्या कामाचे तास, पद्धत, लोकांना भेटण्याच्या वेळा यात बदल करा. तुमच्या गुंतवणुकीच्या पद्धतीतीही तुम्ही बदलू शकता. नवीन आव्हाने स्वीकारा आणि त्याला सामोरे जा.
४) नवीन दिशा शोधा
तुमच्या ध्येयाचा विचार करताना त्यासाठी नवीन प्रवाह नक्की आजमावा. म्हणजे जर तुम्ही केवळ एकाच पद्धतीने काम करत असाल आणि त्यात थोडा जास्त वेळ जात असेल तर नवीन दिशांचा विचार करा.
त्यासाठी कोणत्या मार्गाने आपली ध्येयनिश्चिती होईल याचा विचार करा.
जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात हवा तो ग्राहक गाठता येत नसेल किंवा नवीन ग्राहक, बाजारपेठ मिळवायची असेल तर त्यासाठी तुमच्या उत्पादनात थोडा बादल करा किंवा नवीन ग्राहक मिळवण्यासाठी नवीन प्लाटफोर्म शोधा.
जिथे तुमचे उत्पादन विकले जाईल आणि नवा ग्राहक मिळेल.
५) छोट्यापासून सुरू करा आणि मोठा पल्ला गाठा
कोणत्याही मोठ्या गोष्टीची, व्यवसायाची सुरुवात ही लहान गोष्टीपासून किंवा व्यवसायापसून होते.
कोणीही लगेचा मोठा होत नाही. तर जे तुम्हाला मिळवायचे आहे, बनायचे आहे त्यासाठी आधी लहान गोष्टीपासून, व्यवसायापासून, नोकरीपासून प्रारंभ करा.
तो व्यवसाय यशस्वी करा, त्यात प्रगति करा आणि मग तो वाढवण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या भावाला स्वतःचे मोठे कपड्याचे आऊटलेट सुरू करायचे होते. हे त्याचे ध्येय होते.
त्यासाठी त्याने आधी कापड दुकानात नोकरी केली, कपड्याचे प्रकार, त्याची बाजारपेठ, त्याचा ग्राहक, त्यांची आवड, नवीन फॅशन अश्या अनेक बाबींचा अभ्यास केला आणि त्यानंतर त्याने स्वतःचे दुकान सुरू केले.
आज खूप आधुनिक पद्धतीने त्याच्या ग्राहकांना आकर्षित करण्याचे मार्ग त्याच्याकडे तयार असतात आणि त्याचा व्यवसाय तो यशस्वीपणे पुढे नेतो आहे.
अश्या प्रकारे तुम्हीही तुमच्या ध्येयाप्रत मोठा पल्ला गाठू शकता. त्यासाठी संयम आणि सातत्य महत्वाचे आहे.
६) स्पर्धक शोधा, त्यांच्याकडून शिका
तुमच्या ध्येयला गाठण्यासाठी नेहमी सशक्त स्पर्धक शोधा. पण यामध्ये ईर्षा आणि मत्सर भावना आणू नका.
नेहमी हेल्दि स्पर्धा असेल तर तुम्ही स्वतःच्या प्रगतिची आणखी करू शकाल. आपल्या स्पर्धकाडून काही नवीन गोष्टी शिका, त्यांची कार्यपद्धती, त्यांचे विचार, त्यांच्या आव्हानां मधून सकारात्मकता शोधा आणि त्याप्रमाणे वाटचाल करा.
अश्या रीतीने जर तुम्ही तुमच्या ध्येयासाठी फोकस केले तर तुमची ध्येयप्राप्ती नक्की होणारच.
७) विश्वासू साथीदार निवडा
एखाद्या व्यवसायात जर तुम्हाला एकट्याने उतरायचे नसेल तर त्यासाठी तुम्हाला ‘पार्टनर’ ची गरज भासतेच.
पण त्यासाठी तो साथीदारही विश्वासू आणि कामाशी एकनिष्ठ हवा. त्यासाठी तुमच्या व्यवसायातील, नोकरीतील तुमचे सहकारी हे त्यांच्या कामाशी एकनिष्ठ पाहिजेत.
कोणत्याही वाईट प्रसंगात त्यांची गरज भासली तर त्यांनी विश्वासाने आणि धैर्याने तुम्हाला अडचणीत न आणता ती जबाबदारी पार पडली पाहिजे.
आव्हाने स्वीकारून ती पूर्ण केली पाहिजेत. त्याच्याकडे सकारात्मक दृष्टी आणि विचार हवेत. त्याच्या जोरावरच तुम्ही ध्येयप्रप्तीतील थोडा पल्ला गाठू शकता.
८) दररोज ध्येयसाठी काम करा आणि अपयशाने खचू नका
आपल्याला नेमके काय मिळवायचेव आहे याचा विचार मनाशी ठाम करा. तुम्ही ज्या गोष्टीसाठी विचार करत आहात त्यासाठी रोज काहीना काही काम करा.
तुमच्या धोरणांवर लक्ष केन्द्रित करा, त्यामध्ये येणार्या अडथळ्यांनी खचून न जाता जोमाने काम करा.
समजा तुम्हाला जर तुमचा ब्लॉग सुरू करायचा आहे तर यासाठी दररोज तुम्ही थोडे वाचन करा, रोजच्या घडणाऱ्या घटनांचा आढावा घ्या, त्यावर विचार करा आणि मग लिहा.
जर एखाद्याला महिनाच्या शेवटी पगारपेक्षा अधिक पैसे मिळवायचे असतील तर त्याने रोज ओवरटाइम केला पाहिजे किंवा नोकरीचे तास पूर्ण केल्यानंतर एखादा व्यवसाय केला पाहिजेत. एकूण काय तर आपल्याला जे हवे त्यासाठी काय केले पाहिजे, यावर विचार करून ठेवा. म्हणजे पाहिलेली स्वप्न हवेतच विरत नाहीत.
माझ्या आसपास असे अनेक लोक आहेत की जे सकाळी ८ तास नोकरी करून भाजीपाला विकण्याचा, पीएफ अकौंट्चि कामे करतात.
मुद्दा हा की, त्यांच्या पैसा या ध्येयासाठी ते दररोज थोडा वेळ काम करतात.
हे करत असताना तुम्हाला अपयश येईल. कधी काम तुमच्या मनासारखे होणार नाही, कोणीतरी काही टिप्पणी करेल, तुम्हाला निराश करेल पण त्याकडे दुर्लक्ष करा आणि कमाला लागा.
हळूहळू ढोर मेहनत न करता पैसा कमावणं तुम्हाला जमयला लागेल…
९) ध्येय प्राप्तीसाठीच्या कामाचे मूल्यांकन करा
आज आपण आपले ध्येय मिळवण्यासाठी काय केले? किंवा उद्या काय करणार आहोत? याचे मूल्यांकन करा.
त्यामुळे तुम्ही कोठे आहात, आणि आणखी काय काय करायला हवे याचा अंदाज येईल. आपण जशी दररोजच्या कामाची रोजनिशी (डायरी) करतो न तसेच आपल्या ध्येयसाठी एक डायरी तयार करा, केलेल्या कामाचा तुम्हाला आढावा घेता येईल.
सरतेशेवटी एवढंच सांगेन की कोणतेही ध्येय साध्य करणे सोपे नाही पण अशक्यही नाही.
त्यासाठी हवा संयम आणि आत्मविश्वास.
आपका हर सपना सच हो सकता है, अगर आप उसे पाने की हिम्मत रखते है तो।
त्यामुळे चला, स्वप्न पूर्ण करण्यासाठी, ध्येयप्राप्तीसाठी वर दिलेल्या मार्गांचा अवलंब करा, सकारात्मक रहा आणि काम करा, यश मिळेलच.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप सुरेख माहिती.
मनापासून धन्यवाद व खुप साऱ्या शुभेच्छा.