आज पुन्हा,
भांडलेत शब्दं माझ्याशी…
गोठलेल्या भावनांना
का मांडलस तु…
असं म्हणत आज पुन्हा
भांडलेत शब्द माझ्याशी…
तु नेहमीच मनातलं
ओठांत न आणता लिहीतेस…
असं म्हणत आज पुन्हा
रूसलेत शब्द माझ्याशी…
तुझा नि त्याचा त्रागा शब्दांवरच
मग आम्हाच मुकं व्हावं लागतंय..
अबोला सोडावा म्हणुन आज
पुन्हा भांडलेत शब्द माझ्याशी…
अबोली तु अन् तो निवडुंग
कसा ग!हा नियतिचा रंग…
हा रंग रंगीत व्हावा म्हणुन
आज पुन्हा रूसलेत शब्द माझ्याशी…
वैशाखतलं ऊन अन् श्रावणातली सर
झालेत आता तुम्ही…
तुमच्यात वसंत फुलवावा
म्हणुन आज पुन्हा भांडलेत शब्द माझ्याशी…
वाचण्यासारखे आणखी…
काय हरकत आहे?…
महीला दिन ना आज…
पेढे घ्या पेढे…..
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.