या कोरोना काळात सर्वात महत्त्वाची झालेली आहे ती आपल्या शरीरातील “ऑक्सिजन लेव्हल”, आणि एकूणच आपलं शारिरीक आणि मानसिक स्वास्थ्य!!
मनाचेTalks चा हेतूच आहे, तुमच्या शरीराचं आणि मनाचं स्वास्थ्य अबाधित राखण्याचा. त्याच साठी हा लेख वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा.
‘ऑक्सिजन लेव्हलवर लक्ष ठेवा.’
‘होम आयसोलेट करायला सांगितलं होतं पण ऑक्सिजन कमी झाला म्हणून हॉस्पिटलमध्ये हलवलं.’
‘ऑक्सिजन लेव्हल ओके झाली म्हणून घरी सोडलं.’
‘एक ऑक्सिमीटर घरीच आणून ठेवा.’
ही वाक्य ओळखीची वाटतात? वाटत असणारच आजकाल सगळीकडे, सगळ्यांच्या तोंडात हीच वाक्य आहेत.
कोव्हीड -१९ या वैश्विक महामारीमुळे आपल्याला या ऑक्सिजनच, म्हणजेच प्राणवायूचं महत्व नव्याने समजलं आहे.
या दिवसात स्वतःच्या तब्येतीची जास्तीत जास्त काळजी घेऊन, सर्दी, खोकला, ताप या आजारांना आपल्यापासून दूर ठेवणं सगळ्यात महत्वाचं आहे.
त्याचबरोबर आपल्या रक्तातल्या ऑक्सिजन लेव्हलवर लक्ष ठेवणं, ती खाली येऊ न देणं याची खबरदारी बाळगायची आहे.
अशी लक्षणं जरी आढळली तरी घाबरून न जाता, सकारात्मक विचार करून, डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करून आपलं लक्ष फक्त आणि फक्त आपली ऑक्सिजन लेव्हल खाली जात नाही ना याकडे ठेवायचं आहे.
खरंतर कोव्हीड -१९ मधेच नाही तर कोणत्याही रेस्पायरेटरी आजारात पेशन्टच्या शरीरात योग्य प्रमाणात ऑक्सिजन जात नाही, त्यामुळे रक्तातली ऑक्सिजनची पातळी घसरते मग हृदयाला ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही आणि मग पुढे गुंतागुंतीची लक्षणं दिसू लागतात.
आजच्या या लेखाचा हेतू हाच आहे की फक्त कोव्हीड – १९ चं नाही पण इतर श्वासाचे त्रास असलेल्या लोकांनी कशी काळजी घ्यावी, काय करावं, काय करू नये, काय खावं जेणेकरून त्यांच्या रक्तातली ऑक्सिजनची पातळी कमी होणार नाही, कमी होत असेल तर ती सुधारेल आणि यामुळे पुढचे धोके टळतील.
मित्रांनो, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल, कोंदट वाटत असेल तर या उपायांचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
१. आपल्या आजूबाजूला झाडं लावून टवटवीत वातावरण ठेवा
झाडांमधून आपल्याला ऑक्सिजन मिळतो हे तर माहीत आहेच पण झाडांमुळे वातावरणात सुद्धा ‘फ्रेशनेस’ असतो. आपल्या घरात आपण इनडोअर प्लांट्स, जसं की मनी प्लांट, जरबेरा, लिली लावून वातावरण फ्रेश ठेऊ शकतो.
२. शांत राहा
सतत भीती, स्ट्रेस असला तर त्याचा परिणाम आपल्या श्वसनावर सुद्धा होतो.
भीतीमुळे श्वास लागून राहतो, विनाकारण धाप लागते त्यामुळे शक्य तितकं मन शांत ठेवायचा प्रयत्न करा.
त्यासाठी योगासनं, प्राणायाम, मेडिटेशन हे उपाय आहेतच.
३. भरपूर पाणी प्या
दिवसभर आठ ग्लास पाणी प्यायचं महत्व आपण वेळोवेळी बघितलं आहेच.
पाणी प्यायल्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारते. पाण्याच्या एका मॉलिक्यूल मध्ये एक हायड्रोजन ऍटम असतो तर दोन ऑक्सिजन ऍटम, त्यामुळे सतत पाणी पीत राहणं हिताचं आहे.
बऱ्याच जणांना सारखं पाणी जात नाही अशांसाठी ताज्या फळांचा रस हा एक उत्तम पर्याय आहे.
४. आहारात बदल करा
काही अन्नपदार्थांचा रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवायला उपयोग होतो. असं सांगितलं तर कदाचित तुम्हाला पटणार नाही, हो ना?
पण तुम्हाला श्वासाचा त्रास असेल आणि तुम्ही खरंच जर तुमच्या आहारात ताज्या भाज्या, जसं की पालक, बीन्स, ढोबळी मिरची, बटाटा, गाजर अशा भाज्या वाढवल्या तर तुमचा तुम्हाला फरक जाणवेल.
याचबरोबर जेवणातलं मिठाचं प्रमाण कमी केल्याने सुद्धा पुष्कळ फरक पडतो.
आहारात मिठाचं प्रमाण जास्त असेल तर ब्लोटिंग, म्हणजेच शरीरात जास्तीच पाणी भरून राहिल्यासारखं होतं.
त्यामुळे ते प्रमाणाबाहेर न खाल्लेलंच बरं, त्यासाठी पापड, लोणची असे पदार्थ कमी करायला हवेत ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं.
हळद, पुदिना हे दोन्ही आपल्या फुफुसांच्या आरोग्यासाठी लाभदायक असतात त्यामुळे या गोष्टी आहारात वाढवल्याने फायद होतो.
फुफुसांची कार्यक्षमता वाढते आणि त्यामुळे रक्तातली ऑक्सिजनची पातळी वाढायला मदत होते.
या उपायांव्यतिरिक्त अशी काही फळं, काही भाज्या आहेत ज्यात ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असतं.
आजकाल आपल्या आहारात भाज्यांचं प्रमाण फार कमी झालं आहे, पण आपल्या एकूण आरोग्यासाठी सुद्धा हे योग्य नाही. आहारात जर ऍसिडचं प्रमाण जास्त असेल तर त्याचा परिणाम श्वासावर होतो.
आणि त्यामुळे श्वासाचे आजार मागे लागू शकतात. ज्यांना श्वासाचे त्रास आहेत, ज्यांना रक्तातलं ऑक्सिजन वाढवायचं आहे त्यांनी जर त्यांच्या आहारात या खालील भाज्यांचं, अन्नघटकांचं प्रमाण वाढवलं तर नक्की फरक जाणवेल!
१. केळी, खजूर, काळ्या मनुका, गाजर, लसूण.
या सगळ्या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडण्ट्सचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.
याशिवाय लसूण आणि खजूर रक्तदाब सुद्धा नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात.
२. जर्दाळू
जर्दाळू पित्त कमी करायला मदत करतो त्यामुळे रक्तात जर ऑक्सिजनची कमतरता असेल आणि आहारात जर जर्दाळूचा समावेश केला तर हमखास फायदा होऊन ऑक्सिजनची पातळी वाढायला मदत होईल.
३. द्राक्ष, बेदाणे, अननस, पेयर, पॅशन फ्रुट
या सगळ्या फळांचा pH जास्त असतो, म्हणजेच ते ऍसिडिक नसतात.
या फळांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स सुद्धा जास्त प्रमाणात असतात. हे पदार्थ उच्च रक्तदाब असलेल्या पेशन्ट्ससाठी अत्यंत लाभदायक आहेत.
आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी सुद्धा या पदार्थांचा उपयोग होतोच.
४. किवी
या फळाची एक खासियत आहे, यात जी साखर असते तिचं विघटन होताना शरीरात ऍसिड तयार होत नाही आणि याच कारणामुळे रक्तात ऑक्सिजन वाढवण्यासाठी हे अतिशय उपयुक्त आहे.
याशिवाय यामध्ये फ्लावनॉइड्स नावाचं एक कम्पाऊंड असतं, जे आपल्यासाठी लाभदायक असतं.
५. शतावरी
शतावरीचे अनेक फायदे आपल्याला आधीपासूनच माहीत आहेत पण शतावरीमुळे शरीरातील ऍसिडचं प्रमाण सुद्धा कमी होतं हे आपल्याला बऱ्याचदा माहीत नसतं.
शतावरीच्या या गुणामुळे ती आपल्या आरोग्यासाठी अजूनच लाभदायक ठरते.
६. आंबा, कलिंगड, टरबूज, पपई
या फळांचा pH सुद्धा जास्त असल्याने त्यामध्ये ऍसिड कमी असते, जे रक्तातला ऑक्सिजन वाढवण्यासाठी मदत करते. हे आपण वर पाहिलंच आहे.
याशिवाय सुद्धा या फळांचे अनेक फायदे आहेत, पपईमुळे पोट साफ होतं, कलिंगडात पाण्याचं प्रमाण खूप असतं ज्यामुळे मूत्राशयाचे विकार दूर होतात, आंब्यात आणि कलिंगड, टरबुजात खूप प्रमाणात व्हिटॅमिन्स आढळतात.
७. ढोबळी (सिमला) मिरची
ढोबळी मिरचीमध्ये अशी काही द्रव्य असतात ज्याचा चांगला परिणाम आपल्या शरीरातल्या हार्मोन्सवर होत असतो. ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ चं प्रमाण सुद्धा चांगलं असतं ज्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.
८. लिंबू
लिंबात व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण खूप जास्त असतं. आपण ज्याला सर्वोत्तम ऑक्सिजन रिच फूड म्हणू शकू अशा प्रकारात लिंबू मोडतं.
मित्रांनो, लिंबाची एक गंमत आहे. लिंबू हे शरीराबाहेर जरी ऍसिडिक असलं (सायट्रिक ऍसिड) तरी ते शरीरात गेल्यावर मात्र अल्कलीन होतं.
सर्दी, खोकला, ऍसिडिटी, मळमळ यावर लिंबू म्हणजे रामबाण उपाय आहे तसेच बऱ्याच व्हायरल रोगांमध्ये सुद्धा लिंबू फायदेशीर आहे. लिंबामुळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढायला मदत होते.
तुम्हाला समजलं असेलच की वर सांगितलेल्या सगळया भाज्या या ऑक्सिजन रिच आहेतच, पण त्याव्यतिरिक्त सुद्धा आपल्या आरोग्यासाठीही चांगल्या आहेत..
आणि हे तर तुम्हाला मान्य असेलच की आपलं आरोग्य चांगलं असेल, आपण निरोगी असू तर आपल्या रक्तात ऑक्सिजनच प्रमाण जास्त असणारच, हो ना?
काय मग हे उपाय करून बघणार ना? तुम्हाला या उपायांचा नक्की फायदा होईल त्यामुळे आवर्जून तुमच्या लाडक्या लोकांबरोबर हे उपाय शेयर करा!
मनाचेTalks चा हेतूच आहे, तुमच्या शरीराचं आणि मनाचं स्वास्थ्य अबाधित राखण्याचा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप छान लेख… तितकंच महत्वपूर्ण माहीती.
Dhanyawad 🙏