आपल्याला खूप काही व्हावं, करावं असं वाटत असतं. पण त्यातल्या किती गोष्टी आपण पूर्ण करू शकतो. आणि किती विचार तसेच ‘आपल्यचाने होणार नाही!’ म्हणून गुंडाळून माळ्यावर फेकून देत असतो?
हेच असे अडगळीत पडलेले विचार, स्वप्नं पूर्ण करण्यासाठी काय करावे, ते वाचा या लेखात.
सुप्त मनाला सूचना देऊन आपल्या स्वप्नांना पूर्ण करणं, हे शक्य आहे याचा अनुभव घेतला आहे का कधी तुम्ही?
तुमची सगळी स्वप्नं, इच्छा कशा पूर्ण होणार?? होणार का नाही? हे तुम्हाला कसं कळणार?
मित्रांनो, तुम्हाला आयुष्यात काय काय मिळवायचंय ह्याचा तुम्ही पक्का विचार कधी केलाय का?
तुम्हाला करोडपती व्हायचंय, का मोठा कारखानदार व्हायचंय, का बिल गेट्स सारखं जगात ला सर्वात श्रीमंत माणूस व्हायचंय?
का आपल्या नोकरीच्या ठिकाणी बढती मिळवायची,
का खूप नावाजलेला कलाकार व्हायचंय, वक्ता व्हायचंय? यु ट्युबर व्हायचं, ब्लॉगर व्हायचं,
देश सेवा करायची का प्रसिद्ध क्रिकेटपटू व्हायचंय, का ख्यातनाम गायक व्हायचं…
हे तुम्ही स्वतः ठरवायचं, तुम्हाला, गाडी बंगला आणि चांगला बँक बॅलन्स हवाय?
तुमची आवड काय आहे हे जाणून घेऊन तुमचं ध्येय ठरवलं की त्या दृष्टीने तुमची पावलं पडायला लागली पाहिजेत.
म्हणजे तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचं हे तुम्ही ठरवायचं….
तुमच्या आयुष्याला, तुम्हाला पाहिजे तसा आकार, तुम्ही द्यायचा. तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे?
मित्रांनो, हे शक्य आहे…
तुमच्या मनापेक्षा शक्तिशाली असं या जगात काहीही नाही….
तुमच्या ‘सब कॉन्शस माईंड’ ला म्हणजे सुप्त मनाला जागृत करून तुमच्या स्वप्नांना साकार करायची शक्ती तुमच्यात उपजतच आहे.
पण फक्त तिच्यावर काही जळमटं चढली, जी आपल्यालाच झटकून टाकायची आहेत.
हे तुमचं सुप्त मन कुठं असतं, काय करत असतं, त्याला जागृत करायचं म्हणजे काय करायचं? हे सगळे प्रश्न तुमच्यासमोर उभे राहिले असतील ना?
काहींना वाटेल की हे काहीतरी अवघड काम आहे, आपल्याला नाही जमायचं.
“अभिमन्यू” हे नाव ऐकलं की तुम्हाला कोणती गोष्ट आठवते?
अभिमन्यूनं आपल्या आईच्या पोटात असताना, चक्रव्यूह कसं भेदायचं ह्याचं ज्ञान घेतलं.
म्हणजे पोटात असताना सुद्धा आपल्या आईचं जे काही बोलणं चालू असतं, किंवा आई कोणाशी बोलत असते ते आपल्याला कळत असतं.
म्हणजे आपलं सब कॉन्शस माईंड हे जागृत असतं. हे फक्त आपल्या पौराणिक कथाच नाही विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेलं आहे.
म्हणून बाळ पोटात असतानाच गर्भ संस्कार केले जातात.
गर्भ संस्कारात बाळाला उत्तम आरोग्य, चांगली बुद्धी, मानसिक, शारीरिक विकास, रोग प्रतिकार शक्ती ह्या गोष्टी पोटात असतानाच बाळाला संस्कारातून दिल्या जातात.
थोडक्यात काय तर हे जे टेक्निक आहे ते तुमच्या सब कॉन्शस माईंडला तुम्ही झोपल्यावर सुद्धा जागं ठेऊन त्याला सतत तुमच्या स्वप्नांसाठी काम करायला लावायचं टेक्निक आहे….
तुम्हाला सुप्त मनात ही स्वप्नं ठसवायची आहेत..?
हे तुमचं सुप्त मन किंवा सबकॉन्शस माईंड कसं ओळखलं जातं?
तर समजा तुम्ही ज्यावेळी असं रस्त्यावर कुठे फिरायला जाता आणि अचानक जर कोणी तुमच्या जुन्या ओळखीची व्यक्ती तुम्हाला खूप वर्षांनी भेटली.
तर तुम्ही त्या व्यक्तीशी वेगवेगळे विषय काढून बोलत असता, ते तुमचं जागृत मन असतं आणि त्या व्यक्तीला न्याहाळण्याचं काम तुमचं सुप्त मन करत असतं.
म्हणजे त्या माणसाची बोलण्याची पद्धत, बॉडी लँग्वेज, कपडे, त्याची एखादी सवय हे सगळं तुमचं सुप्त मन बघत असतं आणि त्याची इमेज, आकृती, तुमच्या स्मरणात साठवत असतं. तेच तुमचं सुप्त मन असतं. हे लक्षात घ्या.
सुप्त मनात आपल्या स्वप्नांना, इच्छांना ठसवण्यासाठी काय करायचे…
पहिली स्टेप: आपल्याला जे मिळवायचं आहे ना, म्हणजे आपलं ध्येय. त्याचं एक स्क्रिप्ट तयार करायचं. अगदी सात, आठ, दहा पानाचं झालं तरी चालेल.
पण हे स्क्रिप्ट तुम्हाला काही मिळवायचंय म्हणून लिहायचं नाही तर तुम्हाला ते सगळं ऑलरेडी मिळालंय आणि ते तुम्ही एन्जॉय करताय असं लिहायचं.
म्हणजे तुमचं ध्येय तुम्ही मिळवलं आहे. त्यासाठी तुम्हाला लोन मिळवायचं आहे, किंवा प्रोजेक्ट तयार करायचय असं नाही लिहायचं तर तुमची लोन ची व्यवस्था होऊन तुमच्या हातात ते पैसे आले असं लिहून कामाला सुरुवात कशी झाली, प्रगती कशी झाली, आता काम जोरात सुरू आणि भरपूर फायदा होतोय त्यात तुम्ही आणखी काय काय मिळवलं, म्हणजे कार, बांगला, फार्म हाऊस, आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करता आहात. असं स्क्रिप्ट तयार करा.
एखादी अगदी सुगरण असलेली गृहिणी असेल. खूप दिवसांपासून आपलं कुकिंगचं यु ट्यूब चॅनल असावं असं तिला वाटत असेल. पण ‘आपल्याच्यानं हे होणार नाही’ असं वाटून वेळोवेळी ती तिच्या स्वप्नातलं ते चॅनल पुन्हा गुंडाळून माळ्यावर टाकून देत असेल. मग तिने, तिला हवी तशी स्क्रिप्ट बनवायची.
यावर हा पोरकटपणा आहे, अंधश्रद्धा पसरवण्याचं काम तुम्ही करताय!!
असं सुद्धा कोणी म्हणू शकतं. पण तुमची स्वप्नं जेव्हा तुम्ही तुमच्या सुप्त मनात फीड कराल तेव्हाच त्यांना खरं करण्याची ऊर्जा तुमच्यात येईल हे आधी ध्यानात घ्या.
पुढे तुमच्याकडून होणारे काम जादूने होणार नाही. हे ही लक्षात घ्या.
पण एकदा का तुमचं स्वप्न तुम्ही तुमच्या ‘सुप्त मनावर’ घ्याल तेव्हा तुमच्यात जी ऊर्जा निर्माण होईल, तीच तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल.
दुसरी स्टेप : आता या दुसऱ्या टप्प्यात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळाल्यात आणि त्याचा तुम्ही मस्त अनुभव घेताय अशा शब्दात त्या स्क्रिप्टचं मोठ्या उत्साहात, आनंदात तुम्ही तुमच्याच आवाजात रेकॉर्डिंग करायचं.
मोबाईल किंवा कॉम्प्युटर वर हे रेकॉर्डिंग करा. त्यात बोलण्यात आनंद, उत्साह, जोश असू द्या.
अगदी सुरुवाती पासून ह्याची कल्पना, पुढे प्रगती कशी झाली, काय काय गोष्टी कराव्या लागल्या, मेहेनत कशी घेतली, यश कसं मिळत गेलं असं वर्णन मोठ्या जोशात, उत्साहात करायचं.
रेकॉर्डिंग स्वतः ऐकून त्यात काही चुका असतील तर त्या आधी दुरुस्त करायच्या, आणि आपण आपल्याच आवाजात केलेलं रकॉर्डिंग जास्तीत जास्त वेळा ऐकायचं. आणि तसं चित्र डोळ्यासमोर उभं करायचं.
तिसरी स्टेप : हे केलेलं रेकॉर्डिंग रोज रोज रात्री झोपायच्या आधी लावून ठेवायचं. ऐकत ऐकत रोज झोपायचं. रोज रात्री न चुकता ते लावायचंच. कारण रात्री तुमचं जागृत मन तुमच्या बरोबर झोपलेलं असतं पण सुप्त मन मात्र जागंच असतं.
काही लोकांच्या मोबाईलवर तेच रेकॉर्डिंग संपल्यावर परत पहिल्यापासून लावण्याची सोय असते त्यांनी रात्रभर कमी आवाजात ते लावून ठेवा. आणि ऐकत ऐकत झोपी जा.
हे तुमच्या स्वप्नांचं, ध्येयांचं, त्यातून तुम्हाला हव्या असलेल्या आउटपूटचं प्रोग्रामिंग सतत काही दिवस तुमच्या सुप्त मनाला देत राहायचं.
ह्या तुमच्या सबकॉन्शस माईंडला तुम्ही जी ऑर्डर द्याल, तेच विचार हळूहळू जागेपणी सुद्धा तुमच्या मनात घोळायला लागतील. त्या प्रमाणे तुमच्या कामात आश्चर्यकारक बदल दिसायला लागतील.
काहींना आवाजाने झोप येत नाही. पण तरी रेकॉर्डिंग लावा, सवय करा.
सवय झाल्यावर आपोआप झोप लागेल, रेल्वे लाईनच्या शेजारी राहाणारे लोक लोकलच्या आवाजाने सुरुवातीला झोपत नसतील, पण नंतर सवय होतेच.
काही मिळवण्यासाठी काही खर्ची पडत असतं. मग हे सगळं मिळवायचं तर दोन दिवस झोप उशिरा लागेल.
आपलं सुप्त मन हळू हळू ते सगळं आत्मसात करायला लागेल आणि त्याप्रमाणे तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडायला लागतील.
तुम्ही जितकं चांगलं स्क्रिप्ट तयार कराल, चांगल रेकॉर्ड कराल तसं मिरॅकल तुम्हाला अनुभवायला मिळेल.
उदाहरण. म्हणून सांगतो…. माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्नच जमत नव्हतं, खूप मुलं बघितली. बरेच दिवस काहीच होत नव्हतं. घरातले सगळेच काळजी करायला लागले. यामुळे त्या घरात चिडचिड, त्रागा कमालीचा वाढला होता. त्यांनी हे टेक्निक समजून घेतलं, आणि एक मस्त स्क्रिप्ट तयार केलं.
अगदी लग्नाची सुरुवातीची बोलणी, पुढची प्रगती, होकार, तयारीला सुरुवात, खरेदीला सुरुवात, कपडे, खरेदी, सोन्याची खरेदी, अंगठ्या खरेदी, रुखवत, पत्रिका, निमंत्रण, पाहुणे, दोन्हीकडच्या लोकांची बोलणी, हॉल ची सजावट, बँड, वाजंत्री, ही सगळी तयारी, लग्नाचा, दिवस, हॉल , पाहुणे मंडळी, सगळे आनंदी लोक, सुंदर कापड्यातले वर आणि वधू…
सगळा लग्नाचा थाट, पाहुण्यांचा पाहुणचार, लग्न लागताना, आणि लग्न लागल्यावरची धांदल, फोटोग्राफी, आहेर, नंतर जेवणाच्या पंगती, पाठवणी, ह्या सगळ्या गोष्टी मस्त लिहून काढल्या आणि एक लग्न झाल्याचा आनंद संपूर्ण कुटुंबाने घेतला.
असं स्क्रिप्ट लिहून झाल्यावर ह्या लग्न सोहळ्याचं सगळं जसं च्या तसं वर्णन ह्या मित्राने आपल्या आवाजात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात आपल्या कॉम्प्युटर वर रेकॉर्ड करून घेतलं.
आणि सगळ्या कुटुंबाला ऐकवलं, त्याच्या बहिणीला आणि घरातल्या सगळ्याच लोकांना ते रोज रोज ऐकवलं.एक अद्भुत आणि सुखद अनुभव त्यांना मिळाला. लग्न जमलं आणि धूम धडाक्यात लग्न पार सुद्धा पडलं.
यावर आमच्या मित्रांमध्ये खरंतर बरीच मतमतांतरे होती कि लग्न योगायोगाने त्याच वेळी जुळले. असे असण्याची शक्यताही आहे.
मत्रांनो, हेही असूच शकतं पण, या केसमध्ये त्या कुटुंबाला, सुप्त मनाला दिलेल्या या प्रोग्रॅमिंगने मानसिक बळ मिळाले एवढे मात्र नक्की.
तुमच्या आयुष्यातली सगळी ध्येयं वेग-वेगळी स्क्रिप्ट तयार करून तुमच्या सुप्त मनाला क्रमा क्रमाने जागृत करा, ते तुम्हाला प्रेरणा देईल, यश देईल, मानसिक बळ देईल, जे हवंय ते देईल, हे अद्भुत अनुभव तुम्ही स्वतः अनुभवून पहा.
ही मोकळ्या वेळातली तुमच्या आयुष्याला आकार देणारी गोष्ट आहे. ह्या स्क्रिप्ट आणि रेकॉर्डिंग साठी तुमचे दोन-तीन तास खर्च होतील पण जे काही मिळवाल ते अद्भुत असेल. स्वतः मिळवलेलं असेल.
करा तुमच्या आयुष्याचा सुंदर आराखडा तयार, सजवा त्याला तुमच्याच कल्पनांनी, ठरवा तुमची ध्येयं, स्क्रिप्टला द्या सोन्याची झळाळी!!
करा त्याची उत्तम ऑडिओ, द्या संकेत तुमच्या सुप्त मनाला, रोज रोज रोज… रात्री झोपताना आणि सुप्त अवस्थेत सुद्धा. आणि साध्य करून घ्या तुमचं इप्सित.
जादुई दुनियेत गेल्यासारखं वाटलं ना?
खरंच आपण आपल्या एक एक ध्येयासाठी एक एक स्क्रिप्ट तयार करून अनुभव तर घेऊ.
काहीतरी बदल निश्चित अनुभवायला मिळेल. नंतर गाठू पुढची पायरी. आपला अनुभव दुसऱ्यांनाही देऊ.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Really Nice
Khup Chan lekh ahe
Me nakki try kren sir