सध्याच्या कोरोना काळात जी आरोग्याबद्दल आणीबाणीची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यात अशा वेळी आर्थिक डोलारा कसा सांभाळायचा, याची तजवीज करणं गरजेचं झालेलं आहे.
‘महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य’ योजनेचे लाभ कसे घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना खरंतर २ जुलै २०१२ रोजीच महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरु केली होती.
आता (२०१७ मध्ये) त्याच योजनेचं नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना हे ठेवण्यात आलं आहे. (इथे आपल्याला राज-कारणात पडायचं नसून, उपयोगी अशा योजनेची माहिती घ्यायची आहे)
आपल्याला अशा अनेक योजनांबद्दल माहिती नसते, कधी माहिती असली तरी त्याचा लाभ कोणाला घेता येतो आणि तो कसा घ्यायचा, त्यासाठी काय काय करावं याबद्दल आपण अनभिद्न्य असतो.
अशा गोष्टी कोणाला विचारायच्या, कोणाची मदत घ्यायची याबद्दल पण बऱ्याच जणांना माहिती नसते शिवाय बऱ्याच जणांना तर खात्रीशीर माहिती मिळेल का याचीच शाश्वती नसते.
म्हणूनच आज आम्ही या योजनेबद्दल अगदी बारकाईने माहिती या लेखाद्वारे, देणार आहोत जेणेकरून ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे ते घेऊ शकतात.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ही योजना २०१२ सालापासूनच सुरु केली आहे, पण सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरु केलेली ही योजना केवळ आठ जिल्ह्यात राबवली जात होती.
मात्र २०१७ मध्ये या योजनेचं नाव बदलून, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आलं आणि ती उरलेल्या २८ जिल्ह्यात सुद्धा राबवण्यास सुरुवात केली.
या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं?
या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषे खालचे व (दारिद्र्य रेषेवरचे- अन°धिकृत रित्त्या) लोक ज्यांच्याकडे पिवळं किंवा ऑरेंज कार्ड आहे अशीच लोकं घेऊ शकतात.
या योजनेअंतर्गत अशा कुटुंबीयांची मेडिकल सेवा, हॉस्पीटलायझेशन आणि सर्जरी सुद्धा कव्हर केल्या जातात.
महाराष्ट्र सरकारच्या स्वास्थ्य मंत्रालयाद्वारे राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा मुख्य हेतू हाच आहे की गरीबांना महागड्या वैद्यकीय सेवासुविधांचा लाभ घ्याता यावा.
यलो आणि ऑरेंज कार्ड धारकांच्या परिवारातलं कोणी आजारी पडलं तर त्यांना महागड्या सुविधांचा लाभ या योजनेद्वारे घेता येईल.
या आजारांच्या उपचारांसाठी (जिथे या योजनेचा लाभ घेता येईल) महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधली हॉस्पिटल
निवडली गेली आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात?
महाराष्ट्रात ज्या परिवारांकडे ऑरेंज किंवा यलो रेशन कार्ड आहे.
ज्या जोडप्याला दोन पेक्षा जास्त अपत्य नाहीत अशी जोडपी.
या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्र राज्याचे नागरिकच घेऊ शकतात.
ज्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण परिवाराचं वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे.
या योजनेअंतर्गत काय कव्हर केलं जातं?
या योजनेअंतर्गत सुमारे ९७१ प्रकारच्या सर्जरी, थेरपी आणि मेडिकल प्रोसिजर कव्हर केल्या जातात आणि या सगळ्यांची विभागणी एकूण ३० प्रकारात केली आहे, जसं की कार्डियाक सर्जरी, जनरल सर्जरी, पेडिऍट्रिक सर्जरी इत्यादी.
या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं?
https://www.jeevandayee.gov.in/ ही या योजनेसाठीची ऑफिशिअल वेबसाईट आहे ज्यावर जाऊन आपण अप्लाय करू शकतो.
नेमकी ही अप्लिकेशनची प्रोसिजर काय आहे आणि त्यासाठी काय करावं लागतं हे आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत.
१. https://www.jeevandayee.gov.in/ (दिलेले वेबसाईटचे हे पूर्ण नाव ब्राउजर मध्ये कॉपी पेस्ट करता येईल) हि वेबसाईट ओपन केल्यावर तुमच्या कॉम्पुटर स्क्रीनवर या योजनेची शासनाद्वारे तयार केलेल्या अधिकृत वेबसाईटचं होमपेज उघडेल.
२. होमपेजवर आपल्याला ‘न्यू रजिस्ट्रेशन’चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लीक करा.
३. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म उघडलेला तुम्हाला दिसेल, त्यात विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर टाईप करून द्यावी लागतील. तिथे यादी असलेली सगळी सर्टिफिकेट स्कॅन करून, अपलोड करून जोडावी लागतील.
४. यानंतर सबमिट असा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून फॉर्म सबमिट करता येईल.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात?
१. निदान केलेल्या आजाराचं सर्टिफिकेट. (जे सरकारी डॉक्टरांकडूनच घेतलेलं असावं लागतं.)
२. अप्लाय करणाऱ्या व्यक्तीचे तीन पासपोर्ट साईझ फोटो.
३. वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
४. वयाचा दाखला
५. आधार कार्ड
६. राशन कार्ड
सध्याच्या या महामारीच्या काळात खूप लोकांचे उत्पन्नाचे स्रोत जाऊन त्यांच्यावर आर्थिक आपत्ती आली आहे.
अशावेळेला आरोग्यासंबंधी काही तक्रार उत्भवली तर अनेकांना ते निभावून नेणं अवघड जाणार आहे. योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत तर त्यातून बऱ्याच गुंतागुंतीच्या समस्या उदभवू शकतात.
आपल्याला हे टाळता येणार असेल तर टाळलं पाहिजे. केवळ माहितीच्या अभावाने कोणाच्या तब्येतीची हेळसांड व्हायला नको म्हणून सरकारद्वारा राबवल्या जाणाऱ्या या योजनेची माहिती आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत.
कदाचित वाचणाऱ्यांपैकी अनेक जणांची यासाठी अप्लाय करायची पात्रता नसेल, काहींना गरज नसेल, पण मित्रमैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला, आपल्या ओळखीत असे अनेक परिवार असतील जे या योजनेचा लाभ घेऊ शकतात, ज्यांना या योजनेचा फायदा होईल आणि यामुळे योग्य उपचार योग्य वेळेत मिळतील…
अशा लोकांना ही माहिती पोहचवायचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे..
आणि इतकंच नव्हे तर अप्लाय करताना त्यांना काही अडचण आली, काही मदत लागली, तर ती सुद्धा केली पाहिजे.
सरकारच्या अशा अनेक योजना असतात, त्याबद्दल माहिती असणे आणि ती माहिती इतर लोकांना देणं हे महत्वाचं आहे.. आणि आपण ते नक्कीच करू शकतो. म्हणूनच लेख जास्तीत जास्त शेअर करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Nice information