तिला ‘पंजाबी’ जेवायचं असतं,
मला ‘पावभाजी’ हवी असते,
मी एकटीच काय काय मागवु?
म्हणुन ती माझ्यावर फुगुन बसते…
‘लिखाण आणि वाचन’ माझे जीव की प्राण..
तिला ह्या दोन्हीचा कंटाळा असतो,..
तिच्या माझ्या आवडी का जुळत नाहीत?
म्हणुन मीही तिच्यावर खोटं खोटं रुसतो…
मला आवडतात ‘गडद रंग’,
आपलं म्हणणं एकचं, “उठुन दिसतं”…
तिला माझं सगळं झकपक वाटतं,
ठळक रंगांचं, तिला का वावडं असतं?…
तशी ती वागण्या-बोलण्यात हुशार आहे,
आणि मला बोलायचं कळत नसतं,….
मी उथळ, आणि ती खुप जबाबदार,
असं तिचं नेहमीचचं म्हणणं असतं….
मला आवडतो, “मित्रांचा घोळका”…
आणि तिला पाहीजे, “नातेवाईकांचा गोतावळा”..
त्यांच्यात गप्प बसलेल्या माझ्या चेहर्याकडे बघुन,
“मिक्स व्हा”, “बोला”, खुणावते नुसतं….
जुने पिक्चर आणि जुनी गाणे माझे,
हनी सिंगचं, रॉकींग म्युझीक तिचं असतंं…
जुन्या आठवणी तिच्या प्रिय सख्या…
तर मला स्वप्नांच्या जगात हरवायचं असतं,….
आम्ही कधी भांडतो, कधी-कधी ओरडतो,
कधी एकमेकांचे, डोळेही पुसतो,
खुप हसतो, आणि खुप खुप हसवतो,
पुन्हा एकमेकांच्या प्रेमात फसतो….
कारण आम्ही एकमेकांचे ‘नवरा बायको’ नसतो,…
तर आम्ही एकमेकांचे मित्र-मैत्रीणच बनुन जगतो!..
वाचण्यासारखे आणखी काही…..
श्रीदेवी!! कॅमेऱ्या पलीकडची…….
ऐक सखे! सखीच्या आठवणींचा “अल्बम”!
“अटॅक इज द बेस्ट डिफेन्स”- आक्रमक व्हा आणि जिंका!!
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.